आज गुरुवार...
ओढ स्वामी दर्शनाची
मठात जाण्याची.!
आज
सकाळी स्वामी चरितामृत वाचत असताना...
वाडा-जव्हार येथील दिवेकर वाडी च्या
जवळच असलेल्या
स्वामी विश्रांती स्थान येथील खूप आठवण आली.
काही वर्षांपूर्वी अचानक दिवेकर वाडी येथे दोन दिवसासाठी गेलो होतो.
गाडी वळताना समोर बोर्ड दिसत होता...
स्वामी विश्रांती स्थान.!!!
म
विचारत विचारत तेथे गेले...
हा मठ आत आत आहे. आजूबाजूला शेती आहे.
बरोबर
असलेले कुणी यायला तयार नव्हते सगळे झोपण्यात मज्जा मानणारे.!
पण
होते ते चांगल्या साठी.
मला ओढ लागली मठात जाण्याची.
मी निघाले एकटीच,
भर
दुपार, अनोळखी परिसर, वाटेत कुणीही माणूस नाही,
पण बरोबर स्वामी आहेत हि
खात्री होती. हळूहळू मार्ग कापत पोहोचले.
त्या मठात एक कल्याण येथील शिक्षक, पेपर तपासत होते.!
त्यांच्या बरोबर छान गप्पा .. म्हणजे मठाबद्दलच्या झाल्या.
येथे स्वामी विश्रांती घेत आहेत अशी मोठी फोटो फ्रेम आहे..!!!
सुंदर अशी छोटी गणपती मूर्ती.
आणि मठात जाताना तीन/ पाच (नक्की आठवत नाही)
वृक्ष एकत्र होऊन जणू काही शेज
म्हणजे झोपण्याचे साधन तयार व्हावे असे खोड तयार झाले आहे
वृक्ष बहुतेक वड, पिंपळ, आंबा असे वेगवेगळे आहेत...
स्वामी कुणाच्या स्वप्नात येऊन म्हणाले, इकडे माझे विश्रांती स्थान करा...
आणि असा तो मठ आहे.
आड वळणावर असल्याने जास्त लोक जात नसावेत....
एकदा का होईना मला हे विश्रांती स्थान बघायला मिळाले..
गिरगावात प्रेस आहे तेथे पुस्तिका छापल्या जातात...
या मठात होणारे सण उत्सव, लोकांचे अनुभव... असे त्याचे स्वरूप होते....
हे कुटुंब बऱ्याच वेळा तिकडे जाते असेही समजले....
मनात आलेले तुमच्या बरोबर शेअर केले
श्री स्वामी समर्थ.!
|| जय जय श्रीस्वामी समर्थ ||
८.०० च्या दरम्यान गिरगाव मठात जाण्यास निघालो..
बरोबर ८.३० च्या दरम्यान पोहोचलो.
आरतीसाठी भक्तमंडळी उभीच होती, आम्हीपण उभे राहिलो.
आरती.... आर्ततेने घातलेली साद.!!
आणि टाळ्या वाजवणे म्हणजे सुंदर व्यायाम पण...
गुरुविण जीवनात कोण येईल कामी
खडतर पुढे रस्ता पण पाठीशी स्वामी
जीवनाच्या वाटेवर नको मन भ्रांती
गुरुपदी घेऊ चला क्षणभर विश्रांती !!!!!
मला वाटतं हे एका सिरीयल चे गीत होते
No comments:
Post a Comment