Wednesday, 15 August 2018

पत्नी होना आसान नहीं होता...

 
एका मैत्रिणीने खालील मेसेज पाठवला .!

पत्नी होना आसान नहीं होता...

अपनी इच्छाओं को मारकर घर के हर सदस्य को खुश रखना पड़ता है...

इसलिए ध्यान रखें.. कि...

जब वह  Restaurant में  मेन्यू कार्ड से कोई  dish पसंद कर रही हो,
तो 
उसे पसंद करने दें....

घर में हर रोज
हर बार का खाना बनाने के लिये वह अपना काफी समय सिर्फ इसलिये देती है
कि क्या बनाना है, 
कितना बनाना है और ...
किसके लिये बनाना है...!

जब वह बाहर जाने के समय तैयार होने के लिये time ले रही हो ... तो लेने दें...
उसने अपना time 
आपके press किये कपडो़ं को जगह पर संभाल कर रखने में, 
socks  और रूमाल संवार कर रखने में दिया है...!

वह अपने बच्चे को संवारने के लिये भी बहुत मेहनत करती है, ताकि ...
वह अडो़स पडो़स के सब बच्चों से अच्छा दिख सके...!

जब वह TV पर अपना मनपसंद ...
हमारी नजर में बेसिरपैर का  serial देखती है, तो देखने दें,
उसका उस serial  में तो ध्यान आधा ही रहता  है...
बाकी का ध्यान तो दिमाग में चल रही घडी़ पर रहता है,
आपके 
आते ही वह अपना मनपसंद serial अधूरा छोड़ कर kitchen की तरफ चल देती है....!

जब वह breakfast  बनाने में time लगा रही हो तो उसे लगाने दें,क्योंकि ...
वह सबसे बढि़या और कुरकुरे toast सबको दे रही है और 
ज्यादा सिंके व जले toast खुद के लिये अलग कर रख रही है...!

जब वह चाय का कप हाथ में ले कर खिड़की के बाहर शून्य में निहार रही हो, तो उसे निहारने दें...
रात को किचन का काम निबटा कर सोने जाती है तब 
लग व्हाटस्अप फेसबुक पर अपना मन बहलाती है तो उसे टोके नही ... उसे शांति मिलेगी 

ध्यान रहे.... येे उसकी अपनी जिंदगी है, 
उसने अपनी जिंदगी के अनमोल व अनगिनत घंटे आपको दिये हैं....!

अब यदि वह अपने जिंदगी के कुछ पल खुद के लिये लेना चाहती है तो लेने दें...!

उसका जीवन दूसरों के लिये  भागादौडी़ में ही बीत रहा है....
कृपया  उसे और ज्यादा तेज भागने के लिये मजबूर या निराश न करें.......!!

Salute every Women
 Regards,
      
   नारी शक्ति को नमन
 ( मला काय सुचले ते ... तिच्या बरोबर गप्पा )

माझ्या माहितीतील कुणी पुरुष मित्र असतील तर त्यांना मी हे सांगते
तुम्हाला कंटाळा येतो बाहेर खाण्याचा
पण कधीतरी आपण होऊन घरातील 
स्त्रीला
बाहेर न्या जेवाखायला.
 कधीतरी बरे वाटते.!

रोजच्या रोज साफसफाई करतो पण
महिन्यातून एकदा अजून छान साफसफाई करतो
म स्वयंपाक करून जेवणे..

थोडे थकायला होते,
तेव्हा बाहेर खायला बरे वाटते.

बाहेरगावी जातो तेथून आल्यावर दुप्पट काम असते.
म काही नाश्ता बाहेरून बरा वाटतो.!

पाहुणे मंडळी येणार तर... बरेचसे पदार्थ घरी करतो, नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात करतो.
म पाहुणे गेले कि दुसऱ्या दिवशी बाहेर जायला बरे वाटते.

पाहुणे येणार तर एखाद दुसरा पदार्थ बाहेरून आणला तर....
आपले थोडे काम कमी होते
आपण फ्रेश राहतो.
पाहुण्यांची उठबस करायला...

मुलांना आवडणारे पदार्थ जसे पिझ्झा, बर्गर दाबेली पावभाजी असे पदार्थ नेहमी घरी करतो.
पण कधी बाहेरून पण बरे वाटते,

पुलाव बिर्याणी यासारखे पदार्थ घरी करतो,
पण एखाद वेळी बाहेरून आणला 
घरच्यांना टेस्ट आवडली तर त्यात काय घातले हे पाहण्यासाठी, टेस्ट कशी पाहिजे हे पाहण्यासाठी बाहेरून आणावे....

एखादे हॉटेल विशिष्ट पदार्थासाठी प्रसिद्ध असते, आपण जवळ राहत असलो तरी आपण तेथून कधी आणले नसते किंवा गेलो नसतो,
तर असे होऊ नये म्हणून तिकडे जाऊन खावे...

तरी घरची गृहिणी तिला घरीच करण्याची आवड असेल, तर मात्र बाहेर जाऊ नये...
आईला मुलाने पोटभर चांगले खावे , आवडते करून खाऊ घालावे असे वाटते... 
त्यात फायदा किती होणार हा विचार नसतो,
त्यात माया ममता प्रेम असते. आपल्या माणसांनी आवडीने खावे केलेल्या पदार्थाला दाद दयावी एवढीच अपेक्षा असते,

खाताना, जो पदार्थ केला आहे तो अमुक एका ठिकाणी कसा चांगला मिळतो ते सांगू नये एवढीच अपेक्षा असते... करणाऱ्या स्त्रीची.!

पूर्वी सगळे त्या त्या ऋतू , सण या नुसार पदार्थ केले जात, त्यामुळे ते आवडीने खाल्ले जात. बाहेर खाण्याची पद्धत नव्हती...

आता श्रीखंड हवे तर... आण छोटी डबी आणि खा, असे असते
पूर्वी दूध आणून त्या पासून श्रीखंड केले जाई म त्याची किंमत होती
आता एक फोन केला कि घरी हवा तो पदार्थ!!

आणि आता घरोघरी एकटी स्त्री असते, वेगळ्या चवीचे खायला तिला मिळत नाही,
म्हणून तरी बाहेर जावे कधीतरी...

बाहेर खातो पण असे लक्षात येते कि
पाणीपुरी, भेळ या सारखे पदार्थ एक प्लेट खाल्ले कि पोट भरते,
पण घरी केले कि.... अजून सगळेच आवडीने खातात

बाहेर पदार्थ खाल्ले कि काही जणांना गॅसेस किंवा ऍसिडिटी चा त्रास होतो...

खूप सारे पैसे होतात बाहेर खाल्ले कि...

एवढासा भात प्रकार पण किती पैसे असतात त्याचे
पण कंटाळा आला तर...
कधीतरी बरे वाटते.

काही प्रकार घरी केले जात नाहीत जसे कि स्टार्टर्स.... म हॉटेल मध्ये ते खावेत...

काही वेळा घरात अगदी दोन माणसे... म तळणी घालायचा कंटाळा येतो,
अशा वेळी बाहेरून दोन वडे आणून खावेत..

काही वेळा घरात खूप माणसे असली तरी बाहेरून आणणे बरे वाटते... खूप काम पडते आणि खाण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात करावा लागतो...

काही पदार्थ बाहेर महाग का मिळतात? हे बघण्यासाठी घरी करून बघावेत, म्हणजे त्यामागे किती मेहनत आहे ते कळते.... आणि घरातील दोन व्यक्तीसाठी घरी करण्यापेक्षा बाहेरून बरा वाटतो.
**********************************

No comments:

Post a Comment