Sunday, 3 February 2019

बकेट लिस्ट


 मी २५ मे रोजी बकेट लिस्ट या सिनेमाहून येताना आठवले...
काय होती बकेट लिस्ट आपली???
आणि आज लिहायला बसले...
( आपल्या इच्छा... आकांक्षा, किंवा हे करावे.... 
असे साधेच शब्द होते मनात , 
सिनेमा मूळे सुंदर गोड नाव मिळाले)
तर बरेचसे होत गेले.
आता अजून जे काही पूर्ण करायच्या आहेत इच्छा... करेन पूर्ण...
काही सहज होत गेल्या.
काही मुलांनी पूर्ण केल्या.

पोहणे/swimming

पोहणे येत नव्हते, कुठे रिसॉर्ट ला गेलो कि लगेच पाण्यात उतरून डुंबत असे, 
म कोणी हसत असे पण मी आपला हा आनंद डुंबण्याचा घेत असे. आणि शिकले ....
तरी 50 व्या वर्षी
 स्वीमिन्ग मात्र मुलीने प्रयत्न केले,
कधी कुठे केव्हा आहे, चौकशी, फॉर्म आणून देणे, ड्रेस देणे.
कधी प्रॅक्टिस करायला बाथ वर घेऊन जाणे...
आणि जे काही मला वाटते ते पूर्ण करायला हे असतातच....
माझ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी
ज्या नक्की पूर्ण करता येतील आज ना उद्या

परदेशी जाणे.

 

दुबई 

 

हे सुध्दा तिचे प्रयत्न
काही गोष्टी तिच्यामुळे झाल्या होतील होत आहेत.
आता वाटतय
बकेट लिस्ट... करावी
काय पूर्ण झाले याची
आणि आता काय करायचे आहे याची.!!!

गीता वाचन करावे, पाठ करावी..


असे मुलाच्या मनात आले, सी ए परीक्षा दिल्यानंतर २०१५ मध्ये...
आणि हि इच्छा २०१६ फेब्रुवारी मध्ये 
उत्तम मार्गदर्शन करण्यास गुरु मिळाले 

आणि हि इच्छा पूर्ण झाली.
कोणी म्हणताय
नोव्हेंबर नंतर रिकामं वाटेल
सध्या गीता आहे.
म काय
तर छान उपयोग होईल
राहिलेले पूर्ण होईल
पूर्ण करण्याचा ध्यास लागेल..

योगा शिक्षक झाले.

आपल्याला योगासने यायला हवीत पण... 
क्लास लावला आणि नाही आले तर... 
आपले हसे होईल असे वाटे..
पण मैत्रीण म्हणाली अगं दादरला योगशिक्षक कोर्स आहे करू आपण
मनाने उचल घेतली आणि योग शिक्षिका झाले...
लगेच वहिनीने घरीच चार जण गोळा करून वर्ग घे म्हणाली... 
सराव छान झाला आता क्लास मध्ये शिकवायला सज्ज झाले..
तेव्हा मला दादर येथे वर्ग घ्यायचा होता एक महिना.!!
10 तरी नावे हवीत
तर मुलीने तेथे नाव दिले
आणि सलग महिनाभर येत होती वर्गाला....


आता सुध्दा 

शृंगेरीला गीता म्हणायला जाणार तर.... 

मी कसे म्हणते हे बघायला यायची माझ्या दोन्ही मुलांची इच्छा आहे.
पण तिकडे म्हणताना.. फक्त म्हणणारे असतात. 
बाकी कोणी नाही

रत्नागिरी येथील टिळकांचे घर

भगूर येथील सावरकर यांचे घर

बघण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली

अक्कलकोट येथे जायचे होते,

 तर ते दक्षिण यात्रा केली तेव्हा पूर्ण झाले


आणि म अनेकवेळा गेलो.
त्यावेळी अनेक ठिकाणे बघितली

कन्याकुमारी... विवेकानंद स्मारक

वाह...
बराचसा महाराष्ट्र फिरलो. 
मुख्य आमची कुलदेवता....
लोक लग्न झाले कि लगेच जातात.
आम्हाला मात्र १६/ १७ वर्षे लागली जायला.
आणि हो भारत सुद्धा.! 
बऱ्याच राज्यांना भेटी दिल्या... 

गोवा 

 

तेथील लोक त्यांचे जीवन जवळून बघता आले.

सिमला कुलू मनाली,

हैद्राबाद, बडोदा, बंगलोर म्हैसूर उटी

थोडेसे दिल्ली


अष्टविनायक...

 प्रथम संपूर्ण कुटुंबाबरोबर 
आणि नंतर सुद्धा तीनचार वेळा तरी गेले... 

ज्योतिर्लिंग.... खरतर १२ 

पण बरीचशी योगायोगाने पाहीली.

लेह लडाख... वाह 

किती लहानपणापासून लडाख बद्दल आकर्षण होते...



 ते इतक्या वर्षांनी पूर्ण झाले २०१८ मे/ जून मध्ये.!

जंगल सफारी ... वाघ सिंह बघावे

ताडोबा  माया वाघीण


गीर सफारी

झाले कि पूर्ण.!!!
अशा अनेकोनेक गोष्टी होत्या त्या झाल्या पूर्ण

कॉम्पुटर शिकले...

 माझ्या मुलामुळेच

संस्कार भारती रांगोळी...

 

 कुठे बघितली कि... 
आपल्याला पण यायला हवी असे वाटे...
 केला वर्ग, खुप खूप प्रयत्न आणि काढू लागले मोठ्या मोठ्या....

अंध मुलांसाठी काही करावे वाटत होते 

आणि सहज कोणी विचारले करणार का
त्या शाळेत गरज आहे रिडर्सची
आणि झाली कि बकेट लिस्ट पूर्ण.!
(असेही मी अकरावी मध्ये असताना हे काम करत असे. )
 
चार लोकांसमोर उभे राहून बोलायचे 

स्पर्धेत भाग घ्यायचा.... 

गीता म्हणू लागले आणि स्पर्धेत भाग घेतला... 
मिळाली तीनचार बक्षिसे...

सुडोकू.... 

काय आहे कसे खेळतात..
शिकवले मुलीने...
आणि घेतला भाग.. आता मिळते बक्षीस.!!! नेहमी च.!

निरनिराळ्या यात्रा 
काशी 
कुरवपूर येथे तर दत्तयाग केला 
 

पिठापूर 
जगन्नथ पुरी 
अशा अनेक यात्रा 
गणेश याग.. वाडीतच 
याचे यजमान पद 
 

रायगड बघायला जायचा आहे..

बघू कधी होतंय पूर्ण
असे अनेक असेलच.. पण रायगड हे प्रमुख आहे खरेतर....

ताजमहाल बघायचा आहे.

चित्र काढायला यायला हवे.
गाणे जरा बऱ्यापैकी चार लोकांसमोर म्हणता यायला हवे.
चार लोकात बरा डान्स करायला यायला हवा... 
किती किती काय काय वाटत असते ना.!!!

एक बकेट लिस्ट हा सिनेमा बघितला आणि मनात किती गोष्टी आल्या.!!


आणि आता जे ब्लॉगवर लिहिते...
फोटो असतात रंगीबेरंगी दिसते लिहिलेले 
ते सगळे माझ्या मुलांनी शिकवले.

माझा जसा ब्लॉग आहे तसा तुमचा सुध्दा असावा असे मला वाटते.

कधी लिहीन असे वाटले नव्हते,

 पण... योगायोगाने लिहू लागले,
 ते तुम्हा सर्वांच्या प्रोत्साहन असल्याने....
मनात येणारे तुमच्या बरोबर शेअर करावे असे वाटते....
******************************
अनेकोनेक गोष्टी पूर्ण झाल्या 
पूर्ण होत आहेत.  नवनवीन गोष्टी 
शिकाव्या पाहाव्या असे वाटते 
रोज नवा दिवस
 नवे काही असतेच पूर्ण होते,
 पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.

No comments:

Post a Comment