Thursday, 21 January 2016

कानगोष्टी.!

खरतंर कान ऐकण्याचं काम करणारं इंद्रिय....

पण... कानाची पाळी.....

आठवतं का????
★ कान पकडून उठाबशा काढाव्या लागत,
कान पिरगळला जायचा.
का माहिती आहे???
स्मरणशक्ती , अर्थातच लक्षात रहाते
प्रेशर पॉइंटस् आहेत.

म्हणून मग कानाला खडा लावला जाऊ लागला.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संगीत क्षेत्रामधे....

 गुरूंबद्दल बोलतांना कानाला हात लावतांना मी बघितलंय.
मला वाटतं गुरुंबद्दल बोलतांना चुक होऊ नये,
किंवा .....
त्यांचं स्मरण म्हणून असेल कदाचित.!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

★ भिंतीला कान असतात...

म्हणजे आपण जे बोलतोय ते कुणी ऐकत आहे या अर्थाने म्हटलं जातं.
----------------------------------------------------------------------------------------------------
तसं कुणी काहीही बोलत असेल तर आपण म्हणतो की ....

★ या कानाने ऐकावं आणि त्या कानाने सोडून द्यावं..

त्यावर माझी मैत्रिण म्हणते... ऐकुन दुसऱ्या कानाने सोडतांना थोडं तरी डोक्यात राहतच.... (ऐकूच नये)
त्यावर दुसरी मैत्रिण म्हणते, ऐकल्याशिवाय कसं कळणार की काय सोडायचं ते....
****************************************************************

★ एखादी गोष्ट कर्णोपकर्णी कशी होते कुणास ठाऊक??

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
★ एक मस्त खेळ खेळलोय
आठवतंय....
कानात एक वाक्य सांगायचं आणि ते वाक्य दुसऱ्याच्या
 मग तिसऱ्याच्या असं क्रमाने सांगायचं आणि शेवटी 
ते पहिल्याच्या कानात सांगायचं..... वाक्यात बदल होतोच.
(खरंतर हा स्मरणशक्ती खेळ आहे, पण कानात सांगतो ना.!)

अजून एक मैदानी खेळ....

गोट्या किंवा पांढरे ढप्पर....

खेळाचे नाव.••••• बेंदा बेंदा

 यात हरल्यानंतर तो ढप्पर हात कानाला लावुन कोपराने घसटत न्यावा लागे,

किंवा दोन्ही कान पकडून दोन्ही कोपरात तो ढप्पर पकडून चौकोन आखलेल्या जागेपर्यंत न्यावा लागे.

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

कपाला सुद्धा कान असतो ना......

मैत्रिणीला कधीही विचारलं की चहा घेणार का????
तर ती म्हणते कानाखाली....


{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}
कढईला पण दोन कान असतात.
बिन कानाच्या पण कढया मिळतात.(कढलं म्हणतात)
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
जसं अभ्यास केला नाही की
★ कान पकडला जातो....
तसं....
कोणी जर
★ मनाविरुद्ध वागलं तर कानाखाली आवाज काढू का???
असं विचारलं जातं
★ किंवा कानफटात मारली जाते.
यालाच

★कानाखाली जाळ काढणे असंही म्हणतात.

|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|

★ आपल्या जवळच्या व्यक्तीचे कौतुक ऐकले की .....
कान तृप्त झाले असं म्हणतो.

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

★ जन्म झाला की अगदी बाराव्या दिवशी कान टोचले जातात.
(तो एक प्रेशर पॉइंट आहे)

∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

एखादी गोष्ट समजावून सांगतो...

 पण तीच गोष्ट योग्य व्यक्तीने सांगितली की
★ सोनारानेच कान टोचले की बरं असतं.! असं म्हटलं जातं.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 


बाळाचे नामकरण : कानात कुर्र  करून मग कानात नाव सांगतात

०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०

★ लहानपणी आपण मित्र मैत्रिणीच्या कानात गोष्टी करायचो. (कानगोष्टी)

==================================================

तर बघूया कानासंबंधी वाक्प्रचार आणि म्हणी....

१. कानाला खडा लावणे.

२. कान फुंकणे.

३. कान टवकारणे.

४. कानीकपाळी ओरडणे.

५. कान उघाडणी करणे.

६. कानावर हात ठेवणे.

७. एका कानाचे दुसऱ्या कानाला कळू न देणे.

८. कानामागून आली आणि तिखट झाली.

९. भिंतीला कान असतात.

१०. कानफटात मारणे /  कानशीलात मारणे.

११. कान तृप्त होणे.

१२. कानगोष्टी करणे.

१३. कान किटणे.

१४. सोनारानं टोचले कान...
१५ . डोळ्यात केर कानात फुंकर
==================================================
एखादी अगदी मनातली गोष्ट कोणाला कळू नये फक्त
 जीवाभावाच्याच व्यक्तीला सांगितली जाते.
(काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात..)
00000000000000000000000000000000000000000000000000
★ कान आणि डोळे यामध्ये फक्त  चार बोटांचे अंतर असते.
तरीही कानाने ऐकलेल्या गोष्टीपेक्षा
 डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवावा असं म्हणतात.
∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆

कान टोचतांना माझ्या माहितीप्रमाणे चार ठिकाणी टोचले जातात ..
.हौशीने. स्त्रिया
कानात घालण्याचे दागिने..
कर्णफुले, कुडी, झुंबरे, बूगडी, आणि खुप सारे...
पुरुषांसाठी - बाळी.!

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

 लग्नात मुलीचा भाऊ नवरदेवाचा कान पिळतो 
( माझ्या बहिणीला नीट सांभाळा )


प्रत्येकाच्या कानाच्या पाळीचा आकार वेगळा असतो,
त्यावरुन भविष्य सांगतात असं म्हणतात.

((((()))))(((()))))((((()))))((((()))))((((()))))(((()))))((((()))))((((())))

कानामुळे चेहऱ्याला शोभा येते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

2 comments: