आज २० मार्च
या निमित्ताने बालपणात गेले ,
एक घास चिऊचा, एक घास काऊचा...
असं करत करत आई, आजी कधीच वरणभात, दूधभात भरवत असत.
मुल रडू लागलं की कुठे बरं गेली चिऊ.????
करत बाळाचं रडणं चिऊला शोधता शोधता कधीच थांबत असे.
करत बाळाचं रडणं चिऊला शोधता शोधता कधीच थांबत असे.
इथे इथे बस गं चिऊ
दाणा खाऊ, पाणी पिऊ
बाळाच्या डोक्यावरून
भुर्रकन् उडून जाऊ...
दाणा खाऊ, पाणी पिऊ
बाळाच्या डोक्यावरून
भुर्रकन् उडून जाऊ...
मग थोडं मोठं झालं की,
एक होता काऊ आणि एक होती चिऊ.....
काऊचं घर होते शेणाचं आणि चिऊचं घर होतं मेणाचं.....
म्हणजे चिऊ किती हुशार ना.... पावसात वाहून जाऊ नये म्हणून ती मेणाचं घर बांधते.!
म्हणजे चिऊ किती हुशार ना.... पावसात वाहून जाऊ नये म्हणून ती मेणाचं घर बांधते.!
थोडं मोठं झाल्यावर
ती किती धीट असते....
आई तांदुळ निवडायला लागली की
ती आईच्या जवळ येऊन
भातगोटे, जरा काळे असलेले तांदुळ....
असं आईने टाकलेले भराभर टिपते.....
ती
मधेच चिव चिव असा आवाज काढते आणि दाणे टिपते.
ती सतत कामात असते.
असं वेळोवेळी कळत गेलं ….
ती सतत कामात असते.
असं वेळोवेळी कळत गेलं ….
मधेच या चिमणीला आरसा दिसला तर मात्र....असतं
ती त्या आरशावर चोच
मारतच राहते.
जणू तिथे तिचा प्रतिस्पर्धी आहे त्याला ती मारायचा प्रयत्न
करते.
मग त्या आरशावर काहीतरी आच्छादन घालावेच लागते.
मग त्या आरशावर काहीतरी आच्छादन घालावेच लागते.
गवतात चिमणचारा असं एक फूल
ही चिमणी मातीत स्नान करते. पाण्यात आनंदाने खेळते. ते अगदी बघत रहावे असे.....
हिचं घरटं मात्र कौलाच्या, घराच्या वळचणीला, पिसांचं मऊ छोटंसं घरटं.....
चिमणाचिमणी मेहनत घेऊन घरटं बांधतात.
चिमणी आपल्या पिलाला उडणं शिकवतांना मी माझ्या लहानपणी बघितलं आहे.
चिमणी आपल्या पिलाला उडणं शिकवतांना मी माझ्या लहानपणी बघितलं आहे.
कोंबडा पहिली बांग चार वाजता देतो.!
तर चिमण्यांचा चिवचिवाट, किलबिलाट पावणेसहाच्या दरम्यान सुरू होतो.
लहानपणचं एक गाणं....
चिवचिव चिमणी रबराची
कशी ओरडे गमतीची
चिवचिव चिमणी रबराची
कशी ओरडे गमतीची
चिमणाचिमणी वेगळे दिसतात.
चिमणी अळ्या तांदळाचे दाणे आवडीने टिपतात.
चिमणी अळ्या तांदळाचे दाणे आवडीने टिपतात.
चिमण्यांची संख्या कमी होत आहे....
कारणं शोधू लागता कोणी म्हणे...
नेटचे जाळे हे एक कारण आहे. त्यांचे पाय त्यात अडकतात म्हणे.
पण मला अजून एक कारण वाटतं
आणि ते म्हणजे गगनचुंबी इमारती.!
कौलारू घरं आता फार कमी दिसतात. घरटं कुठे बांधणार???
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀
असो...
आज जागतिक चिमणी संवर्धन दिवसाच्या निमित्ताने काही करता येईल का???
तर....
योगायोगाने, आजच, टेकडीवरच्या पक्ष्यांसाठी कुणी तरी १२ लाकडी घरटी, खोक्याच्या आकाराची भेट पाठविली.
योगायोगाने, आजच, टेकडीवरच्या पक्ष्यांसाठी कुणी तरी १२ लाकडी घरटी, खोक्याच्या आकाराची भेट पाठविली.
ती आम्ही टेकडीवर पोहोचविली.
दुसऱ्या
कुणीतरी ती झाडांवर बांधली सुद्धा! आता बघू त्यात वस्तीला कोण येतं!
हा मेसेज वाचला....
☆☆☆☆☆☆☆☆☆☆
☆☆☆☆☆☆☆☆☆☆
☆☆☆☆☆☆☆☆☆☆
तसंच हा चिमणी हा पक्षी का आवडतो???? ही गोष्ट वाचनात आली....
चिमणी हा पक्षी मला का आवडतो त्याला अनेक कारणं आहेत.
चिमणी ही नेहमी आपल्या उद्योगात असते.
चिमणी ही नेहमी आपल्या उद्योगात असते.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती कामातच असते.
गवताच्या काड्या गोळा करायच्या, त्या सुबक पद्धतीनं विणायच्या
आणि सुंदर घरटं बनवायचं. अंड्यातून पिल्लं बाहेर आल्यावर त्यांचं संगोपन
करायचं,
त्यांना कुठून कुठून आणून खायला घालायचं...
आणि ही सगळी कामं ती
बिनबोभाट करत असते.
आम्हांला म्हातारपणी मुलांनी सांभाळावे ही तिची अपेक्षा
नसते की
आपल्या मुलांनी आपलं नाव जगभर गाजवावं ही इच्छा नसते.
आपल्या
मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं,
आकाशात झेप घ्यावी आणि स्वतःचं पोट
स्वतः भरावे इतकीच तिची इच्छा असते.
मूल स्वावलंबी झालं की त्याचा माझा
संबंध संपला. त्याचं विश्व त्यानं उभारावं !
कर्तव्य करेन पण कुठल्या मोहपाशात अडकणार नाही.
कर्तव्य करेन पण कुठल्या मोहपाशात अडकणार नाही.
ही स्थितप्रज्ञता माणसात कधी येईल ?
आम्ही लहानपणी चिमण्यांची घरटी मोडत असू.
सुगरणीचे घरटे अर्धे
कापून आम्ही ते वासुदेवाची टोपी म्हणून डोक्यावर घालत असू.
त्यात
बऱ्याचदा अंडीही असत. आईचा मार मिळाला तेव्हाच आमचा हा खेळ बंद झाला.
आम्ही एवढ्या वेळा घर मोडले तरी कुठलीही चिमणी कधी निराश व्हायची नाही.
ती
नव्या जोमानं नवं घर बांधायची .
ध्येयावर नजर.
मी घर बांधणार आणि मुलांना
वाढवणार एवढंच ध्येय.
तिच्या जागी एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष असता तर ?
निराश होऊन त्यानं कधीच आत्महत्या केली असती.
चिमण्या पिकावर आल्या की आम्ही गोफणीने दगड मारायचो.
पण चिमण्यांना तो कधी अपमान वाटला नाही.
त्या पुन्हा पिकावर बसायच्याच.
चिमण्यांकडून मी काय शिकलो ?
कष्ट करा. कष्ट केल्याने कुणी मरत नाही, मुलांना वाढवा, ते तुमचं कर्तव्य आहे.
मुलांवर कोणतंही अपेक्षाचे ओझे टाकू नका, त्यांना त्यांच्या इच्छेने जगू द्या.
आम्ही तुम्हांला वाढवतो तुम्ही आम्हांला सांभाळा असला व्यवहार नको.
मुलांवर कोणतंही अपेक्षाचे ओझे टाकू नका, त्यांना त्यांच्या इच्छेने जगू द्या.
आम्ही तुम्हांला वाढवतो तुम्ही आम्हांला सांभाळा असला व्यवहार नको.
अपयशानं खचू नका.
नुकसान करणाऱ्याच्या ताकदीपेक्षा स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा.
यश तुमचंच आहे.
यश तुमचंच आहे.
स्वतःचं ध्येय गाठायचं असेल तर अपमान गिळायला शिका.
आहे ना चांगली शिकवण ?
म्हणूनच हा लहान पक्षी माझा मोठा गुरु झालेला आहे.
म्हणूनच हा लहान पक्षी माझा मोठा गुरु झालेला आहे.
.ツ.....ツ.....ツ.... .ツ....
.ツ.....ツ.....ツ.... .ツ....
आता चिमण्यांची संख्या कमी होत आहे.
चिमण्यांना सहज पाणी मिळत नाही
घरटी बाधायला जागा नाही म्हणून प्रयत्न केले जात आहेत
चिमण्यांना सहज पाणी मिळत नाही
घरटी बाधायला जागा नाही म्हणून प्रयत्न केले जात आहेत
जेणेकरून चिमण्यांची संख्या वाढायला हवी....
. .*""*. कृपया
( @ #> मेरे लिए
_.*".-'.., ) अपने घर की छत
.-" . ' _- ._,.-" पर दाना और
/ ,,,/" | | एक बर्तन में पानी
/ ,,,/ ^ ^ जरूर रखना
/ ,,,/N गर्मी बहुत है
आपकी चिड़िया..
No comments:
Post a Comment