आम्ही यादिवशी
श्री श्री जगद्गुरू
शङ्कराचार्य महासंस्थानम्
दक्षिणाम्नाय
श्री शारदापीठम्, श्रृङ्गेरी
येथे श्रीमद्भगवदगीता कंठस्थ .
यासाठी गेलो होतो.
रविवार २१ जुलै सकाळी साडेआठ वाजता निघालो.
गीता कंठस्थ साड़ी....
( ड्रेस कोड साडी , अगोदर सांगितले होते)
तुंगभद्रा नदी वरील ब्रिज ओलांडून, परीक्षेचे ठिकाण आहे.
अनवाणी, पावसाळी हवामान.!
हातात आसनाची पिशवी, छत्री.!
पोहोचलो.
तेथे तीन देवळे आहेत.
दोन देवळांच्या मध्ये जागा आहे.
तेथे आपापली आसने अंथरुन बसलो.
आणि गीता म्हणायला सुरुवात झाली.
परीक्षकांनी सुरुवात केली..
ॐ पार्थाय प्रतिबोधितां
भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां
पुराणमुनिना मध्ये महाभारतम् ।
प्रथम माझे नाव होते.
त्यांनी माझ्याकडे बघून
पहिल्या अध्यायातील श्लोक सातवा
सुरुवातीची आठ अक्षरे सांगितली.
अस्माकं तु विशिष्टा ये....... मग मी म्हणायला सुरुवात केली
साताठ श्लोक झाल्यावर पुढे या क्रमाने पुढे पुढे
शेवटच्या नंबरला दुसऱ्या अध्यायमधील मधूनच श्लोक सुरुवात....
मला काही श्लोक दुसऱ्या अध्यातील आणि तिसऱ्यातील तिसरा श्लोक....
लोकऽस्मि
याची सुरुवात श्रीभगवनुवाच अशी आहे
मी असे म्हणून सुरुवात केली,
त्यांनी माझ्याकडे बघितले, स्मितहास्य केले
यानंतर मात्र जर असा श्लोक सांगायचा असेल तर
ते स्वतः सांगत होते.
परीक्षक खूप छान होते.
* छान व्यक्तिमत्त्व, आवाज सुस्पष्ट.!
* श्लोकाचे पाहिले दोन तीन शब्द सांगत.
* उगाच ट्रिकी,
* संभ्रमात पडतील असे श्लोक सांगत नसत.
* काही चूक झाली तर नावापुढे हळूच चिन्ह करत.
* आठवावे लागल्यास वेळ देत, मान हलवत तरी आठवले नाही तर सांगत,
* श्रीभगवानुवाच अशी सुरुवात असेल तर स्वतः सांगत.
पण ओघाने आले तर... आपल्याला म्हणावे लागे.
प्रत्येकी साताठ श्लोक म्हणून घेत.
असे प्रत्येक अध्यायातील
प्रत्येकाला श्लोक म्हणावे लागले.
स्पर्धा कोणतेही दडपण न येता छान झाली.
जसे आम्ही सराव करत आहोत.
प्रत्येकानी सव्वाशे ते दीडशे श्लोक म्हटले.
*आम्ही काही विसरलो नाही, आमचे काही चुकले नाही.*
आम्ही सहा जणी
श्री. जोशी सरांच्या विद्यार्थिनी, मुंबईच्या.!
आमची म्हणण्याची पद्धत सारखी,
याचा उल्लेख परीक्षकांनी केला.
आप सब एक जैसे बोल रहे है।
मग दुपारची वेळ मिळाली. अडीच.!!!!
सर्व जणी ऑफिस मध्ये अडीच वाजता पोहोचलो.
सकाळ प्रमाणे तुंगभद्रा नदीवरील ब्रीज वरून पलिकडे
आणि सकाळी गेलो त्यापुढे गेलो.
आता तर मुख्य परीक्षा.!
क्रमाने खाली बसलो
तेथील गॅलरीमध्ये ....!
प्रतीक्षा......
श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य
यांच्या दर्शनाची,
आताचे शंकराचार्य आहेत...
भारतीतीर्थ महास्वामीजी
त्यांच्यासमोर बसून सांगतील ते श्लोक म्हणण्याची/सांगतील तेवढे श्लोक म्हणण्याची.
माझाच पहिला नंबर होता.
नाव पुकारले.....
पाच सहा पायऱ्या चढून आत गेले वाकून नमस्कार केला.
बसा अशी त्यांनी खूण केली.
एक आसन होते त्यावर बसले.
अंतर असेल दोन फूट.
ते थोड्या उंच आसनावर बसले होते.
अठराव्या अध्यायातील
चौदावा श्लोक ... सुरुवातीचे शब्द सांगितले
*अधिष्ठानं तथा कर्ता*
मग मी म्हणायला सुरुवात केली.... श्लोक
*अनुबन्धं क्षयं हिंसा* ....१८|२५
तो पूर्ण म्हटला आणि त्यांनी थांबा असा हात केला.
उठले नमस्कार केला.
रूम मधे असलेले आधीचे शंकराचार्य यांच्या मूर्ती/पुतळे यांना नमस्कार केला
आणि बाहेर येऊन बसले.
क्रमाने सगळ्यांचे म्हणून झाल्यावर परत आत बोलावले
त्यांनी प्रसाद दिला , छान डाळिंब फोटो फ्रेम, कृष्ण फोटो.!
आणि एक जप लिहिण्यास वही, आणि
आशीर्वाद.!
जप: *श्री शिवाय नमः*
यात जप लिहून ती वही शृंगेरी येथे पाठवायची आहे.
(हे नंतर ऑफिस मध्ये सांगितले )
श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य: आप कहा सिखी? पुणे?
मी: दादर मुंबई,
श्री. श्रीकृष्ण जोशी सर
सर्व ऑफिस मध्ये आलो.
तेथे ग्रेड ( B ) असलेला कागद दाखवला \
आणि १८,००० रुपये तुमच्या खात्यात जमा होतील हे सांगितले.
(तीन ग्रेड असतात)
खूपच सुंदर अनुभव.!
आम्ही पूर्ण समाधानी आहोत.
आपल्याला संपूर्ण गीता मुखोद्गगद आहे.
मी एकादशी या दिवशी संपूर्ण गीता वाचते.
सरांच्या इच्छेप्रमाणे शृंगेरी येथे जाऊन आले.
याचा खूप आनंद, अभिमान आहे.
सर्टिफिकेट वर वडिलांचे नाव, माहेरचे आडनाव आहे.
याचा आनंद आहे.
असा होता २१ जुलै हा *अविस्मरणीय दिवस*
या संपूर्ण गीता पाठांतर प्रवासात माझ्या यजमानांची मोलाची साथ होती,
त्याशिवाय हे पाठांतर असे छान झाले नसते.
माझी मुलगी अर्चना तिला
जसा वेळ मिळाला तसा तिने सराव घेतला.
सरांनी घरी आमचा सराव घेतला त्यामुळे सहज तिकडे म्हणू शकलो.
अजूनही काही जणीची मदत झाली.
कोणतेही काम सहकार्याने होते.
सगळ्यात मुख्य सर यांची संथा.!!!
त्याशिवाय गीता वाचता आली नसती.
पूर्व पुण्याई, परमेश्वराचे आशीर्वाद.
थोरामोठ्यांचे आशीर्वाद,
योग्य गुरुजी लाभणे,.
मार्गदर्शक, सदिच्छा, श्रद्धा, सातत्य
स्वतः वरील विश्वास, योग्य वेळ काळ.....
सर्वच जुळून आले आणि हे यश मिळाले.....
२१ जुलै , २०१९ *विस्मरणीय दिवस.!