Friday, 28 October 2016

आज धनत्रयोदशी....


देवांचे वैद्य... धन्वंतरी यांची जयंती....

 

 

 उत्तम आयुरारोग्य लाभावे ...

अशीच प्रार्थना प्रत्येकजण धन्वंतरींच्या चरणी करतात.

आता आरोग्याचा विचार कसा होतो???
सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करावी हा विचार या सणाच्या निमित्ताने सांगितला आहे..

आंघोळ कशी करावी...

अभ्यंग स्नान... म्हणजे तेलाने मसाज करणे:
  हिवाळा हा ऋतू सुरु होतो , तिळाचे तेल उत्तम!!!
हवामान कोरडे होते, 
प्रथम जाणीव होते ती ओठ कोरडे पडतात, 
रात्री नकळत तोंडाने श्वास घेऊ लागतो..
नंतर त्वचा... ती कोरडी पडते त्यावर सहज ओरखडा दिसतो

म मसाज केल्याने त्वचेला  स्निग्धता येते

 ती तुकतुकीत होते आणि शरीराच्या प्रत्येक भागाकडे बारकाईने लक्ष दिले जाते.
• मसाजमुळे रक्ताभिसरण चांगले होते.

• असेही दररोज आपल्या

  शरीरात जी भोके आहेत त्याला रात्री झोपताना तेल घालावे... नाक कान बेंबी....
• ओठाला तूप, लोणी किंवा साय लावावी.
• पायाचे तळवे यांना सुद्धा तेल लावावे किंवा काशाच्या वाटीने तळवे चोळावेत.
• डोक्यावर तेल घातले तर अनेकांना शांत झोपेचा अनुभव येतो.

आणि जे पायाचे सांधे आहेत त्यांना तेल लावावे

आंघोळीपूर्वी.!

यामुळे आपोआपच हाताची बोटे, नखे यांना तेल मिळते.

आणि उटणे लावून आपण आंघोळ करतो दिवाळीत.!

यामुळे शरीराला मर्दन तर होतेच आणि सुगंध..! यामुळे मन आनंदी प्रसन्न होते.

आता आरोग्याच्या दृष्टीने विचार करता....

• प्राणायाम .! याला खूप महत्त्व आहे

यातील दीर्घ श्वसन....

 राग आला कि सोपा उपाय... एक ते  दहा अंक मोजा म्हणतात तर... अंक मोजू लागलो कि आपोआपच श्वास शांत होतो म्हणजेच दीर्घ श्वास घेतो. मन शांत होते. तर प्रत्येकाने पाच दहा श्वास तरी दीर्घ श्वसन केले पाहिजे.

रिकाम्या वेळी आपण श्वास कसा घेतो याकडे लक्ष दिले पाहिजे.

• चालणे... या सारखा सर्वांग सुंदर    व्यायाम दुसरा कोणताही नाही.
पण बदल म्हणून ....
• सायकल चालवणे, पोहणे काही आसने करणे करावेत

• सूर्यनमस्कार... रोज किमान दोन तरी नमस्कार घालावेत.

• सरळ जिने तर नेहमीच चढतो तर रोज एकदा तरी उलट जिने चढावेत.

• थोडे तरी उलट चालावे.

अशा साध्या सोप्या गोष्टी करता येणे सहज शक्य आहे.
धन्वंतरी जयंती निमित्ताने आणि अभ्यंग स्नान निमित्ताने जे मनात आले ते लिहिले...

हिवाळा.. या ऋतूत काहीही खावे, व्यायाम सुरु करावा,

शक्यतो स्निग्ध पदार्थ...
प्रत्येकाच्या प्रकृती नुसार स्वतःला झेपेल एवढे सातत्याने करावे.

:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:-:

 आज अश्विन कृष्ण त्रयोदशी 

धन्वंतरी जयंती. 

 

 

समुद्र मंथनापासून समुद्रातून आरोग्याची देवता मानल्या गेलेल्या धन्वंतरीचा पाचवे रत्न म्हणून 
 लाभ झाला. 
आज धनाची पूजा करतात. गूळ धने यांचा नेवैद्य दाखवतात . 
आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी. 
     सुख समाधानाचे आणि समृद्धीचे जीवन लाभावे अशी कामना दिवाळीच्या सणाच्या रूपाने आपण व्यक्त करतो. 
     असे जीवन लाभण्यासाठी बुद्धी आणि धन जितके महत्त्वाचे तितकेच आरोग्यही . 
धनत्रयोदशी हा दिवस आरोग्य देवतेचे स्मरण करण्याचा आहे 

तसेच दीप दान

यम हि मृत्यूची देवता 

त्याची अवकृपा होऊ नये म्हणून 

दक्षिणेकडे तोंड करून यमाला दीपदान करतात. 

काही जण असे मानतात कि हा यमाचा सत्कार आहे.

 


 

No comments:

Post a Comment