व्यंकटेश दर्शन
हॉटेल जवळच बिर्ला मंदिर
आहे. पण जायचा योग येत नव्हता रात्री लवकर बंद होत असावे... आणि सकाळी
आम्ही कुठेना कुठे जाण्यासाठी लवकर बाहेर पडत होतो... असो
पण आज योग आला...
रात्री आठ वाजता बिर्ला मंदिर बघायला गेलो...
कोणी
म्हणे 25 पायऱ्या आहेत पण नेट वर दाखवल्या प्रमाणे 150 पायऱ्या... पण
थोड्या पायऱ्या चढल्या कि सरळ चालणे यामुळे इतक्या पायऱ्या चढलो असे वाटले
नाही.
मध्ये मध्ये गणपती, हनुमान, देवी.,
शंकर भगवान अशी मंदिरे आणि संपूर्ण संगमरवरी,
आता होते ते पद्मावती मंदिर... म्हणजे आता होणार व्यंकटेश दर्शन.!
मूर्ती भव्य आहे.!
वाह.... इतके सुंदर आणि जवळून दर्शन झाले..
तत्पूर्वी गरुड दर्शन घेतले.
काल सकाळी मनात एक विचार आला होता...
हैद्राबाद
येथे आलो आहोत तर तिरुपती बालाजी येथून किती लांब आहे?? काही वर्षांपूर्वी
दर्शनासाठी म्हणून निघालो पण... काही कारणाने अर्ध्या रस्त्यातून परत यावे
लागले होते...
देवाजीच्या मनात असावे लागते.. असे काहीसे म्हणतात..
(पण काही वर्षांपूर्वी मी एकटी एका ग्रुप बरोबर छान दर्शन घेऊन आले आहे)
असो, आज इथे सुंदर व्यंकटेश दर्शन झाले.!
व्यंकटेश दर्शन होताच वाह.! असे सहज उद्गार आले..
मनातील इच्छा पूर्ण झाली.!
नेरूळ इथे असेच सुंदर तिरुपती मंदिर आहे.
गिरगावात फणस वाडी येथे सुंदर मोठे तिरुपती मंदिर आहे.
येथील वैशिष्ट्य..येथे भिंतीवर संपूर्ण गीता लिहिली आहे..
डोंबिवलि येथे असेच सुंदर मंदिर आहे
माटुंगा सेंट्रल येथील परिसरात साऊथ कडील अनेक मंदिरे पहावयास मिळतात.
पुण्याहून सातारा रोड येथे फारच सुंदर मंदिर आहे.
दिवसाच्या तिन्ही प्रहरी जाण्याचा योग आला, निसर्ग रम्य परिसर, उत्तम स्वच्छता... पुन्हा पुन्हा जावे वाटते..
๑ ๑๑๑ ๑๑๑ ๑๑๑ ๑๑๑ ๑
No comments:
Post a Comment