Sunday, 17 February 2019

भगवद्गीता स्पर्धा.. अध्याय १५ व १६

एस एन डी टी 

भगवद्गीता स्पर्धा..
अध्याय १५ व १६
१६ फेब्रुवारी  २०१९
शनिवार 
वेळ दुपारी बारा वाजता.

SNDT कॉलेज मध्ये
स्पर्धा प्रथमच घेतली होती.
उत्साह खूपच होता...
 कॉलेजचे कुलपती 
श्री दीपक गोविंद देशपांडे
 उत्तम बोलणारे होते... 
तसेच त्यांनी दोन विषयात पीएचडी केली आहे,
 आता त्यांना संस्कृत घेऊन पीएचडी करायची आहे.
 त्यांनी संस्कृत अभ्यास सुरु केला आहे.
   एक फेब्रुवारी पासून ते कुलपती या पदावर रुजू झाले आहेत.
पण ते एका कार्यक्रमा मध्ये होते, त्यांना यायला उशीर झाला.
कार्यक्रम कॉलेज मध्येच होता. 
त्यांना उशीर झाल्यामुळे स्पर्धा खोळंबली....

दोन्ही परीक्षक मस्त होते.

मी दोन्ही अध्याय म्हणणार होते.
मी अध्याय, श्लोक म्हटल्यावर 

*शोभनं अती शोभनं..* असे म्हणाले... 

आणि सर्वांनी छान झाले हे सांगितले.
*(हे दोन शब्द म्हणजे माझे बक्षीस)*

ज्यांना पहिले बक्षीस मिळाले... 
त्या आमच्या वाडीतीलच.... 
त्या चालित म्हणतात
 त्या शृंगेरीला जाऊन आल्या आहेत...
 त्यांना शोभनं बहु शोभनं असे म्हणाले.
तेव्हाच पहिले बक्षीस निश्चित झाले,
 दुसरे आणि तिसरे बक्षीस सुध्दा आम्हाला कळलेच... 
(पहिली तिन्ही बक्षिसे सरांच्या विद्यार्थिनी)
आणि उत्तेजनार्थ दिले ते मात्र आश्चर्यकारक...

आणि विभागून वगैरे नाही
 कारण जे सन्मान चिन्ह दिले ती बरोबर ५ होती. 
पण सुंदर ऐकायला मिळाले.. मी म्हटले याचा मला आनंद मिळाला.
त्यांनी दोन गट केले लहान आणि मोठे , एकूण ७५ स्पर्धक होते
आमच्या गटात 50 तरी होतेच.

१५ किंवा १६ वा अध्याय, 
दोन्ही, 
किंवा
कोणताही एक अध्याय... 
अशी स्पर्धा होती.

असे दोन वेगळे गट करायला हवे होते.
तरी अधून मधून श्लोक विचारले म्हणून 4 पर्यंत स्पर्धा संपली.
 त्यानंतर बक्षीस समारंभ,

बक्षीस समारंभासाठी
 कुटे मॅडम ज्या कॉलेज च्या रजिस्टार आहेत,
 त्या फारच सुंदर बोलल्या
अगदी थोडक्यात...

* फक्त एक अध्याय म्हणणारे
 आणि 
दोन अध्याय म्हणणारे असे दोन गट केले असते तर... 
स्पर्धा वेळेत संपली असती.

स्पर्धेची जागा, हॉल खूप छान सजवला होता
एक प्रोजेक्टर होता. 
त्यामुळे भिंतीवर सतत एक कुठलातरी गीतेतील श्लोक आणि 
एखादे कृष्णाचे चित्र सतत दिसत होते.
 भिंतीवर चित्रे आणि सुभाषिते त्याचे अर्थ असे लावले होते 
एका कोपऱ्यात सरस्वती देवीची मूर्ती होती.

दरवाजातून आत जाताना 

आम्हाला कुंकुम तिलक (ओले) आणि हळद लावत होते.
स्पर्धेसाठी वातावरण खूप छान होते...
तेथील शिक्षिका / छात्रा
सारखा पेहराव केला होता
 (हळदी साडी आणि मरून रंगाचा ब्लाऊज)
मस्त वाटत होते.

तेथे जे मान्यवर आले होते
 त्यांना श्रीकृष्णाला आवडणारी तुळस, 
याची रोपे देऊन सत्कार केला. 
तर कुलपती... यांना शाल श्रीफळ... 
आणि त्यावेळी आम्हाला
 गीतेतील एक श्लोक म्हणायला सांगितला,
 आम्ही 

कर्मण्येवाधिकारस्ते

मां फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते

सङ्गोऽस्त्वकर्मणि ।।


हा श्लोक म्हटला.

आणि ओझा मॅडमच्या वेळी ...

वासांसि जीर्णानि यथा विहाय

नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।

तथा शरीराणि विहाय जीर्णा --

न्यन्यानि संयाति नवानि

देही ।।

हा श्लोक म्हटला..

कार्यक्रम झाल्यावर ... 
होता, अल्पोपहार.! 

प्रथमच स्पर्धा घेतली होती तरी उत्तम व्यवस्था होती. 
पण वेळेचे नियोजन ....

पण स्पर्धेला जाऊन आनंद मिळाला... 
अनेक जणांना ऐकता आले.
कॉलेज वर्गात बसता आले. 
कॉलेजच्या खास खुर्चीत बसता आले...
स्पर्धा घेण्यासाठी किती मेहेनत असते,
 कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून कराव्या लागतात ते कळले... 

असे वाटले जर...
परीक्षक जर समोर असते तर....
ते आमच्या बाजूला होते
कोणी बोलले तर... 
असे वाटे आपल्याला ते श्लोक सुरुवात सांगत आहेत 
म बाजूला वळून बघून विचारावे लागत होते...

असो ... 

मस्त झाली स्पर्धा. 

मी धिटाईने म्हटले. 

मला म्हणताना आनंद मिळाला 

तसा समोर बसलेल्यांना 

आणि परीक्षकांना सुध्दा मिळाला.!!!


No comments:

Post a Comment