Thursday, 30 August 2018

नर्मदे हर !



20 ऑगस्ट रोजी थोडा पाय दुखावला..!
म घरातच बसून होते
सहज व्हाट्सअॅप मेसेज बघत असताना.. पायी नर्मदा परिक्रमा केली त्यांची लिंक दिसली
ऐकायला सुरु केली, ओघवती भाषा शैली, अगडी खिळवून ठेवले सगळे भाग एका बैठकीत ऐकले.!!!
गुरुवार चा दिवस आणि अचानक श्रीगुरुदेव दत्त यांचे अप्रतिम दर्शन.!
म वहिनीला, आणि अजून काही मैत्रिणींना लिंक पाठवली आणि म्हटलं....
 आज हे तू ऐकावं
अस मला वाटतय...

खूप छान अनुभव आहे

त्यांच्या तोंडूनच ऐक
आणि बघ.
अजून एका भागात 
 गजानन महाराज
आणि अजूनही सुंदर
असे होते तो भाग लिंक पाठवली.
 संपूर्ण 18 भाग आज ऐकले. २३ ऑगस्ट याच दिवशी.!!!



[8/30,  एक मज्जा.....
श्रावण सुरु आहे
नर्मदा परिक्रमा....
३० ऑगस्ट या दिवशी 
घरात अनेक दिवस असलेले पुस्तक वाचायला घेतले.
दुसरी सुरु आहे माझी
पहिली you tube वर ऐकली
ती पायी होती
ओघवती भाषा शैली
आणि आता सुरु आहे ती सायकल वरून...
पुस्तक वाचन काल सुरु केलाय आज होईल बहुतेक पूर्ण
आहे ना कमाल
पाय ठीक नाही आणि मानस नर्मदा परिक्रमा दोन झाल्या...
या पुस्तकात वाहन प्रदक्षिणा....
यांचे नंबर  आणि बरीच माहिती
एक दिवस परिक्रमा
हि माहिती आहे
बघू
योग असेल तर....
जाऊ... है ना

 आताच पुस्तक वाचून पूर्ण झाले
गेल्या गुरुवारी.... 
मी यू ट्युब वर ऐकली.नर्मदा परिक्रमा ऐकली. भाषा ओघवती आहे अनुभव खूपच सुंदर आहेत. अगदी पूर्ण ऐकल्याशिवाय बंद करता आले नाही ऐकणे.!!!

आणि काल पुस्तक वाचू लागले ते आज गुरुवार पूर्ण झाले.

इंदोर येथे काही वर्षांपूर्वी गेले तेव्हा ओंकारेशवर येथे गेले, अमलेश्वर दर्शन, मैया च्या तीरावर गजानन महाराज मठ.!
असे सुंदर दर्शन झाले
मुख्य मैय्याचे दर्शन.!

महेश्वर येथे नर्मदा मैया, सुंदर घाट संध्याकाळची वेळ, आणि सुंदर असे शंकर मंदिर, मन भरून पावले.!

::::::::::::::::::::::::::::::::::::

 नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे हर !

एक सुंदर पुस्तक वाचायला घेतले काल 8 वाजता रात्री.
खाली ठेवावे वाटत नाही.!

सायकल वरून नर्मदा परिक्रमा...

ज्यांनी लिहिलय त्या जावयाच्या मित्राच्या आई आहेत.
आता लेह ट्रेक साठी हि दोघे त्यांच्या बरोबर गेली आहेत...!

हे पुस्तक गेले वर्षभर कपाटात होते,
गीता पाठांतर करत होते त्यामुळे हात लावत नव्हते.
आणि कालपासून 102 पाने वाचून झाली आहेत.

सुंदर लिहिलय.!


काही ठिकाणी मी जाऊन आले आहे.
म थोडे त्या आठवणीत रमते...
काही ठिकाणी अगदी त्या गावाला गेले
पण... तेथे नर्मदा मैया चे दर्शन घ्यायला का गेले नाही???  गुजराथ येथील सिद्धपूर.! 
जायला हवे होते.. असे वाटले..

::::::::::::::::::::::::::::::::::::

" त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे "

नर्मदे ऽ ऽ ऽ धर्मदे ऽ ऽ ऽ शर्मदे ऽ ऽ ऽ

हर, हर, हर !!!

○○○○○○○○○○○○○


 श्री नर्मदेचा गायत्री मंत्र

ॐ रुद्र देहायै विद्महे
मेकलकन्यकायै धीमहि
तन्नोरेवा प्रचोदयात् !!

*******************

No comments:

Post a Comment