Friday, 17 November 2017

१७ नोव्हेंबर २०१७ : गीता



आज संपूर्ण गीता पाठ झाली.


राहिलेला श्लोक आज पहाटे पाठ केला.

पाचवा अध्याय करत होते.
(२९ श्लोक )

आता रोज म्हणून म्हणुन गीता पक्की पाठ करायची.

 

 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आता गीता जयंती आहे महिना अखेरीस

त्या निमित्त स्पर्धा होतील तेव्हा भाग घेईन म्हणजे धीट पणा येईल.

खरतरं ज्यांच्या कडून मी प्रेरणा घेतली त्या माझ्या मावस सासूबाई...


त्यांच्या बरोबर झालेला संवाद
मी : मावशी आज माझी संपूर्ण गीता पाठ झाली.

मावशी : स्वतःच्या जबरदस्त इच्छा शक्तिने काय जमत नाही?

स्वर्गही गाठू शकतो माणूस.

तुझ कौतुक कराव तेवढ थोड आहे.

मी : तुम्हाला म्हणताना मी ऐकले.... 
त्यानंतर मला वाटू लागले 
आपल्याला गीता चांगली म्हणता यायला हवी
हे मी तुम्हाला बोलून दाखवले... 
आणि तुम्ही लगेच तयार झाल्यात..
लगेच 1, 12, 15 असे अध्याय निरुपणासह voice पाठवले..
पण मी थोडी 'स्लो, ढ..' 
काहीतरी असेन मला जमेना.... 
पण आंतरिक इच्छा होती... 
पुढे काही महिन्यातच योग्य गुरु मिळाले. आणि आपल्या शास्त्री हॉल मध्ये  .. 
श्री श्रीकृष्ण जोशी येऊ लागले.
आणि म्हणता म्हणता सव्वा वर्ष कसे गेले ते कळले नाही
 आणि सुंदर अशी संथा त्यांनी दिली....
मी : तुमचे असे प्रोत्साहित करणारे शब्द, कौतुक, शाबासकीची थाप ....
पुढे जाण्यास उपयोगी होते

आता मला शृंगेरीला जायचय... 

मावशी : यशस्वि भव.!!


~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 त्यांनी हल्लीच स्वतः च्या आवाजात गीता म्हटली आणि निरुपण केले

अशा सिडी चे वितरण केले....

  .... ... ... ....

 फक्त कौतुक करणाऱ्या 

अनेक व्यक्तींपेक्षा

 प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्ती 

सोबत असाव्यात 

ज्या आयुष्यातील नाकारात्मतेला 

पुरून उरतील.


No comments:

Post a Comment