-थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही "चौपदरी" कथा आहे !
चारची खरी बाजू 'चार' दिशेत आहे.
'चार' खांबांशिवाय घर बांधता येत नाही,
'चार' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.
'चार' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर 'चार' बोटे उमटल्याशिवाय राहत नाहीत,
'चार' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली 'चार' आवाज काढण्या सारखेच असते.
चौघे म्हणजे जणू 'चार' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात,
चारचा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.
चारचा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.
चारच्या 'वर्गा'स पुन्हा 'चार'ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसस्ष्ट घरांचे 'बळ' मिळते !
'चार' वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत,
'चार' पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !
ज्या घरात आपण राहतो ते देखील 'चौसोपी' असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !
'चार'चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसत.
'चार' लोकांपासून 'चार' हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !
स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना 'सारेगम' कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !
आपल्या जीवनाचे आधार देखील 'चार'च आहेत - दोन हात अन दोन पाय !
'चार' कडवी वाचली की कवितेची गोडी लागते,
'चार' संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात,'
चार' घास खाल्ले की पोट भरल्या सारखे वाटते
'चार' पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही,
मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर 'चौ'घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही
आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा 'चार' फुट खोल खांदावेच लागते
त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही !
सरते शेवटी असं म्हणेन की
जीवनात जीवाला जीव लावणारे 'चार' माणसं असल्याशिवाय
जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमगणार नाही !!
{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{} {}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{} {}{}{}{}{}{}{}{}{}{}
४४४४
हे आताच आलं.... आणि असं वाटलं....
अजुनही काही चार विषयी लिहिता येईल...
••००••००••००••००••००••००••००•• ००••००••००••००••००••००••००•• ००••
अजून काही चार विषयी.....
★ चार बाजुला चार पायीला केळीचे खांब......
चौरंगावरी मधे बैसले..... सत्यनारायण
काही धार्मिक कार्य म्हणजे ''चौरंग'' हवाच .
चौरंगावरी मधे बैसले..... सत्यनारायण
काही धार्मिक कार्य म्हणजे ''चौरंग'' हवाच .
★ अंतिम यात्रा "चौघांच्या" खांद्यावरूनच होते.
★ चार आश्रम - ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास.
★ चातुर्वर्ण - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र
★ चातुर्मास....
आषाढ शु. एकादशी ते कार्तिक शु. एकादशी
★ ब्रह्मदेवाला चारमुखं आपल्याला तीन दिसतात.
★ चतुरंग सेना.... हत्ती, रथ, घोडे, पायदळ
★ चार उपाय..... साम, दाम, दंड, भेद.
★ चार पुरुषार्थ.... धर्म, अर्थ, काम, मोक्ष.
★ चार युगे.....कृत, त्रेता, द्वापार, कली.
(सध्याचं युग हे कलियुग)
★ अशोकस्तंभ.... चार सिंहाची तोंडं असतात ना....
★ सुप्रसिद्ध कार्यक्रम.... चतुरंग
★ नजर कशी "चौफेर" हवी....
★ चार रस्ते एकत्र मिळतात तो चौक....
चौकात भेटू म्हणतो ना....
चौकात भेटू म्हणतो ना....
★ थंडी म्हटलं, आई आजीची मायेची उब म्हणजे "चौघडी"
★ विचारपूस करतो, चौकशी करणे म्हणतात.
(चांभार चौकशी) असाही एक वाक्प्रचार आहे..
(चांभार चौकशी) असाही एक वाक्प्रचार आहे..
* चार चौघात हस होऊ नये याची काळजी घेतली जाते .
चार लोकात नाव व्हावे म्हणून सगळे प्रयत्न करतात* लग्नाळूना … काय दोनाचे चार कधी ?
* चार दिवस सासूचे … चार दिवस सुनेचे
★ चौरस आहार घेतला की रोगप्रतिकारक शक्ती वाढते
( कर्बोदके , प्रथिने , जीवनसत्वे , आणि क्षार ज्या आहारात असतात )
भारतीय आहार चौरस आहे.
★ आता वाहने खूप झाली तर traffic जाम होतो. म्हणून झाले "चौपदरी" रस्ते.!
★ आणि दागिन्यात असतो तो
" चौपदरी " हार.... चांगला घसघशीत...
" चौपदरी " हार.... चांगला घसघशीत...
★ इतिहासातील " चतुःसुत्री " कार्यक्रम.
तर....
★ चित्रकलेत अगदी लहान असतांना
४४४४ असं लिहून कावळा काढतो ना....
★ चित्रकलेत अगदी लहान असतांना
४४४४ असं लिहून कावळा काढतो ना....
भूमितीत.....
★ चौकोन म्हणजे... चार कोन असलेली आकृती.
तर.....
★ चौरस म्हणजे.... चार बाजू आणि चार कोन समान असलेली आकृती.
तर.....
★ चौरस म्हणजे.... चार बाजू आणि चार कोन समान असलेली आकृती.
★ पत्ते खेळतो त्यातील एका लाल रंगाला आपण "चौकट" असं म्हणतो.
चांडाळ चौकडी (वाईट अर्थाने )?????
चौकडी design असते
चांडाळ चौकडी (वाईट अर्थाने )?????
चौकडी design असते
★ एक शब्द " चौथरा "
★ श्रीपाद श्रीवल्लभ भिक्षा मागतांना असे म्हणत.....
दो "चौपाती" देव लक्ष्मीगण .... असे म्हणत.
(संख्या बोधीत श्रीचरणा.....)
दो "चौपाती" देव लक्ष्मीगण .... असे म्हणत.
(संख्या बोधीत श्रीचरणा.....)
चार, चौ, चतुः, चतुर्थी, चोक, या शब्दांनी ४ या अंकाचा बोध होतो.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~
एक आलेला रीप्लाय....
चारपाय असलेले " चतुष्पाद " प्राणी.
क्रिकेट :- चार रन्स एकदम तर " चौकार "
पोळीचा चौथा भाग चतकोर.
पिकाचा चौथाभाग ती " चौथाई " वसूली.
शिवकालीन काळात प्रजेकडून गोळा केली जाई.
•••••••••••••••••••••••••••••• •••••••••••••••••••••••••••••• ••••••••••••••••••••••
तसंच काही सुचवलेले शब्द.
चौरस आहार
चार दिवस सासूचे …
दारं खिडक्यांची चौकट
चार चौघात बरं दिसत नाही , चार चौघीं सारखं दिसणे ,
चार चौघात उठून दिसणे
चारी मुंड्या चीत करणे
आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे " चो"हीकडे
" चा "रोळी : चार ओळीची कविता .
चौरस आहार
चार दिवस सासूचे …
दारं खिडक्यांची चौकट
चार चौघात बरं दिसत नाही , चार चौघीं सारखं दिसणे ,
चार चौघात उठून दिसणे
चारी मुंड्या चीत करणे
आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे " चो"हीकडे
" चा "रोळी : चार ओळीची कविता .
•••••••••••••••••••••••••••••• •••••••••••••••••••••••••••••• ••••••••••••••••••••••
Arey wah! Asa kadhi vichar kela nahi. Pan this is good!
ReplyDelete4 lakhat shodhun milanar nahit ashya 4 goshti share kelyas tu :-):-);-);-)