Thursday, 27 October 2016

दिवाळी...दिपावली...

दीपोत्सव.!


दिव्यांच्या ओळी...
दीप + आवली.. दिपावली

 

 
कुठे कुठे हे दीप लावावेत?? 

याचे सुंदर गीत लहानपणी म्हटल्याचे आठवते.

=================
पणती लावा
पुढच्या दारी
लक्ष्मी येईल
गोरी गोरी
पणती लावा
मागच्या दारी
नाही होणार
कधी चोरी
पणती लावा
तुळशी पाशी
धनधान्याच्या
पडतील राशी
अंगणात लावा
पणत्या साठ
देवदूतांना
दिसेल वाट.!


◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎◎

पूर्वी घरं मोठी असायची
काही भागात अंधार असे तर तिकडे आवर्जून पणती लावली जायची. (परसात)

      आता घरे कोणत्याही प्रकारची असली तरी विकत कंदील आणून विजेची तोरणे लावून, किंवा सेल वर असलेल्या पणत्या लावून हौस केली जाते आणि दिव्यांचा झगमगाट असतो.

**********************

गंगा नदीवर तर सुंदर सजवलेले दिवे मिळतात आणि ते गंगेत सोडतात.

सुंदर दृश्य.!

 छान अनुभव.

हा सोहळा दररोज असतो.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
दीप उजळवले जाणे असे म्हणतात.
तर दिव्याची ज्योत किंवा वात खडीसाखरेने सरकावतात.
(अस एका कथेत वाचल्याचे आठवते)
या साठी तेलवात ही हाताने कापसाचा दोरा करून करतात
 किंवा सहाणेवर कापसाला पीळ देऊन करतात.

औक्षण करण्यासाठी फुलवात लागते 

आणि ती अगोदर तुपात भिजवली जाते.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

कुंभार...

बारा बलुतेदार पैकी एक.! 
त्याच्याकडून खूप साऱ्या पणत्या घ्यायच्या
 आणि पाण्यात भिजवून वाळवायच्या. 
म त्या दिवाळीत छान ओळीत लावायच्या.!
अशा या दिव्यांच्या ओळी पाहून मन प्रसन्न होते.
पणत्या रंगवायच्या...

आता तर कित्ती तऱ्हेतऱ्हेच्या पणत्या मिळतात.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

असाही रोज देवासमोर सकाळ संध्याकाळी दिवा लावतो.
संध्याकाळी शुभम् करोति कल्याणम् म्हणतो त्यात
दिव्या दिव्या दिपोत्कार...
दिव्याला पाहून नमस्कार
असे म्हणतो.

तमसो मा ज्योतिर्गमय!...

हे ज्योती अंधःकार दूर कर
असच तर आपण सांगत असतो
कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने होते.
दिवाळीत पडणारी थंडी, 
रात्र मोठी दिवस लहान
 आणि या दिव्यांच्या ओळी... 
आपल्या पूर्वजांनी किती विचार केला असेल....

तसं आकाश कंदील...

हा उंचउंच बांधायचा. त्यात सुद्धा पणती लावायची.
आकाशात सुद्धा पतंगाच्या साहाय्याने आकाश कंदील सोडायचे, 
यात अगदी छोटी मेणबत्ती ठेवतात... हे खरे आकाश कंदील.!

कल्पकतेला, कलेला वाव म्हणजे दिवाळी हा सण..

मोठा सण. पाच सहा दिवस चालणारा सण

**********************

कुणी त्याच इतकं समर्पक काव्य केलंय...
दिन दिन दिवाळी
गायी म्हशी ओवाळी
. . . . वसुबारसेला ।।१।।
दिन दिन दिवाळी
आरोग्य सांभाळी
. . . . धनत्रयोदशीला ।।२।।
दिन दिन दिवाळी
दुःखाला पिटाळी
. . . . नर्कचतुर्दशीला ।।३।।
दिन दिन दिवाळी
लक्ष्मीला सांभाळी
..अश्विन आमावस्येला ।।४।।
दिन दिन दिवाळी
नववर्षाची नवाळी
. . . . बळीप्रतिपदेला
         (पाडव्याला)  ।।५।।
दिन दिन दिवाळी
भावाला ओवाळी
. . . . यमद्वितियेला

         (भाऊबीजेला) ।।६।।
सहा दिवसांची ही दिवाळी
आपणा सर्वांना
सुखासमाधानाची  आणि समृद्धीची जावो.

**********************
आहे ना मस्त...

घरातील गृहिणी निरनिराळे दिवाळीचे पदार्थ भरपूर प्रमाणात करते,
 सुंदर अशी रांगोळी रेखाटते, नटून सजून आलेल्याचे स्वागत करते.
मुले कंदील करतात. पूर्वी पायलीचा कंदील करत असत.
किल्ले तयार करणे,






 त्यावर नाचणी, अळीव, गहू असे पटकन येणारे धान्य पेरणे, 
 मावळे उभे करणे, अगदी मंदिर विहीर सुद्धा दाखवतात, गाव सुद्धा वसवितात..
आणि आवडते म्हणजे... फटाके फोडणे....
आता तर फटाक्यांची आतषबाजी आकाशात बघण्यासारखी असते.
हा थंडीची सुरुवात असा सण.
 तर स्निग्ध पदार्थ खाल्ले जातात.
 तेच बनवले जातात.
 गोडधोड तेल-तुपाचे पदार्थ केले आणि खाल्ले जातात.

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

मुली, स्त्रीया... रांगोळी काढतात. 

रांगोळी म्हणजे भूमी अलंकरण...

सडा सारवण झाले कि छोटीशी तरी रांगोळी काढायची.
औक्षण करताना पाटाखाली रांगोळी........
उंबरठा सकाळी पुसायचा आणि त्यावर रांगोळी.!
यासाठी पूर्वतयारी असते. अगदी ठिपक्यांचा कागद करण्यापासून.
निरनिराळ्या प्रकारे रांगोळी काढली जाते.

संस्कार भारती,









 एक मिनिट,













तयार रांगोळ्या. खडे मोती लेस लाऊन .... कित्ती प्रकार






 ओटीचे सामान वापरून केलेली रांगोळी 



रंगानाम + आवली= रंगावली

रांगोळी

कुठलीही रांगोळी असली तरी मन प्रसन्न होते. 
आणि

 या रांगोळी भोवती मध्यभागी पणत्या लावल्या कि ती रांगोळी खुलून दिसते.

 

 

 तेवत्या... दिव्याकडे बघून मन प्रसन्न शांत होते.

रांगोळी प्रदर्शन.... एकेच ठिकाणी अनेक कलाकारांची कला बघता येते.

हा फक्त स्त्रीया मुली यांच्या पुरेसा मर्यादित कला प्रकार नाही.

••••••••••••••••••••••••••••

दिवाळी ... येणाऱ्या हिवाळ्याचे स्वागत करण्याचा (हेमंत, शिशिर हे ऋतू)

•अभ्यंग स्नानाचा,

•घराची साफसफाई,

•घर रंगवण्याचा,

•रंगांचा,

•दिव्यांच्या ओळींचा,

•रांगोळी रेखाटण्याचा,

•कंदील दिव्यांच्या माळा लावण्याचा, 

 

 

 

 

•मस्त मस्त खाण्याचा,

 

 

 •एकमेकांना भेटण्याचा,

•ग्रीटिंग तयार करून पाठवण्याचा, 

• भेटवस्तू देण्याचा/ घेण्याचा.

• दिवाळी अंक वाचण्याचा

•कपडेलत्ते खरेदी,

• नवीन वस्तू खरेदी करण्याचा,

• केलेल्या कामाची बक्षिसी,(बोनस) मिळण्याचा आणि अशी बक्षिसी देण्याचा.

• मोठी सुट्टी, आणि भरपूर दिवस असणारा सण

सणांचा राजा....अर्थात दीपोत्सव...

☆☆☆☆☆☆☆☆☆☆

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया

झळाळती कोटी ज्योती...

☆☆☆☆☆☆☆☆☆☆

★ एक दीप प्रज्वलित केला कि त्या दीपाने अनेक दीप प्रज्वलित करता येतात.
★ मंदिरात दीपमाळ लावतात.
★ त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर लावतात.
★ दीपदान , याला खूप महत्त्व आहे

मोक्षासाठी.

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....

करूया स्वागत शीतल ऋतूचे

~~~~~~~~~~~~~~
कोणी केलेले छान काव्य...
~~~~~~~~~~~~~~
आज पहाटे जाग येता
डोळे अर्धे निजलेले
दिसे तयातून बागे मधले
फूल दवांत भिजलेले
बाहेर येता असा बिलगला
मंद जरासा शीतल वारा
रवीकिरणांना शोधित शोधित
 उधळीत जाई पर्णपिसारा
मुग्ध स्वत:शी झाले सारे
कशी कुणाची पडली भूल
दंवात हसूनी पहाट सांगे
शीतल ऋतुची ही चाहूल
|| शीतल ऋतु आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा ||

۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞ ۞

No comments:

Post a Comment