Wednesday, 7 September 2016

गणेश चतुर्थी..


४ सप्टेंबर .

संध्याकाळी बाप्पाचे आगमन झाले.

बाप्पा आला रे आला

आम्हा सर्वांना आनंद झाला

बाप्पा.!!!

एक दोन तीन चार

गणपतीचा जय जयकार

पाच सहा सात आठ

गणपतीचा थाटमाट
नऊ दहा अकरा बारा
गणपतीला घाला वारा
तेरा चौदा पंधरा सोळा
गणपती भोवती सगळे गोळा
सतरा अठरा एकोणीस वीस
गणपतीला मोदक एकवीस..

आणि घरात वेगळाच उत्साह..!

दरवर्षी प्रमाणेच वाहिनीने सुंदर केलेली सजावट... काढलेली रांगोळी. मन प्रसन्न करत होती.!

५ सप्टेंबर.... ब्रह्म मुहूर्तावर झालेली सुंदर पूजा.!

 या वेळी दुर्वा फारच छान मिळाल्या. ताजी फुले.! 

नैवेद्या साठी मस्त,

पेढे, मोतीचूर लाडू, 

सुकामेवा, गुळाचा मोदक,!!!!

यामुळे मन प्रसन्न झालंच!

म अकरा वेळा अथर्वशीर्ष इतर गणपतीची स्तोत्र..

१०८ नावे....

खूपच सुंदर वाटलं!!!

रात्री थकून गेल्यावर मी शांत पणे बसून जे पण म्हणायचं ते म्हणते
पण यावेळी मात्र सकाळी लवकर मस्त म्हणून झाले.
त्या नंतर तास दीड तास मस्त झोप झाली.
म मात्र रात्री 1 वाजेपर्यंत धामधूम.! 

रात्रीची आरती छान झाली.!

खरी आर्तता.! शांतपणे बाप्पाकडे बघत मस्त आरत्या म्हटल्या.
सकाळी ६.०० ला उठले आणि परत सर्व गडबड सुरु.! बरोबर ८.०० वाजता सकाळची पूजा झाली. पाच आरत्या म्हटल्या... येणारे..आपलेच सगळे यांच्या स्वागतासाठी सज्ज झालो.
छान गप्पा, काही नव्या गोष्टी कळत होत्या.! आणि हळूहळू बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली.!

संध्याकाळी ५.०० वाजता विसर्जनाला निघालो.

गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
पुढल्या वर्षी लवकर या.!
✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽

पाऊस पडला चिखल झाला

नदीला आला पूर

पार्वती म्हणे

धाव शंकरा....

गणपती चालला दूर.!

*******************************

मोरया मोरया मोरया मोरया.!

गणपती बाप्पा मोरया

मंगल मूर्ती मोरया

पुढल्या वर्षी लवकर या....

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

पायी हळू हळू चाला

मुखाने गजानन बोला

कपाळी केशरी गंध

गणेशा तुझा मला छंद.!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आणि अष्टविनायकाची नावे म्हणत म्हणत चौपाटीवर गेलो....
चौपाटीवर वेगवेगळ्या गणपती मूर्ती पहावयास मिळाल्या.
एक पारशी जोडपे ... आम्हाला आरती म्हणायला बोलवत होते
म मुले आरती म्हणावयास गेली
त्यांना खूप आनंद झाला... तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता....

येताना पोलीसाना प्रसाद दिला.... 
त्यांना ते खूप आवडले, 
एकमेकांना हाक मारून प्रसाद देत होते.
घरी आल्यावर सँडविच
फालुदा.!

आणि रात्री सहाजण मिळून मेंढीकोट खेळलो.

ब्रह्म मुहूर्ताला झोपलो.

आता रोजचे रुटीन सुरु झालय.!
रोजची हवीहवीशी वाटणारी भेट सुरु होईल! सुंदर विचारांची देवाण घेवाण.!

वाडीत गणपती बाप्पा आहेत..छान कार्यक्रम. आरती.! 

कोणाकोणाकडे गणपती दर्शनाला जाईन.!

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

 बाप्पाचे आगमन ४ सप्टेंबर संध्याकाळो


 सजावट









 बाप्पाची पाऊले









 ५ सप्टेंबर सकाळी पूजा झाल्यावर



   







मोतीचूर लाडू






समई ज्योत
छान शांत वाटते
दिव्याला नमस्कार

६ सप्टेंबर
संध्याकाळी


 पुनरागमनाय
पुढच्या वर्षी लवकर या......
सर्वांची मने गहिवरून आली.

No comments:

Post a Comment