नारळवडी करायला अगदी सोप्पी.
नारळ जितका असेल तेवढी साखर घ्यायची
थोडे
तूप काढइत घेऊन त्यावर नारळ म साखर असे घालून हाताने एकत्र करायचे आता
त्यात दूध घालून गॅस वर ठेवून ते मिश्रण ढवळत राहायचे साखर विरघळली कि
त्यात दुधाची पावडर दुधात मिक्स करून घालायची आता ढवळायचे मिश्रण
पातेल्याला सोडून मध्यभागी गोळा होऊ लागेल म वडी होईल हे निश्चित.! आता गॅस
बंद करून पातेले खाली उतरवून सारखे ढवळत राहावे.... म ताटाला तुपाचा हात
लावून मिश्रण पसरावे ताटावर
हात भाजेल तर
हातात प्लास्टिक पिशवी लावावी.
वाटीच्या बुडाला तूप लावून पसरावे
किंवा ताट उपडे ठेवून त्यावर मिश्रण पसरावे व लाटणे फिरवावे...
मिश्रण सुकण्या आधी झटपट पसरावे.. व वड्या कापाव्या
जर रंगीत आवडत असतील तर....
केशर इसेन्स मिळतो तो घालावा.
किंवा बिट, आंबा मावा घालावा.
खाण्याचा रंग घालावा .
खाण्याचा रंग मिश्रण घोटताना घालावा.
नाहीतर कडू लागेल.
( मी मात्र कधीच रंग घालत नाही. )
माझ्या सासूबाईंनी तिरंगी वड्या केल्या होत्या
फारच सुंदर
म मी एकदा करून बघितल्या होत्या
त्यावर्षी राखी पोर्णिमा आणि स्वतंत्रता दिवस
एकाच दिवशी आले होते
मी प्रसादाचे नारळ मिळाले कि करते
म्हणजे कोणी आले कि प्रसाद म्हणून देता येते
हे मदत करतात..
मिश्रण थापणे
वडी कापणे....
आणि चार चार वड्या पिशवीत भरणे...
सर्व करतात
कोणतीही लाडू वडी करताना सम प्रमाण घ्यावे
आणि वडी पडणार नाही असे वाटले तर...
वरून पिठी साखर घालावी म्हणजे हमखास वडी होते...
पिठी साखर घातली कि घोटावे आणि ताटावर किंवा ट्रे मध्ये पसरावे .
मी मात्र कधी घालत नाही
अशीच वडी होते
दूध पावडर घातली कि सुंदर लागते. खवा घातला असे वाटते .
वडी करण्यासाठी :
प्रथम दोन वाटी खोवलेला नारळ आणि दोन वाटी साखर
एक वाटी दूध, थोडे तूप अगदी एखादा चमचा
आणि 10₹ ची दूध पावडर आणि एक वाटी दूध
वेलची पावडर किंवा केशर इसेन्स
हे मिश्रण तयार झाले कि घालावे.
कोणतीही वडी करताना चांगले घोटावे
साधारण 25 वड्या होतील बेताच्या आकाराच्या
वडी पडेल असे वाटले कि पसरावे
घाई असेल तर मुळी च करूनये.
शांतपणे करण्याचा पदार्थ आहे
विकत मिळते तो नारळी पाक असतो बहुतेक....
अगं नारळवडी करायला अगदी सोप्पी
No comments:
Post a Comment