हम्बोल्ट पेंग्वीन
दोन दिवसापूर्वी सहज मनात विचार आला....
खूप दिवस झाले
भायखळा राणी जिजामाता उद्यान येथे पेंगविन आले त्याला.!
खरतर शाळा आता सुरु होतील,
आज शेवटचा रविवार, गर्दी असेल...
तरी त्या गर्दीचा एक भाग होऊ पण आज जाऊच.!
निघालो...
घराच्या दारातूनच बस जाते ते थेट उद्यानापर्यंत.
तिकीट खिडकीवर पन्नास तरी
लोक उभे होते...
तो पर्यंत चौकशी केली...
पेंगविन बघायला वेगळे तिकीट आहे का????
नक्की कुठच्या बाजूला आहेत.???
आणि म फोटो पण काढले.
धबधबा... आर्टिफिशीअल.!!!!
:-) :-) :-) :-) :-) :-) :-)
:-) :-)
तिकीट अवघे पाच ₹.
शनी. रवी. ३.०० वाजता तिकीट देणे बंद करतात.
बुधवारी उद्यान बंद असते.
*******************
भर मुंबई मध्ये इतकी
● छान झाडे... आणि
● गवत/ lawn, हिरवळ बघूनच छान वाटत होते
● झाडावर त्याचे नाव... आणि इतर माहिती.
● सेल्फी काढण्यासाठी खास जागा केल्या आहेत
राणी जिजामाता आणि बाल शिवाजी...
● तशी अनेक झाडे फुले आहेत
म
आम्ही त्याठिकाणी पोहोचलो...
फोटो काढण्यास मनाई...
थोडी नाराज झाले पण
बरोबरच आहे..
नियम हवाच.
कारण प्रत्येकजण तेथे फोटो काढत बसेल .
शांतता भंग होईल..
हा पक्षी शांतता प्रिय आहे
याला गोंगाटाचा त्रास होतो.
येथे एकूण सात पेंगविन आहेत यातील ३ मोठे आणि बाकी मादी आणि पिल्ले...
मस्त वाटत होते बघताना.!
मत्स्यालय मध्ये जसे मासे असतात तसे येथे पेंगविन.
छान बर्फ आहे आणि खाली पाणी.
या पाण्यात एक पेंगविन मस्त पोहत होता..
दोन मोठे पेंगविन अंग स्वच्छ करत होते.
आणि बाकीचे उभे राहिले होते...
हा ध्रुवीय प्राणी...
चक्क आपल्या मुंबई मध्ये आणि ते सुद्धा राणी बागेत बघायला मिळाला.
त्यामागे कोणाची खूप मेहनत आहे हे नक्की.!!!!
याबद्दल असे ऐकले किंवा वाचले आहे कि...…
बेटावर यांची संख्या वाढली कि
यातील बुजूर्ग आपण होऊन समर्पण करतात.
मुलांचा एक लहानपणी एक खेळणे होते...
घसरगुंडी वरून पेंगविन घसरत येतात..
मस्त वाटत असे.
या निमित्ताने सुंदर हिरवीगार राणीबाग बघून आलो.
बाकी कोणतेही प्राणी बघितले नाहीत..
पण बाहेर पडताना मात्र बगळे, करकोचे, असे पक्षी बघितले...
No comments:
Post a Comment