Monday, 5 December 2016

चलनातून बाद झालेल्या नोटेचे आत्मवृत्त.!

एक मेसेज आला↓↓↓

आज आम्ही शाळेत असतो तर निबंधांचे विषय असते.....
१) ए.टी.एम्.च्या रांगेत दोन तास
२) मी भारताचा पंतप्रधान झालो तर
३) बँक-कॅशिअरचं मनोगत
४) चलनातून बाद झालेल्या नोटेचं आत्मवृत्त
५) मला पडलेलं स्वप्न, मी डेबीट कार्ड झालोय.
*******************************

हा मजेचा मेसेज आला आणि मनात आलं लिहावं काही यावर

*******************************
चला, लिहा निबंध.....
 निबंध लिहिला आहे↓↓↓

चलनातून बाद झालेल्या नोटेचे आत्मवृत्त...✍

     मी आहे 500 ची नोट

चलनातून बाद झालेली.!

तुम्हाला माहित आहे माझा जीव घुसमटत होता

कुठे आणि कसं ठेवलं जात होतं आम्हाला

काही जणींच्या बाबतीत मात्र पूजन... 
मानाची देवाण घेवाण.!
कोणी पास झालं, कुणाचा वाढदिवस, सूनमुख, नूतन बालकाचं दर्शन...
छान छान प्रसंगी पटकन मला देत असंत. हरी नोट असा छान उल्लेख केला जायचा.!
सहज खरेदी करताना पटकन 500 ची खरेदी.!

माझ्या छोट्या भावंडांना काही किंमतच नाही अस वाटायचं..!!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आणि मी तर खूपच नशीबवान.... 

कारण आता मी नव्या स्वरूपात तुमच्या हाती आले आहे.
माझे नवे रूप सगळ्यांना आवडलं आहे...
★★★★★★★★★★★★★★★
पण...
तू तर नामशेष झालीस.....

ना नव्या रुपात ना नव्या ढंगात.!

एवढं काही स्वतःच कौतुक नको... तुझ्यापेक्षा माझा मान मोठा.... दुप्पट.!
कमी जागेत खोक्या खोक्याने राहत होते मी.!
माझं रंगरूप पण किती छान होतं.

भेट पाकीट उघडलं कि ओह.. 1000 ... कित्ती आनंद होत असे... लोकांना.!

सगळाच व्यवहार पटापट 1000 च्या नोटांनी होत होता. लपवून ठेवण्यास सोप्या..

 आणि तुला माहित आहे का 

पैसे ठेवण्यासाठी 1000 च्या प्रतिकृतीची पाकिटे / वालेट्स निघाली आहेत.

या रुपाने मी लोकांच्या हातात आहे. आणि काही जणांनी माझी स्मृती म्हणून मला घरात जपून ठेवलंय.!
     
     असं ऐकिवात आहे.....
जर या नोटांचा लगदा केला तर... हिमालय पर्वता सारखा पर्वत तयार होईल....

      अस ऐकलंय कि अगदी आम्ही चलनातून बाद झालो असलो तरी

 (आम्हाला) रिसायकल करण्यात येणार आहेत

त्यापासून कॅलेंडर, फाइल्स, बोर्ड इत्यादी तयार करण्यात येणार आहे.
म्हणजे जाळून अगदी कोळसा नाही करणार
हे आमचे नशीब....

मरावे परी कीर्ती रूपे उरावे.!

✽  ✽ ✽  ✽ ✽  ✽ ✽  ✽ ✽ ✽ ✽  ✽ ✽  ✽ ✽ ✽

No comments:

Post a Comment