एक शिरा... किती प्रकारांनी आपल्या समोर येतो..
पण
प्रसादाचा शिरा याची गोडी काही अविटच.!!!!
आई भूक... अस लहानपणी म्हटलं कि थांब हं, पटकन शिरा करते..
असं म्हटलं कि आम्ही भावंडं एकदम खुश व्हायचो.!
आणि तुपावर रवा भाजला जात असताना
जो काही भाजलेल्या रव्याचा वास सुटायचा कि...
भूक खवळायची..
आणि त्यात घालण्यासाठी वेलची पावडर करायला घेतली कि आजूबाजूला पण कळे...
आज शिरा करतायत यांच्याकडे!
जेव्हा
उभ्याचा ओटा नव्हता तेव्हा आई खाली बसून रवा भाजायची,
आणि जेव्हा उभ्याचा
ओटा झाला तेव्हा आई ओट्यावर बसून रवा भाजत असे,
आणि रवा भाजताना आई घामाघूम
होत असे,
पण ती मन लावून रवा भाजे
ते काम करताना ती सुंदर दिसे.!
करता
करता आई सहज काही सांगत असे,
रवा छान गुलाबी भाजला गेला पाहिजे
म्हणजे तो
चिकट होत नाही,
रवा छान फुलतो, गोड पदार्थ असला
तरी त्यात कणभर मीठ घालावे,
केशर घालताना वाटी किंचित गरम करावी
म त्यात केशर काड्या घालाव्या,
म्हणजे
ते छान चुरले जाते आणि दुधात एकत्र पटकन होते,
साखर विरघळली कि केशर वेलची
केले बेदाणे जे काही घालायचे ते घालावे
आणि गॅस बंद करून त्यावर झाकण
ठेवावे.
आणि असे व्हायचे कि
कधी एकदा शिऱ्याची ताटली
समोर येते
असे होऊन जायचे.
ताटलीत नुसता शिरा कधीच नसायचा,
बरोबर पोहा
पापड भाजून आणि लिंंबु लोणचे.!
अहाहा... तो जो काही (स्वर्गीय ) आनंद
व्हायचा...
पटकन कर
शिरा, अचानक कुणी आलं कर शिरा
, मधली वेळ कर शिरा...
पण हा शिरा वेगळ्या
वेगळ्या स्वरूपात समोर येई.
कधी केशरी शिरा,
कधी बदाम बेदाणे घालून
तर कधी भाजताना केळे घालून..
पण ताटलीत असे तो मात्र छान मूद करून लोणचे पापड असलेले..
काही जणांना नुसते पाणी घालून केलेला शिरा आवडतो.
कुणाला प्रसादासारखा शिरा आवडतो..
काहींना केळे घालून शिरा आवडतो..
पण (काही म्हणा पूजेच्या वेळी असणारा शिरा वेगळीच चव असते.
प्रसाद म्हणजे "प्रभूंचे साक्षात दर्शन.!" )
आणि हा अगदी इवलाच मिळतो... पोटभरीचा नसतो.!
------------------------------ ----------------
अक्कलकोट येथे
अन्नछत्र मध्ये जो शिरा...
भात वाढण्याच्या वाढण्याने
(म्हणजे तसा तो खूप असतो)
गरम गरम शिरा वाढतात... व्वा.!
असा अप्रतिम शिरा घरी केला तरी मात्र होत नाही.
******************************
साजूक तूप, रवा साखर
आणि दूध/पाणी सर्वाना सारखे दिले तरी
प्रत्येकीचा शिरा वेगळा होईल...
******************************
आणि या गोडाच्या शिऱ्याची/ सांज्याची पोळी..
गूळ घालून बारीक रव्याचा सांजा करायचा.
मस्त .. एक पक्वान्न
पूर्वी शिरा पुरी एक पक्वान्न होते.
लहानपणी ट्रिप म्हणजे गोडाचा शिरा आणि
तिखटमिठाच्या पुऱ्या असा डबा असायचा...
:::::::::::::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::
हा जसा पटकन होणारा शिरा तसा...
श्रीपाद श्रीवल्लभ यांना आवडणारा ... हलवा
म्हणजेच कणकेचा शिरा
कणिक भरपूर तूप घालून छान भाजायची
आणि साखर किंवा गुळ घालून शिरा करायचा..
हा शिरा हातांनी खाण्यात वेगळीच मजा आहे.!
****************************** *
गव्हाच्या जाड रव्याचा/ सोजीचा शिरा...
थोडे वेळमोडे काम .
छान तुपावर हा रवा भाजायचा ,
वेळ लागतो भाजायला...
आणि रवा छान शिजला कि गूळ घालायचा...
मस्त लागतो..
:::::::::::::::::::::::::::::: ::::::::::::::::::::::::::
शिऱ्याची वेगळी रूपे
No comments:
Post a Comment