Thursday, 8 September 2016

चला.... सूर्यनारायणाच्या दर्शनाला.


आजपासून मॉर्निंग वॉक.!

 येणार ना माझ्या बरोबर सूर्य दर्शनाला....

आजची सकाळ तशी उशिराच उजाडली... 
झोप छान पूर्ण झाली.!
सहा वाजता उठले ,
लगेच तयार झाले आणि निघाले.

छान प्रसन्न वातावरण .!

कुठे कुठे सार्वजनिक गणपती मंडप....
एका संस्थेच्या आवारातील आंब्याचे झाड पडलंय.! 
तो बुंधा कापायचे काम चालू आहे...
खूप वाईट वाटले !
 सकाळी फिरायला जाताना कधीतरी आंबा पडलेला दिसायचा.... 

 मनात यायचं.. 

कि भर मुंबईत राहून आपण झाडावरचा आंबा खाली पडलेला बघतोय, 

 जांभळांनी पडून झालेला जांभळा रस्ता बघतोय

आणि आज ते झाड पडलेलं बघतोय...

तसं चौपाटीवर गणपती विसर्जनाची खास व्यवस्था.... 

पिण्याच्या पाण्याची केलेली सोय,
 विजेची सोय,
 पोलीस कक्ष, 
ट्राफिक कक्ष,
 छोट्या, मोट्या गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी केलेली व्यवस्था..... 
अनेक गोष्टी अजून होतीलही.!

तसेच जे नियमित धावणे, जिमचे ट्रेनींग घेतात त्यांचा सुंदर सराव पाहण्यास मिळाला.

नेहमीच्या ठिकाणापर्यंत गेले
पण सूर्यदेव चांगले प्रखर भासले...
 नुसत्या डोळ्यांनी बघता येत नव्हते . मनोमन नमस्कार केला.! 
आणि बस दिसली समोर. मग काय लगेच बस मध्ये बसले.!

रेल्वे पास संपलाय... काढू चार दिवसांनी .!

 म्हणतात ना.. तेरड्याचा रंग तीन दिवस....

 तर चार दिवस सातत्याने गेले कि पाचव्या दिवशी काढेन पास!

तुमची सोबत असेल

तर नक्की घडेल मॉर्निंग वॉक.!

घरी आल्यावर पेपर वाचन, आणि आता तुमच्या बरोबर संवाद.!


काल संध्याकाळी एके ठिकाणी गीता अध्याय म्हणायला बोलावले होते.
 संध्याकाळी ६.०० वाजता.!
सर आणि एक ताई आल्या होत्या सगळे मिळून होतो २०/२५ जण.

अठरावा अध्याय.. त्यानंतर पसायदान म्हटले.

खूप छान वाटले.!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment