Thursday, 21 February 2019

स्वामी सकाळ...


गुरुवार ची सकाळ मठात जाण्याची, 

 चालता चालता अनेक गोष्टी नजरेस पडतात. 
शांत प्रसन्न सकाळ, 
सूर्यदेव अजून दिसत नाहीत, 
पक्षांची किलबिल सुरु आहे, ठराविक वाहनांची ये-जा सुरु असते, 
लोक सुध्दा, प्रभातफेरी वाले, मुलांना शाळेत सोडणारे, आमच्यासारखे देवळात मठात जाणारे...
 
एक स्त्री अनवाणी आमच्या पुढे चालत होती, बहुतेक गुजराथी असावी, 
वय असेल साठीच्या पुढे... का बरं अनवाणी चालते?
 
बाजूलाच चर्च आहे... इकडे लोक चप्पल/बूट घालूनच प्रार्थना स्थळत जातात, 
निर्धोक मनाने, चप्पल/ हंरवेल? हि चिंता नसते..
.
 पुढे मठ परिसरात चप्पल/ बूट ठेवण्यास जागा आणि हि सेवा आहे.... 
म्हणून आपण मस्त दर्शन घ्यायला मोकळे होतो तर.. 
 
काही मंदिरात चप्पल सांभाळणारे लोक आहेत ,
 पैसे घेऊन काम करतात, चाकरी करतात
त्यांना रोजीरोटी मिळते...
 

असे अनेक विचार आले मनात...

आलो मठात.... गुरुजींची पूजा सुरु आहे..
 आज स्वामीदर्शन मस्तच झाले एकही हार नाही,
 आणि देव्हाऱ्यातील देवांच स्नान सुरु आहे... 
छोट्या पादुका यांचे दर्शन घेतले प्रदक्षिणा केली..

म उभे राहून प्रार्थना म्हटली, 

माझी , मला वाटते... जे ओठी येतात शब्द ते.. म्हणते.

 तीर्थ अंगारा प्रसाद घेतला.
 
दिवसाच्या कोणत्याही प्रहरी गेले की वेगवेगळे अनुभव येतात. 
वेगळे लोक भेटतात. 

सकाळची वेळ शांत प्रसन्न असते. 

सूर्यदेव .. छान दर्शन होते. कोवळी किरणे... त्याचे रंग... सारा आसमंत सुंदर भासतो.... 

मठात छान वाटते सकाळी जाण्यास.!
 
 

No comments:

Post a Comment