Sunday, 11 September 2016

अंक ३

संख्येवरून विशेष माहिती

अंक ३

शंकराला तीन डोळे

दया ,  क्षमा,  शांती

दत्ताला तीन तोंडे :

ब्रह्मा,  विष्णू,  महेश
तंत्र,  मंत्र,  यंत्र

तीन लोक :

भू ,  भुवः ,  स्वः

बेलाला तीन दले :

अर्थ, स्वार्थ,  परमार्थ

दुर्वाला तीन दले

पळसाला तीन पाने

तीर्थ, प्रसाद, अंगारा

स्थूलदेह, वासनादेह, मनोदेह

चुलीला तीन दगड :

प्रथा,  परंपरा,  रूढी

तीन भाव : तीन गुण

सत्व,  रज,  तम

तीन विज्ञान :

जीव,  भौतिक,  रसायन

भोजन, मनन, चिंतन

प्रयोग :

कर्तरी,  कर्मणी,  भावे

शरीर, मन, बुद्धी

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा

माता पिता संतान

तीन प्रहर :

सकाळ,  दुपार,  संध्याकाळ

तीन काळ :

भूत,  भविष्य,  वर्तमान

आचार विचार उच्चार

कर्ता कर्म क्रियापद

तीन दोष : (प्रकृती)

,  वात  पित्त, कफ

तीन लोक

आकाश,  पाताळ,  पृथ्वी

तीन अवस्था:

बालपण,  तारुण्य,  म्हातारपण (वृद्ध)

जागृती, स्वप्न, सुषुप्ती

तीन नाडी ;

आदी ,  मध्य,  अंत्य
इडा,  पिंगला,  सुषुम्ना

राम, सीता, लक्ष्मण

आहार, विहार, विचार

तीन दान:

भुकेलेल्याला अन्न,  तहानलेल्याला पाणी  गरजूला पैसा

प्रीती, भक्ती, युक्ती

मातृ देवो भव
पितृ देवो भव
आचार्य देवो भव

तीन मूलभूत गरजा:

अन्न,  वस्त्र,  निवारा

तीन प्रकारचे तप :

कायिक,  वाचिक,  मानसिक

व्याकरणातील तीन पुरुष :

प्रथम,  द्वितीय,  तृतीय

तीन ताप :

आधिभौतिक,
अध्यात्मिक,
अधिदैविक

तीन लिंगे : व्याकरणातील

पुल्लिंग,  स्रीलिंग, नपुसक लिंग

त्रिस्थळी यात्रा :

प्रयाग, काशी, गया

त्रिवेणी संगम :

गंगा, यमुना, सरस्वती

तीन प्रकारचे तप :

कायिक, वाचिक, मानसिक

तीन प्रमुख रंग :

लाल, निळा, पिवळा

संकलन....

**********************
एक मेसेज तीन विषयी येतो....

संतमायबाप

तीन गोष्टींच कधीच विस्मरण होऊ देऊ नये

☞ १.कर्तव्य , २. कर्ज , ३. उपकार ,

☞ तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,

☞ १. व्यसन, २. जुगार , ३. चोरी ,

☞ तीन गोष्टीँचा नेहमी आदर करावा,

☞  १. आई , २. वडील , ३. गुरु,

☞ तीन गोष्टी इतरांना देत चला,

☞ १. दान , २. ज्ञान , ३. मान ,

☞  तीन गोष्टी भावा भावात शत्रूत्व निर्माण करतात.

☞ १. संपत्ती , २. पत्नी , ३. जमिन,

☞ तीन गोष्टी कधीही चोरी होत नाहीत,

☞  १. ज्ञान , २. चारित्र्य, ३. जिद्द ,

☞  तीन गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात,

☞ १. आई , २. वडिल , ३. तारुण्य.

☞  तीन गोष्टी अंगी असु द्याव्यात,

☞ १. नम्रता, २. सौजन्य , ३. सुस्वभाव

☞  तीन गोष्टी सांगुन येत नाहीत,

१.मूत्यु ,२. आजार ,३. वेळ.

*******************************

बघू सात चे महत्त्व...

☞ सात, सप्त, सप्तमी ☜

बघू सात चे महत्त्व...

आठवड्याचे वार :

रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार,

**********************

प्तरं :

ता ना पी हि नि पा जा (इंद्रधनुष्य)
तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा,....
०००००००००००००००००००

सप्तसुर :

सा रे ग म प ध नि

सा - षड्ज,
रे - ऋषभ
ग - गांधार
म - मध्यम
प - पंचम
ध - धैवत
नि - निषाद

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

गाण्यातील सप्तके :

तार सप्तक,
मंद्र सप्तक,
मध्य सप्तक,

«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»

सप्त ऋषी :

काश्यप,  अत्री,  भारद्वाज,  विश्वामित्र,  गौतम,  जमदग्नी,  वसिष्ठ.

~~~~~~~~~~~~~~~~

सात पाताळ :

अतल,  वितल,  सुतल,  रसातल,  महातल,  तलातल
पाताळ.

••••••••••••••••••••••••••••••

सप्तपुरी :

अयोध्या,  मथुरा ,  माया,  काशी,  कांची,  अवंती, द्वारका,

♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀

सात चिरंजीव :

अश्वत्थामा,  बळी,  व्यास,  हनुमान,  बीभीषण,
कृपाचार्य,  परशुराम,

<><><><><><><><><>

सप्तशती पाठ वाचतात.

**********************

तिथीतील सप्तमी ज्या साजऱ्या करतो :

रथसप्तमी,  शीळसप्तमी.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

ब्रहम देव :यांना सात पुत्र

अत्री,  अंगिरा,  पुलस्ती,  पुलह,  क्रतु,  मरीची,  वसिष्ठ.

♂♂♂♂ ♂♂♂ ♂♂♂ ♂♂♂ ♂♂♂♂

सात धान्ये :

साळी,  यव,  तीळ,  उडीद,  राळे,  गहू,  मसूर
(कुठल्या तरी कथेत सात धान्ये वाचल्याचे आठवत आहे.)

◎◎ ◎◎◎◎◎◎◎◎◎◎ ◎◎ ◎◎

तसं... मला वाटत मी श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्राममृत वाचले त्यात

 *सप्तद्वीप*

 वाचल्याचे आठवते.
जंबू.,  प्लक्ष , शाल्मली,  कृश,  क्रौंच,  शाक,  पुष्कर.
✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽ ✽✽ ✽✽  ✽✽  ✽

रामायणाची पण सात कांड आहेत :

बाल,  अयोध्या,  अरण्य,  किष्किंधा,  सुंदर कांड,  युद्ध,  उत्तर कांड.

*** *** *** ****** *** *** ***

सात स्मृतिगामी दैवते :

दत्त,  नारद,  व्यास,  शुक,  मारुती,  कार्तवीर्य,  गोरक्ष.
~~~~~~~~~~~~~~~~~

सप्तशृंग गड

आणि देवी

••••••••••••••••••••••••••••••

::::::::::::::::::::::::::::::::::::::::

फिरायला जाण्याचे ठिकाण

सेव्हन सिस्टर्स!
**********************

सात खंड...

अमेरिका: दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका
आफ्रिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया,  अंटार्टिका
◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇

पत्ते :

एक आवडता खेळ..
बदाम सात
77777777777777777

सात मराठे.....

वेडात मराठे वीर दौडले सात

♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡

हिंदी सिनेमाचे नाव...

सत्ते पे सत्ता

७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७

चित्रात सोप्पी चिमणी काढायची असेल तर ७ काढून 

पटकन चिमणी काढता येते.

७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७

गोष्टीची सुरुवात करताना अशी हि करतात...

सातासमुद्रपलीकडे....
シ  シ  シ  シ シ  シ  シ  シ

स्त्रीच्या जीवनातील सातचे महत्त्व...  

सात फेरे, सात पाऊले चालणे...
सात जन्माची सोबत!
सातव्या महिन्यात डोहळजेवण!
आणि बाळाचा जन्म सातव्या महिन्यात झाला तर
सातोळा, सातोळी अस म्हणतात.

シ シ シ シ シ シ シ シ ン ン ン ン ン

सात चुली...सात पिढ्या

म्हणजे चुलत चुलत...
๑๑✧๑́๑✧๑́๑✧๑́๑✧

❝  सात पिढ्याचा उद्धार केला जातो.❞

๑๑✧๑́๑✧๑́๑✧๑́๑✧

संपत्ती बाबत....

. सात पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती गोळा केली आहे.
~~~~~~~~~~~~~~

एक तिळ सात जणांनी वाटून खावा .....

✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺

जगातील सात आश्चर्ये.....

1. Christ Redeemer:
Rio de Janerio, Brazil

2.Great Wall of China:
China

3. Machu picchu : Peru

4. Pyramid at Chichen
Itza : Yucatan
Peninsula, Mexico.

5. Petra : Jordan

6. Roman Colosseum
Rom, Italy

7. Taj Mahal: Agra, India

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Thursday, 8 September 2016

बसणे.....


एके ठिकाणी गेले होते
तेथे एक बाई म्हणाल्या....

गेल्या पंधरा वर्षात मी खाली बसले नाही.!

मनात विचार आला....

किती प्रकारे आपण बसतो???

★मांडी घालून बसणे.

★बहुतेक स्त्रिया जेवताना एक पाय गुढघ्यात वाकवून दुसरा पाय जमिनी समांतर ठेवतात.
★जेवताना पूर्वी पाटावर बसून जेवत असत.
★आणि थाटामाटाने जेवणे म्हणजे चौरंगावर ताट ठेवून पाटावर बसून जेवणे.
(आता खुर्ची टेबल काटे चमचे यासह जेवण म्हणजे थाटमाट)

★काही जण मांडी थोडी वेगळी ठेवून बसतात.
म्हणजे...डावी मांडी खाली आणि उजवी मांडी वर. असे बसतात.
(यात उजवे पाऊल दिसते

सुखासनात बसून कोणतेच पाऊल दिसत नाही.)

★उकिडवे बसणे.... पाणी पिण्यासाठी असे बसावे असे म्हणतात.

★पद्मासन घालून बसणे.

(ध्यान करणे, जप करणे)

★जेवण झाले कि वज्रासनात बसणे,

«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«

★खेळ...

*खो खो खेळताना...

 एक पाय उभा आणि एक पाय गुढघ्यात पाउल उंच करून त्यावर बसतो.

* कांदा फोडी या खेळात वेगळे बसले जाते

* सागरगोटे खेळताना... विशिष्ट पद्धतीने बसतात.

★ घरातील काम करताना...

* विळीवर बसून भाजी चिरणे

* जात्यावर बसून दळताना..

मंगळागौरीचे खेळ...

गाठोडे घालताना बसण्याची पद्धत.

खाली बसल्यावर मांडी अशी घालतात कि पाऊले एकमेकांना जुळवून बसवणे.

* आक्का बाईचा कोंबडा.!

()()()()()()()()()()()()()()()()()()()()

★फतकल मारून बसणे.

★अंग चोरून बसणे

★ऐसपैस बसणे.

*********************************
★जमीनिवर पाय पसरून बसणे.(पाय लांब करून बसणे)
★नुकतीच मुलं बसू लागली कि छान बाळकृष्णाची पोझ घेऊन बसतात.
★काल एक व्हिडिओ आला होता त्यात गायीच्या दुधाची धार काढताना....
तो मुलगा उकिडवा असा बसला होता कि पाउलावर बसून दोन्ही गुढघ्याच्या मध्ये चरवी धरली होती.

● गजानन महाराज जसे बसतात तसे बसणे

★आता खुर्चीत बसले जाते.

★साईबाबा बसतात तसे बसणे

खुर्चीवर बसतात मांडी घालून.!

★रेल्वे जर रिकामी असेल तर....

पाय पसरून (पाय लांब करून बसतात.)
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
नंतर काही आलेले विचार....
काही क्रिया विस्मरणात जातात.
नेहमी करत नाही,
त्यामुळे येत नसतील असं वाटतं.
जस पळणे....
जरासुद्धा आपण धावत नाही....
म धावता येत नाही.

विळीवर बसता येत नाही.!
खाली बसता येत नाही.
कुठेही गेलो कि बसण्यासाठी खुर्ची बाक असे साधन असेल तर पटकन बसतो.
(म अस म्हणतो कि कित्ती वेळ पाय अधांतरी राहतात/ लोंबकळतआहेत).

भारतीय बैठक,

भारतीय टॉयलेट,

आता इतिहास जमा होतील बहुतेक!!!

उकिडवे बसणे विस्मरणात जाईल.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आता एक व्यायाम प्रकार म्हणून या गोष्टींकडे बघितले जाईल

उकिडवे बसणे
कपडे वाळत घालणे
मांडी घालून बसणे...

इ.

जस फार फार पूवीं

पद्मासनात बसून ध्यान करीत. 

आता साधी मांडी घालून ध्यान लावा

अस सांगतात.

*******************************

चला.... सूर्यनारायणाच्या दर्शनाला.


आजपासून मॉर्निंग वॉक.!

 येणार ना माझ्या बरोबर सूर्य दर्शनाला....

आजची सकाळ तशी उशिराच उजाडली... 
झोप छान पूर्ण झाली.!
सहा वाजता उठले ,
लगेच तयार झाले आणि निघाले.

छान प्रसन्न वातावरण .!

कुठे कुठे सार्वजनिक गणपती मंडप....
एका संस्थेच्या आवारातील आंब्याचे झाड पडलंय.! 
तो बुंधा कापायचे काम चालू आहे...
खूप वाईट वाटले !
 सकाळी फिरायला जाताना कधीतरी आंबा पडलेला दिसायचा.... 

 मनात यायचं.. 

कि भर मुंबईत राहून आपण झाडावरचा आंबा खाली पडलेला बघतोय, 

 जांभळांनी पडून झालेला जांभळा रस्ता बघतोय

आणि आज ते झाड पडलेलं बघतोय...

तसं चौपाटीवर गणपती विसर्जनाची खास व्यवस्था.... 

पिण्याच्या पाण्याची केलेली सोय,
 विजेची सोय,
 पोलीस कक्ष, 
ट्राफिक कक्ष,
 छोट्या, मोट्या गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी केलेली व्यवस्था..... 
अनेक गोष्टी अजून होतीलही.!

तसेच जे नियमित धावणे, जिमचे ट्रेनींग घेतात त्यांचा सुंदर सराव पाहण्यास मिळाला.

नेहमीच्या ठिकाणापर्यंत गेले
पण सूर्यदेव चांगले प्रखर भासले...
 नुसत्या डोळ्यांनी बघता येत नव्हते . मनोमन नमस्कार केला.! 
आणि बस दिसली समोर. मग काय लगेच बस मध्ये बसले.!

रेल्वे पास संपलाय... काढू चार दिवसांनी .!

 म्हणतात ना.. तेरड्याचा रंग तीन दिवस....

 तर चार दिवस सातत्याने गेले कि पाचव्या दिवशी काढेन पास!

तुमची सोबत असेल

तर नक्की घडेल मॉर्निंग वॉक.!

घरी आल्यावर पेपर वाचन, आणि आता तुमच्या बरोबर संवाद.!


काल संध्याकाळी एके ठिकाणी गीता अध्याय म्हणायला बोलावले होते.
 संध्याकाळी ६.०० वाजता.!
सर आणि एक ताई आल्या होत्या सगळे मिळून होतो २०/२५ जण.

अठरावा अध्याय.. त्यानंतर पसायदान म्हटले.

खूप छान वाटले.!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Wednesday, 7 September 2016

गणेश चतुर्थी..


४ सप्टेंबर .

संध्याकाळी बाप्पाचे आगमन झाले.

बाप्पा आला रे आला

आम्हा सर्वांना आनंद झाला

बाप्पा.!!!

एक दोन तीन चार

गणपतीचा जय जयकार

पाच सहा सात आठ

गणपतीचा थाटमाट
नऊ दहा अकरा बारा
गणपतीला घाला वारा
तेरा चौदा पंधरा सोळा
गणपती भोवती सगळे गोळा
सतरा अठरा एकोणीस वीस
गणपतीला मोदक एकवीस..

आणि घरात वेगळाच उत्साह..!

दरवर्षी प्रमाणेच वाहिनीने सुंदर केलेली सजावट... काढलेली रांगोळी. मन प्रसन्न करत होती.!

५ सप्टेंबर.... ब्रह्म मुहूर्तावर झालेली सुंदर पूजा.!

 या वेळी दुर्वा फारच छान मिळाल्या. ताजी फुले.! 

नैवेद्या साठी मस्त,

पेढे, मोतीचूर लाडू, 

सुकामेवा, गुळाचा मोदक,!!!!

यामुळे मन प्रसन्न झालंच!

म अकरा वेळा अथर्वशीर्ष इतर गणपतीची स्तोत्र..

१०८ नावे....

खूपच सुंदर वाटलं!!!

रात्री थकून गेल्यावर मी शांत पणे बसून जे पण म्हणायचं ते म्हणते
पण यावेळी मात्र सकाळी लवकर मस्त म्हणून झाले.
त्या नंतर तास दीड तास मस्त झोप झाली.
म मात्र रात्री 1 वाजेपर्यंत धामधूम.! 

रात्रीची आरती छान झाली.!

खरी आर्तता.! शांतपणे बाप्पाकडे बघत मस्त आरत्या म्हटल्या.
सकाळी ६.०० ला उठले आणि परत सर्व गडबड सुरु.! बरोबर ८.०० वाजता सकाळची पूजा झाली. पाच आरत्या म्हटल्या... येणारे..आपलेच सगळे यांच्या स्वागतासाठी सज्ज झालो.
छान गप्पा, काही नव्या गोष्टी कळत होत्या.! आणि हळूहळू बाप्पाच्या विसर्जनाची वेळ जवळ आली.!

संध्याकाळी ५.०० वाजता विसर्जनाला निघालो.

गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
पुढल्या वर्षी लवकर या.!
✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽

पाऊस पडला चिखल झाला

नदीला आला पूर

पार्वती म्हणे

धाव शंकरा....

गणपती चालला दूर.!

*******************************

मोरया मोरया मोरया मोरया.!

गणपती बाप्पा मोरया

मंगल मूर्ती मोरया

पुढल्या वर्षी लवकर या....

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

पायी हळू हळू चाला

मुखाने गजानन बोला

कपाळी केशरी गंध

गणेशा तुझा मला छंद.!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आणि अष्टविनायकाची नावे म्हणत म्हणत चौपाटीवर गेलो....
चौपाटीवर वेगवेगळ्या गणपती मूर्ती पहावयास मिळाल्या.
एक पारशी जोडपे ... आम्हाला आरती म्हणायला बोलवत होते
म मुले आरती म्हणावयास गेली
त्यांना खूप आनंद झाला... तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता....

येताना पोलीसाना प्रसाद दिला.... 
त्यांना ते खूप आवडले, 
एकमेकांना हाक मारून प्रसाद देत होते.
घरी आल्यावर सँडविच
फालुदा.!

आणि रात्री सहाजण मिळून मेंढीकोट खेळलो.

ब्रह्म मुहूर्ताला झोपलो.

आता रोजचे रुटीन सुरु झालय.!
रोजची हवीहवीशी वाटणारी भेट सुरु होईल! सुंदर विचारांची देवाण घेवाण.!

वाडीत गणपती बाप्पा आहेत..छान कार्यक्रम. आरती.! 

कोणाकोणाकडे गणपती दर्शनाला जाईन.!

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

 बाप्पाचे आगमन ४ सप्टेंबर संध्याकाळो


 सजावट









 बाप्पाची पाऊले









 ५ सप्टेंबर सकाळी पूजा झाल्यावर



   







मोतीचूर लाडू






समई ज्योत
छान शांत वाटते
दिव्याला नमस्कार

६ सप्टेंबर
संध्याकाळी


 पुनरागमनाय
पुढच्या वर्षी लवकर या......
सर्वांची मने गहिवरून आली.