Wednesday, 19 October 2016

गीता संथा वर्ग.... बुधवार... १९ ऑक्टोबर


आज गीता चौथा अध्याय कसा म्हणायचा ते शिकवून पूर्ण झाले.

आता पर्यंत १, २, ३, ४, ६, आणि १८ अध्याय पूर्ण झाले आहेत...
इतके दिवस मंगळवार बुधवार ५ श्लोक संथा देत होते.

आता पाचव्या अध्याया पासून 

सात श्लोक कसे म्हणायचे ते सांगणार आहेत.

(संथा)

तर...
आज आम्हाला श्लोक म्हणून न घेता ....
एक प्रश्न विचारला...
गीता म्हटल्यामुळे
किंवा गीता का शिकतोय?

गीता का म्हणता??

कोणी म्हणाले....
मनःशांती मिळते,
मला छान गीता म्हणायला यायला हवी,
आलेल्या प्रसंगात खंबीरपणे तोंड देता येते,
निर्णय घेता येतात.

प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघाली आहे.

(गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे.

गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे.

वेद हे देवाच्या निःश्वासातून निघाले.)

अगदी मी खूप आजारी असताना मला शिकायला सुरुवात करता आली
मला आजाराने डिप्रेशन आले होते , सगळे मळभ दूर झाले.
अशी छान उत्तरे मिळाली.
म आता एवढे दिवस सरांचे मार्गदर्शन मिळाले यातून कोणत्या गोष्टी लक्षात आल्या?

* शब्दावर आघात कसा आणि कुठे द्यायचा..

* अनुस्वाराचा उच्चार कसा करायचा..

* विसर्गाचा उच्चार कसा करायचा..

* श्लोक म्हणताना एक नाद, लयीत म्हणायचा.

(तालासुरात)१२३४; ५६७८
अशा अंकात म्हणायची.

(भीमरूपी महारुद्रा या प्रमाणे)

* हे श्रीकृष्ण भगवंताच्या मुखातून आलेले शब्द आहेत

 तर ते गोड आवाजात शांतपणे म्हणायचे.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

आपण स्पर्धेला का जायचं?

निरनिराळे लोक भेटतात.
त्यांचे विचार कळतात.
सभा धीटपणा येतो.

★★★★★★★★★★

आता अजून एक ताई आहेत त्यांनी केलेले मार्गदर्शन

*आघात*

जोडाक्षरापूर्वी,  उ 

ऱ्हस्व अक्षरे  असतील तर  

त्या ऱ्हस्व अक्षरावर आघात द्यावा

क्ष ज्ञ  त्र ही जोडाक्षरे आहेत.

~~~~~~~~~~~~~~
(बुद्धी, ब्रह्म , तस्य, यज्ञ, त्यक्त्वा ...यातील पहिल्या अक्षरावर नेहमीच आघात असतो)
~~~~~~~~~~~~~~

विसर्ग

विसर्गाचे उच्चारण.

विसर्गाच्या पूर्वीच्या स्वराच्या आधाराने केला जातो.

विसर्गोच्चार 'ह्' व्यंजना प्रमाणे पण अधिक कठोर करावा लागतो.
* विसर्गाच्या अगोदर आलेल्या ऱ्हस्व अथवा दीर्घ स्वराप्रमाणे विसर्गाचा उच्चार केला जातो.

श्लोकात मध्ये विसर्ग आला तर...

*ह्* प्रमाणे आणि अल्पकाळ करतात.
केशवः (ह् )

श्लोकाच्या शेवटचा शब्द असेल तर....

महारथः (हा)

इषुभिः (ह)
स्थितधीः (ही)

ए कार असेल तर उच्चार *हे* होतो.

ओ कार असेल तर *हो* असा उच्चार होतो.

ऐ कार असेल तर *हि* उच्चार होतो.

*विसर्ग जेव्हा श्लोकाच्या शेवटी येतो तेव्हाच त्याचा पूर्ण उच्चार केला जातो*

पितामहाः (हा)


विसर्गाच्या पुढे स, श, ष, श्र

असतील तर

हेच उच्चार करावेत.
१|९ बहवः (श) शूरा
भवन्तः (स) सर्व एव ही
६|३७ अयतिः(श्र) श्रद्धयोपेतो

_____________________

विसर्गाच्या पुढे आकार असेल तर....

ते अक्षर ओढावे

१|३३ राज्यं(म)
*भोगाःऽऽ(स)* सुखानि च

१|४० *कुलधर्माःऽऽ*(स)
सनातनाः
विसर्ग च्या पुढे *क्ष*आला तर...आणि ते अक्षर अकार असेल तर तो आकार करावा

२|३२ *सुखिनः* (सुखीनाहा) क्षत्रियाः

यातील हा थोडा पटकन म्हणावा.

*ऽ ऽ* हे विखण्ड चिन्ह आहे. 

असे चिन्ह असेल तर ते अक्षर ओढणे (लांबवणे)

----------------------------------

(् ) हे हलंत चिन्ह आहे.

  श्लोकात आठ अक्षरानंतर यति घेतो (pause)
 जर या आठ अक्षरानंतर जो पुढील शब्द आहे त्याची सुरुवात अर्ध अक्षराने म्हणजे हलन्त असेल तर ते अक्षर आधीच्या आठ शब्दांना जोडावे.

१|४६ धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे
हन्युस् तन्मे... असे म्हणावे.

जर आठवे अक्षर जोडाक्षर असेल तर... 
त्यातील हलन्त अक्षर आधीच्या शब्दाला जोडून म्हणावे
 व पूर्ण अक्षर पुढील आठ अक्षराला पहिले जोडावे.

१८| १६

पश्यत्यकृतबुद्धित्वान्न

स पश्यति दुर्मतिः

पश्यत्यकृतबुद्धित्वान्
न स पश्यति दुर्मतिः

••••••••••••••••••••••••••••

( ं ) अनुस्वार...

यासाठी बाराखडी लक्षात ठेवावी

क  ख  ग  घ  ङ (ङ् )

च  छ  ज  झ  ञ (ञ् )

ट  ठ  ड   ढ  ण  (ण् )

त  थ  द  ध  न   (न् )

प  फ  ब  भ  म  (म् )

र  स  व  श  ष  ह ( वँ )

य  (यँ )

ल  (लँ )

क्ष (ङ् )

ज्ञ (ञ् )

या प्रमाणे अनुस्वाराचा उच्चार करावा.
तरी काही विकल्प आहेत

म्हणजे अनुस्वाराचा उच्चार 'म्' असाही करतात, 

ही पद्धत रुढ आहे.

•••••••••••••••••••••••••••

सञ्जय (ञ)

नरपुङ्गवः  (ङ)

कौन्तेय  (न् )

गाण्डिवं  (ण् )

सम्बन्धिनस्तथा  (म् )

म्हणजे अनुस्वार आहेत.

**********************

जोडाक्षर

 म्हणजे दोन किंवा अधिक व्यंजने (व्यञ्जने)
एकत्र आली असता त्यामध्ये स्वर मिसळून तयार झालेले अक्षर.
जोडाक्षरामध्ये जे व्यंजन प्रथम येते त्याचा उच्चार प्रथम करावा.

४ | २६  जुह्वति ( ह् + व )
२|२२  गृह्णाति  ( ह् + ण )
आणि दोनपेक्षा अधिक व्यंजने आली तर त्यांचा अनुक्रमाने उच्चार करावा
उदा. कृ *त्स्न* (१८|२२)

••••••••••••••••••••••••••••
आता पुढे  ज्या श्लोकाची संथा देतील ...
त्या श्लोकांना आघात व अनुस्वाराच्या खुणा करून आणा ....

शब्द उच्चार करताना...

त्याचा उच्चार कसा होतो ते कानावर हाताचा पंजा पोकळ ठेवून उच्चार ऐका...
शब्दा बरोबर खेळा....
अशा काही छान सूचना सांगितल्या...
पुण्यात गीता म्हणताना शुद्धच उच्चार असावे लागतात.
शृंगेरी येथे मात्र भारतातून लोक गीता म्हणण्यासाठी येतात तर....
 प्रत्येक प्रांता प्रमाणे लोक उच्चार करतात तर... पाठांतर असावे .
उत्तरेत.... थंड हवामान असल्याने लोक पूर्ण तोंड न उघडता उच्चार करतात.
महाराष्ट्रीयन तामिळ, कन्नड यांचे उच्चार चांगले असतात
या भाषा संस्कृत बेस आहेत.
अजूनही काही माहिती ऐकली, सांगितली आहे.
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
४|३९

श्रद्धावाँल्लभते

हे दोन शब्द
मूळ शब्द

श्रद्धावांन् लभते

न् आहे त्याचा ल् होतो
न् च्या अगोदरचे 'व' हे व्यंजन आहे त्यावर अनुस्वार आहे.
म्हणून न् चा ल् होतो
वा आणि ं त्यापुढे न् त्या पुढील अक्षर ल आहे असे असेल तर  न  चा  ल्  होतो
आणि वा वर (ँ ) आहे.
_____________________
तसाच शब्द
१८|१७
इमाँल्लोकान्न
यात दोन शब्द
इमाँन्  लोकान्न

No comments:

Post a Comment