20 डिसेम्बर
नाही कुठे शाळा
नाही कुठे सर
कुठे झाली असतील
पाखरे इंजिनिअर???
कबुतर...
काल मरिन लाईन्स येथे गेलो होतो.. गीता प्रेस या दुकानात जायचे होते.
बाहेर उभे असताना सहज लक्ष गेलं ते एका कबुतराकडे... त्याच्या चोचीत वाळकी काडी.!
बघितले तर मी जिथे उभी होते तिकडे वरच ते कबुतर घरटे बांधत होते ती काडी तिकडे ठेवली आणि ते भुर्रकन समोरच्या रस्त्याला गेले. त्या झाडाखाली वाळलेल्या काड्या असाव्यात.. परत एक काडी घेऊन ते आले...
कसे कळते पक्ष्यांना???
कि येथे आपल्या घरट्यासाठी वाळक्या काड्या मिळणार आहेत?
आता पुढे त्या काड्यांवर मऊ पिसे पसरली जातील, घरटे अंडी घालण्यास योग्य झाले कि यथावकाश अंडी घातली जातील आणि ती उबली कि त्यातून छोटी छोटी पिले येतील एक पिलांचे रक्षण करणार आणि दुसरा खाद्य आणून पिलांना भरवणार.!
( या पिलांना फार थोडी पिसे असतात, आणि ती इतकी सुंदर दिसत नाहीत. हळूहळू ती सुंदर दिसू लागतात )
यावेळी कोणीही त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही ते कबुतर एकदम क्रुद्ध होते, आणि त्याचा तो अवतार बघून आपली घाबरगुंडी होते आणि आपला स्वर त्रासदायक होतो कधी हि पिले मोठी होतील अस झालाय अगदी.!!! सारखे त्यांचे ओरडणे....( हूं हूं )
खरतर गुटूर्गु गुटूर्गु...सुरु असते....
त्यांची विष्टा...
अगदी नको होते...
पण... घरटे बांधण्याचे त्यांचे कष्ट... छोटी पिले होण्यापर्यंतचा प्रवास,
कबुतर हा पाळीव पक्षी आहे. छोट्याशा लाकडी खोक्यात यांना ठेवतात सकाळी यांना मोकळे सोडतात, संध्याकाळी आपल्या घरट्याकडे ती परत येतात.
पांढरी शुभ्र कबुतरे.. स्वतंत्र दिनी उडवली जातात (शांतताप्रिय )
थोडा करडा रंग राखाडी रंग सुद्धा असतात रंगाच्या वेगळे पणामुळे ती लक्ष वेधून घेतात.
बाकी नेहमी दिसणारी कबुतरे... त्यांची मान , याचा रंग छानच दिसतो.
चालताना हा पक्षी मान पुढे मागे करत चालतो.
कबुतर शांतता प्रिय पक्षी, फार फार पूर्वीचा पोस्टमन.... !!!
डाळ वाळत ठेवली आणि त्याची राखण केली नाही तर ती डाळ फस्त करणारा...
जोंधळे चणे अगदी आवडीने खातात.
आणि हो थोडा बावळट पक्षी...
मांजर दाणे टिपणाऱ्या कबुतरांची चटकन शिकार करते...
लहानपणी... एक ख्रिश्चन माणूस बंदूक घेऊन यायचा आणि कौलाच्या , घराच्या वळचणीला असलेल्या कबुतरांना गोळी घालायचा.... चार पाच तरी कबुतरे शिकार करायचा....
असो...
कबुतरे हि दाणे टिपती
मला पाहता उडून जाती
उंच घराच्या कौलावरती
शिवाशिविचा खेळ खेळती
कधी घराच्या आडोशाला
त्यांची भरते गायन शाळा
पंख फडफडवूनी
म्हणती गाणी हूं हूं करुनी
आठवते ना हे बडबडगीत
*******************
No comments:
Post a Comment