Thursday, 23 November 2017

हैद्राबाद ते मुंबई


आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान घरी आलो

काल एअरपोर्ट वर साडेअकराच्या दरम्यान आलो.... विमान पहाटे चार चे होते

खरतर 2 वाजता आलो असते तरी चालले असते. 
पण आधीच येऊन बसलो..
बसून बसून झोप काढत होते मी....
गेट नं 22 येथे विमान लागणार होते.
म सव्वातीन वाजता घोषणा झाली... कि विमानात बसून घ्यावे....

सर्वजण विमानात बसलो... 
खूप जिज्ञासा होती रात्रीचे आकाश कसे दिसते... 

पण विमानाने झेप घेतली तेव्हा संपूर्ण हैद्राबाद निद्रादेवी च्या आधीन असेल आणि रस्त्यावरील सगळे दिवे मात्र सुंदर दिसत होते.... 
जसे गाडीने प्रवास करताना घाटावर पोहोचलो कि खाली गाव दिव्यांचे दिसते अगदी तसेच...

विमानातून आकाश, रात्र शांत दिसत होती
पंखावर असलेले दिवे खूपच प्रकाशित दिसत होते... म आकाशात मला काहीच दिसले नाही
झोप पण येत होती
प्रवास मात्र सव्वा तासाचा होता... मस्त झोप काढली
जेव्हा मुंबई आले तेव्हा हि मुंबई शांत निद्रादेवी च्या अधीन आणि दिवे मात्र संपूर्ण मुंबईचे दर्शन देत होते... दिवे चमचम करत होते....

Tuesday, 21 November 2017

बिर्ला मंदिर


व्यंकटेश दर्शन

हॉटेल जवळच बिर्ला मंदिर आहे. पण जायचा योग येत नव्हता रात्री लवकर बंद होत असावे... आणि सकाळी आम्ही कुठेना कुठे जाण्यासाठी लवकर बाहेर पडत होतो... असो

पण आज योग आला...

रात्री आठ वाजता बिर्ला मंदिर बघायला गेलो...

कोणी म्हणे 25 पायऱ्या आहेत पण नेट वर दाखवल्या प्रमाणे 150 पायऱ्या... पण थोड्या पायऱ्या चढल्या कि सरळ चालणे यामुळे इतक्या पायऱ्या चढलो असे वाटले नाही.

मध्ये मध्ये गणपती, हनुमान, देवी., 

शंकर भगवान अशी मंदिरे आणि संपूर्ण संगमरवरी,

आता होते ते पद्मावती मंदिर... म्हणजे आता होणार व्यंकटेश दर्शन.!

मूर्ती भव्य आहे.!

वाह.... इतके सुंदर आणि जवळून दर्शन झाले..

तत्पूर्वी गरुड दर्शन घेतले.


काल सकाळी मनात एक विचार आला होता... 

हैद्राबाद येथे आलो आहोत तर तिरुपती बालाजी येथून किती लांब आहे?? काही वर्षांपूर्वी दर्शनासाठी म्हणून निघालो पण... काही कारणाने अर्ध्या रस्त्यातून परत यावे लागले होते...

देवाजीच्या मनात असावे लागते.. असे काहीसे म्हणतात..

(पण काही वर्षांपूर्वी मी एकटी एका ग्रुप बरोबर छान दर्शन घेऊन आले आहे)

असो, आज इथे सुंदर  व्यंकटेश दर्शन झाले.!

व्यंकटेश दर्शन होताच वाह.! असे सहज उद्गार आले..

मनातील इच्छा पूर्ण झाली.!


नेरूळ इथे असेच सुंदर तिरुपती मंदिर आहे.


गिरगावात फणस वाडी येथे सुंदर मोठे तिरुपती मंदिर आहे. 

येथील वैशिष्ट्य..येथे भिंतीवर संपूर्ण गीता लिहिली आहे..



डोंबिवलि येथे असेच सुंदर मंदिर आहे


माटुंगा सेंट्रल येथील परिसरात साऊथ कडील अनेक मंदिरे पहावयास मिळतात.


पुण्याहून सातारा रोड येथे फारच सुंदर मंदिर आहे. 

दिवसाच्या तिन्ही प्रहरी जाण्याचा योग आला, निसर्ग रम्य परिसर, उत्तम स्वच्छता... पुन्हा पुन्हा जावे वाटते..


๑ ๑๑๑ ๑๑๑ ๑๑๑ ๑๑๑ ๑


Monday, 20 November 2017

रामोजी सिटी


आता 7.30 ला रामोजी सिटी येथे जाण्यासाठी निघू

नाष्टा होईल इकडेच हॉटेलवर
सुंदर नाश्ता असतो...

[11/20, 9:32 AM]  
बरोबर वेळी पोहोचलो रामोजी सिटी

Worlds big film citi

या सिटी चे नाव....

गिनीच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे...


सुंदर receprion हॉल..
येथेच आम्हाला आमचा नंबर दिला 
नाष्टा पॅकेट दिले.

येथे आपल्याबरोबर आपली पाणी बॉटल न्यायला देतात.

खाद्य पदार्थ आपले न्यायला देत नाहीत.
चला luxzari सुरु झाली.
सुंदर स्वच्छ गार्डन्स.. इमारती, वर्णन

जेवढे गाडीत बसून सिटी बघितली त्यापेक्षा गाडीतून उतरून जास्त बघितली.
[11/20, 6:12 PM] निघालो
रामोजी सिटी हुन

मस्त 
प्रेक्षणीय, नीटनेटकी
वेळ, शिस्त, 
पर्यटक सुध्दा व्यवस्थित शिस्त पाळणारे
कोणतीही गडबड गोंधळ नाही

पक्षी, इतके छानच कि अचमबीत झाले बघून

इतके सुरेख पक्षी, आणि भरपूर... त्यांचे पिंजरे सुध्दा स्वच्छ... 

पोपट तर अनेक प्रकारचे...
फुलपाखरे.... यांच्यासाठी इतक्या प्रकारची फुलझाडे.... 
आणि मुक्त आहेत फुलपाखरे....

सगळ्यांचीच नेटकी व्यवस्था... जेवण उत्तम
डायनिंग टेबल वैशिष्ट्य पूर्ण.
 त्यावरील design फिल्म चे आणि 

रंग ब्लॅक अँड व्हाईट...

आत फ्रेम्स, सगळ्या फिल्म हिरो हिरॉइन्स...
आणि एक कॅमेरामन statue अगदी खरा वाटावा इतका सुंदर.


सर्वच गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण.

प्रत्येकाने एकदातरी भेट द्यावी असे ठिकाण
रामोजी फिल्म सिटी
Worlds नं one आहे खरोखरच.!!

Sunday, 19 November 2017

१९ नोव्हेंबर ... चला हैद्राबाद



सुप्रभात....
विमानाच्या प्रतीक्षेत बसलो आहोत

खरतर खूप वेळ आहे

व्यवस्थित वेळेत पोहोचलो...

इकडे चालण्या पेक्षा जीप सारखी गाडी आहे त्यात बसून जेथून विमान सुटणार ते 41B या गेट जवळ येऊन बसलो आहोत....
बसलो विमानात..
एक सेल्फी काढला
आम्ही  दोघे

यावेळी प्रथमच
 एअर इंडिया ने प्रवास



महाराजा स्वागत करतोय थोडे झुकून.!

यापूर्वी जो काही विमान प्रवास केला तो इंडिगो ने केला आहे
घेतली भरारी 
 नाश्ता झाला
इडली सांबर, उपमा, चटणी
 पपई, टरबूज सफरचंद फोडी प्रत्येकी एक
आणि कॉफी ब्लॅक दिली
त्यात साखर आणि दूध पावडर मिसळून कॉफी केली आणि प्याली...

आणि दोन चिंच गोळ्या...
मस्त नाश्ता झाला
विमानाने भरारी घेतली तेव्हा झुंजूमुंजू झाले होते...
काळे विरळ ढग धावत होते... आणि अचानक काळेकुट्ट ढग दिसू लागले आणि एक रेघ सोनेरी सोनेरी, तांबूस दिसत होती

काळ्याकुट्ट ढगांचा जाड थर भीतीदयकच दिसत होता...

विमानाने झेप घेतली पूर्वेला... पण सूर्यदेव दर्शन नाही
आणि आता मात्र आजूबाजूचे वातावरण तप्त....
विमानाने लवकर आलो पण... सामान घेण्यात एवढा वेळ गेला....8.48
विमानातून आकाशाकडे बघताना डोळे दिपत होते

पण जसे विमान जमिनीकडे येऊ लागले तसे ऊन नाही सूर्यदर्शन नाही

 दमट पावसाळी आहे 8.57
एअर पोर्ट लहान आहे पण आजूबाजूला छान हिरवळ सुंदर परिसर
रात्री 9.15
आजचा दिवस छान झाला
सुंदर असे झू पाहिले
भरपूर वाघ सिंहिणी कोल्हा तरस झिराफ...
मस्तच
उमदी जनावरं / पशु...
मोठाच्या मोठा परिसर... स्वच्छ, फिरण्यासाठी खरतर छान गाडी...

पण आम्ही पायी फिरलो...

नंतर जाळीवल्या गाडीतून मोकळे वाघ आणि सिंहिणी बघितल्या


हत्ती पाचसहा होते 
एकमेकाच्या अंगावर हिरवे गवत उडवत होते... दोन हत्ती साखळदंडाने बांधले होते....

जिराफ तर इतका सुंदर... अचानक एकदम दिसला 
रंग थोडा वेगळा वाटला


मोर मात्र बिना पिसांचा मिळाला बघायला

मोठीच्या मोठी वयाने मोठी कासवे बघितली,

माकडे, इतर पक्षी मिळाले बघायला


वाघ फेऱ्या मारणारा, पाण्यात पोहणारे, आणि पांढरा वाघ शांत विश्रांती घेणारा बघायला मिळाला,

चित्ता तर मस्तच आणि होते सुद्धा तीनचार

एकंदरीत झू बघून खूप छान वाटले.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::,






Saturday, 18 November 2017

विमानातून दिसलेला सूर्योदय

हैद्राबाद येथे जाण्यासाठी विमान अगदी सूर्योदय होणार अशा वेळी झेपावले..

आकाश भीती वाटेल इतके काळेकुट्ट दिसत होते.

 

 


खाली असे ढग आणि आमचे विमान आणि वर नेहमीचे आकाशी आकाश

ते छान वाटले.

पण काळे काळे आकाश
बापरे....

काळे आकाश म सोनेरी केशरी सूर्यकिरण रेष आणि आकाशी आकाश...
पण उतरल्यावर ढगाळ हवामान आणि मध्येच सूर्यदर्शन.!

चित्र काढतो तशी किरणे फाकलेली दिसत होती.!

सुंदर दृश्य.!
 मॉर्निंग वॉकला जातो त्यापेक्षा कमी वेळात आम्ही हैद्राबादला पोहोचलो

फक्त 55 मी.


Friday, 17 November 2017

१७ नोव्हेंबर २०१७ : गीता



आज संपूर्ण गीता पाठ झाली.


राहिलेला श्लोक आज पहाटे पाठ केला.

पाचवा अध्याय करत होते.
(२९ श्लोक )

आता रोज म्हणून म्हणुन गीता पक्की पाठ करायची.

 

 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आता गीता जयंती आहे महिना अखेरीस

त्या निमित्त स्पर्धा होतील तेव्हा भाग घेईन म्हणजे धीट पणा येईल.

खरतरं ज्यांच्या कडून मी प्रेरणा घेतली त्या माझ्या मावस सासूबाई...


त्यांच्या बरोबर झालेला संवाद
मी : मावशी आज माझी संपूर्ण गीता पाठ झाली.

मावशी : स्वतःच्या जबरदस्त इच्छा शक्तिने काय जमत नाही?

स्वर्गही गाठू शकतो माणूस.

तुझ कौतुक कराव तेवढ थोड आहे.

मी : तुम्हाला म्हणताना मी ऐकले.... 
त्यानंतर मला वाटू लागले 
आपल्याला गीता चांगली म्हणता यायला हवी
हे मी तुम्हाला बोलून दाखवले... 
आणि तुम्ही लगेच तयार झाल्यात..
लगेच 1, 12, 15 असे अध्याय निरुपणासह voice पाठवले..
पण मी थोडी 'स्लो, ढ..' 
काहीतरी असेन मला जमेना.... 
पण आंतरिक इच्छा होती... 
पुढे काही महिन्यातच योग्य गुरु मिळाले. आणि आपल्या शास्त्री हॉल मध्ये  .. 
श्री श्रीकृष्ण जोशी येऊ लागले.
आणि म्हणता म्हणता सव्वा वर्ष कसे गेले ते कळले नाही
 आणि सुंदर अशी संथा त्यांनी दिली....
मी : तुमचे असे प्रोत्साहित करणारे शब्द, कौतुक, शाबासकीची थाप ....
पुढे जाण्यास उपयोगी होते

आता मला शृंगेरीला जायचय... 

मावशी : यशस्वि भव.!!


~~~~~~~~~~~~~~~~~~~~

 त्यांनी हल्लीच स्वतः च्या आवाजात गीता म्हटली आणि निरुपण केले

अशा सिडी चे वितरण केले....

  .... ... ... ....

 फक्त कौतुक करणाऱ्या 

अनेक व्यक्तींपेक्षा

 प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्ती 

सोबत असाव्यात 

ज्या आयुष्यातील नाकारात्मतेला 

पुरून उरतील.


Saturday, 4 November 2017

गण गण गणात बोते


जय गजानन

 

 

 एक अनुभव व्हाट्सअप्प

 माध्यमातून आला आणि मन मागे गेले.



गण गण गणात बोते

हे भजन सद्गुरुते....

जानेवारी २०१६ मधली गोष्ट.!!
एकाच दिवशी दोन स्नेही वेगवेगळ्या वेळी आले होते, 
सहज बोलता बोलता त्यांनी असे म्हटले..

कि तू गजानन विजय हा ग्रंथ रोज संपूर्ण म्हणजे २१ अध्याय का वाचत नाहीस??? 

२१ दिवस वाच.!

मला हा एक संकेत वाटला.. महाराजच
तर हि सेवा माझ्याकडून करून घेत असतील 
असे वाटले.
पहाटे जाग आली कि सर्व आटपून पोथी वाचत असे...
(अर्थात यासाठी घरच्यांचे साहाय्य, पाठिंबा होता)
जाग येई ती कुठल्यातरी अध्यायातील ओळी वाचत असे..



माझ्या सासूबाई रोज नेमाने एक अध्याय वाचत  असत.
 महाराजांनी त्याना पहाटे दर्शन दिले होते...
(प्रत्यक्ष) पण त्यावेळी त्या ते ओळखू शकल्या नाहीत.!
 नंतर सकाळी त्यांच्या लक्षात आले.

या पूर्वी मी काही दिवस १५ वा अध्याय रोज वाचत असे..

★ २१ दिवस रोज एक अध्याय असे वाचन केले होते.

★★ ७ दिवसात संपूर्ण पोथी असे वाचन केले होते.

★★★३ दिवस पोथी संपूर्ण असे वाचले होते..

इतके दिवस मी सासूबाईंची पोथी वाचत असे...
अचानक योगायोगाने शेगाव येथे जाण्याचा योग बरेच वर्षानंतर आला..
आणि ज्यांच्या बरोबर गेलो 

त्यांनी गजानन विजय हि पोथी भेट स्वरूपात दिली

आता माझी नवी कोरी पोथी आहे.. तीच मी २१ दिवस २१ अध्याय रोज अशी वाचली...

माहीम येथील मठ, आणि  झावबा राम मंदिर येथे कधीतरी महाराजांच्या दर्शनासाठी जाते...

 ★★★★गुरुपुष्यामृत योग साधून शेवटचे तीन अध्याय
दशमी एकादशी द्वादशी असे अध्याय वाचले होते.

★★★★★ गुरुपुष्यामृत या दिवशी संपूर्ण पोथी असे हि वाचले आहे.

कोणी म्हणत मी साडेतीन तासात पूर्ण पोथी वाचते.
कोणी म्हणे मला पाच तास लागतात.
मला मात्र साताठ तास लागतात.

खरतर यास पारायण असे म्हणतात
पण... पारायण असे न म्हणता वाचन असे म्हणते... 

कारण पारायणाचे काही नियम असतील ते मला माहित नाहीत...


~~~~~~~~~~~~
त्यावेळी
मला सातवा अध्याय वाचतांना खुपच वाईट वाटत असे..
महाराजांशी लोक असे वाईट का वागत...
पण.... त्यातच एक छान वाक्य आहे....
म थोडं बरं वाटे.
सगळे पाटील खरंतर भक्त झाले नंतर...
तसंच भास्कर सुद्धा.. पाणी देत नाही आणि वाटेल तसं बोलतो...

त्यावेळी
मला सकाळी जाग येई तीच मुळी घडघडा पोथी वाचते अशी.....
म्हणतात ना.... जे आपण करतो तेच आपण होऊन जावं

तसं झालं होत 
 माझं.....


<><><><><><><><><>
त्यावेळीच गीता वर्ग सुरु होणार असे कळले 
आणि 

एक गीता म्हणायला शिकण्यासाठी द्वार खुले झाले.!


◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇
फक्त आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण प्रार्थना करणे आवश्यक आहे.
कारण ......
आपल्यासाठी चांगले काय आहे, हे ईश्वराला माहीत आहे.
------------------------------




खरंच महाराजांची लीला अगाध आहे


जशी श्रद्धा तसे फळ...


मला वाटते 

कोणतीही गोष्ट आपण करून बघू म्हणून करू नये.


मला एकदा प्रश्न विचारला 
तुम्हाला महाराजांचा काय अनुभव आहे....
मी म्हटले मी परिक्षा घेणारी कोण???
जे आहे ते सगळे महाराजांच्या कृपेने आहे

मी मठात गेले तरी फक्त दोन हात तिसरे नतमस्तक

काही मागण्याचे लक्षात सुद्धा येत नाही.


कुणी म्हणते देवाकडे मागावे
कुणी म्हणते.. देवाशी भांडावे....

मला मात्र असे काहीच करावे वाटत नाही
✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺
महाराजांच्या विषयी...
काही कोणी लिहिलेले...

गण गण गणात बोते
हे भजन प्रिय सद्गुरुते
या श्रेष्ठ गजानन गुरू ते
तुम्ही आठवीत राहा या ते
हे स्तोत्र नसे अमृत ते
मंत्राची योग्यता ह्याते
हे संजीवनी आहे नुसते
व्यवहारिक अर्थ न ह्याते
मंत्राची योग्यता कळते
जो खराच मांत्रिक त्याते
या पाठे.दुःख ते हरते
पाठका अती सुख होते
या खचित अनुग्रह केला
श्री गजानने तुम्हाला
घ्या साधूनी  अवघे याला
मनी धरूनि भाव भक्तीला
कल्याण निरंतर होई
दुःख ते मुळी न च राही
असल्यास रोग तो जाई
वासना सर्व पुरतील ही
आहे याचा अनुभव आला
म्हणून या कथित तुम्हाला
तुम्ही बसून क्षेत्र शेगावी
स्तोत्राची प्रचिती पहावी
हि दंतकथा ना लवही
ह्या गजाननाची ग्वाही
ही दंतकथा ना लवही 
ह्या गजाननाची ग्वाही

✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺

*माझे शेगांव*  

काय आहे माझे शेगांव
तुम्हासी नाहीं ठावे
ज्यानी जावे तेथे
गजानन नाम घ्यावे
समाधि दर्शन ज्याने घ्यावे
त्याने समाधान पावे
भजनी बसता त्याने
आनंद डोही न्हावे
महाप्रसाद जो चाखे
तृप्त त्याने व्हावे
शेगांव सोडता त्याच्या
डोळा पाणी यावे
भक्त म्हणे ये स्थळी
जावे तुम्ही एक तरी वेळी
तेंव्हा गोष्ट कळेल तुम्हा खरी ....

जय गजानन

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
महाराज म्हणत
गण गण गणात बोते...
याचा छान अर्थ आला होता...
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

गण गणात बोते.!!

पहिला गण म्हणजे जीव किंवा जीवात्मा

दुसरा गण म्हणजे शिव

आणि गणात म्हणजे स्वतः किंवा हृदयात

बोते म्हणजे ... 
पहा किंवा बघा.!

स्वतःच्या हृदयात शिवाला बघा....

असा आपण लावलेला अर्थ... 

महाराज सतत म्हणत....

गण गण गणात बोते

गण गण गणात बोते

गण गण गणात बोते

∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞


Friday, 3 November 2017

त्रिपुरी पौर्णिमा...३ नोव्हेंबर...


देव दिवाळी..!!

 


इस्कॉन येथील मंदिरात कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत 

दामोदर अष्टकम म्हणतात आणि लोक तिकडे दिवे (पणती) लावून देतात

 ती राधा कृष्ण यांना ओवाळतात. 

बहुतेक दिवे सगळे बंद करतात आणि
 मंद प्रकाशात आपण दिवे ओवळत असतो खूप सुंदर दृश्य.!
नंतर ते दिवे स्टील चा मोठा टब असतो त्यात सोडायचे....



यावेळी काशीला संध्याकाळच्या वेळी गंगेत सजवलेले दिवे (द्रोणात)
पाण्यात सोडले याची आठवण झाली...
******************************

त्यानंतर गावदेवी मंदिरात त्रिपुर उजळलेले बघायला गेले... 

फारच छान वाटले...

 

 

*******************************

म वाडीच्या शेजारीच असलेल्या भवानी शंकर मंदिरातील त्रिपुर बघायला गेले. 

पूजा झालेली होती.

 

 

ग्लास मध्ये ज्योती सुंदर दिसत होत्या... 

अगदी बघत राहावे असे वाटत होते... 

*******************************
पण नऊ वाजता आमच्या येथे दिव्यांची रोषणाई करणार होते... म लगेच घरी आले.

सुंदर असे तुळशी वृंदावन काढले 

 

 

आणि त्यावर नाजूक दिवे मांडले होते
 आणि ते मेणबत्तीच्या साहाय्याने दिवे लावले..
मला पण दिवे लावायला मिळाले.

म सुंदर असे फोटो काढले.

********************************