आताच एकदा एक गुरूजी भेटले
ते प्रत्येक बोटाचे महत्त्व सांगत होते.
त्यावेळी करंगळीचे महत्त्व त्यांनी सांगितलं नाही पण मला सुचलेलं.....
आपण जेव्हा
नमस्कार करतो तेव्हा..... करंगळी ही प्रथम समोर असते.
नमस्कार करणाऱ्याच्या....
म्हणजे प्रथम मान करंगळीला....
ते प्रत्येक बोटाचे महत्त्व सांगत होते.
त्यावेळी करंगळीचे महत्त्व त्यांनी सांगितलं नाही पण मला सुचलेलं.....
आपण जेव्हा
नमस्कार करतो तेव्हा..... करंगळी ही प्रथम समोर असते.
नमस्कार करणाऱ्याच्या....
म्हणजे प्रथम मान करंगळीला....
नेहमी लहान होवून मोठ्यांना मान द्यावा असं तर नसेल ना.!
हाताची पाचही बोटं महत्त्वाची.....
पाचामुखी परमेश्वर.....
एखाद्या बोटाला लागलं की कळतं त्या बोटाचे महत्त्व.!
आता....
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
गुरूजींनी सांगितलेलं बघू...
अंगठा - पुरुषांना गंध लावतांना.
तर्जनी - पितरांना गंध लावतांना
मधलं बोट.. स्वतःला गंध लावतांना
चौथे बोट - देवांना गंध लावतांना...
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
आणि
करंगळी.....
सर्वात लहान अगदी शेवटी उल्लेख होणारी....
पण दोन्ही हात जोडले की..... प्रथम दिसणारी...
सुंदर, मस्त, छान म्हणतांना समोर असते ती करंगळीच!
पण हाताची मूठ वळली की सगळी बोटं सारखी वाटतात का....
तर्जनी समोर आणि बाकी बोटे मिटलेली - अशी बोटाची स्थिती म्हणजे?????
एक बोट दुसऱ्यावर रोखतांना बाकी बोटं आपल्याकडे रोखली जातात ना....
तर्जनी व मध्यमा एकत्र - V= विजय..... Victory
अंगठा व तर्जनी - याने होते ती चिमटी -चिमटीने सुरेख रांगोळीची रेघ होते.
आणि गालगुच्चा पण घेतला जातो.
अंगठा - ठेंगा,
तसंच व्वा मस्त.!
अडाणी, सही करता येत नाही,
ALL THE BEST......
यासाठी पण वापरतो.....पाचही बोटे पेराने जुळवली तरी पप्पी असं दर्शवतात.
पाचही बोटे, हाताच्या पंजाने दिला जातो तो आशीर्वाद...
बघूया संस्कृत, इंग्रजी नावं
अंगष्ठ - fire - अग्नि
तर्जनी - air - वायू
मध्यमा - ether - अंतरीक्ष
अनामीका - earth -पृथ्वी
कनिष्ठा - water - आप
इंग्रजी मध्ये किती सुंदर नाव आहे कनिष्ठेला.... पिंकी.!
आपण लहान मुलांना खेळ गाण्याच्या रुपात कशी शिकवतो नावं.....
करंगळी मरंगळी मधलं बोट चाफेकळी....
तसंच लहानपणी कट्टी साठी पण करंगळी दाखवली जात असे.
व आता बोलूया....
बट्टी साठी तर्जनी व मध्यमा जुळवली की बोलावयाला सुरुवात.
<><><><><><><><><><><><><><><> <><><>
बट्टी साठी तर्जनी व मध्यमा जुळवली की बोलावयाला सुरुवात.
<><><><><><><><><><><><><><><>
आता एक आलेला मस्त रिप्लाय......
No comments:
Post a Comment