त्रिमूर्ती...
पेणचे सुप्रसिद्ध मूर्तिकार राजाभाऊ देवधर.!
आमच्या आत्याचे यजमान.!
सुप्रसन्न व्यक्तिमत्व.!
कलाकाराचा, बोलका चेहरा,
माझ्या लहानपणीची एक सुंदर आठवण....
मी चारपाच वर्षाची असेन, गेले होते राहायला पेणला. आत्याकडे.!
सकाळी उठले कि उंबरठ्यावर बसत असे.
आणि दादा बंदिस्त गॅलरी मध्ये त्रिमूर्ती घडवत होते.
रोज दादांना विचारत असे ....
मी : दादा कधी करणार डोळे????
डोळे करा ना आधी.!
दादा : म्हणत करतो हं.!
पण... डोळे नंतर करतात हे माझ्या बाल जीवाला कस सांगणार आणि समजणार.!
ती त्रिमूर्ती आजही लक्ष वेधून घेते आणि हा लहानपणीचा संवाद आठवतो...
आणि हे सगळं दादा भेटीत आवर्जून सांगत असत अगदी हसत हसत.!
दादा कवी मनाचे... दादांचा आनंदपक्षी हा काव्य संग्रह.!
यातील कविता त्यांच्या तोंडून ऐकल्या आहेत.
तशी मला हळद उशिराच लागली.....
इतकं छान वाटलं ना... कविता ऐकताना!
आणि कवीच्या हातून त्यांचे कवितांचे पुस्तक घेताना....
:::::::::::::::::::::::::::::: ::::::
हि त्रिमूर्ती...
माझी बालपणीची आठवण
दादांनी घडवलेली.
५२/५४ वर्ष झाली.
अशीच आहे.
आणि पुन्हा आहे त्याच जागेवर.!
आणि ओपन आहे.
बंदिस्त काचेत नाही.
लक्ष वेधून घेते त्रिमूर्ती.!!!
येथे सुंदर कलादालन आहे.
बरेच दिवस लिहीन.लिहीन म्हणत होते या आठवणीबद्दल..
. तर आज योग आला
No comments:
Post a Comment