Tuesday, 19 November 2019

१९ नोव्हेंबर २०१९


आजपासून दोन वर्षांपूर्वी
१७ नोव्हेंबर २०११७
या दिवशी माझी संपूर्ण गीता पाठ झाली.

मी शेवटचा अध्याय पाठ केला तो 

पाचवा  अध्याय.!
कर्मसंन्यास योग.!!!
एकूण  श्लोक   २९ आहेत.
यादिवशी पहाटे शेवटचा श्लोक पाठ केला.
१६ फेब्रवारी २०१६.
यादिवशी वर्ग सुरू झाला...
सरांची इच्छा होती की तुम्ही शृंगेरीला जाऊन 
शंकराचार्य यांच्या समोर जाऊन गीता म्हणावी.
त्याप्रमाणे मी हळुहळू श्लोक पाठ करत होते...  
ध्येय समोर होते.
गीता..… भगवंताचे प्रत्यक्ष शब्द. 
आपल्याला गीता येते म्हणायला याचा खूप आनंद आहे. 
अर्थात सर, त्यांची उत्तम संथा, 
आणि घरच्यांचे सहकार्य 
आजूबाजूचे अनेक , सर्वांच्या सदिच्छा, आशीर्वाद... 
यामुळे २१ जुलै २०१९ या दिवशी गीता शृंगेरी येथे म्हटली.
माझ्या बरोबर वाडीतील अजुन दोघी आणि सरांच्या तीन विद्यार्थिनी अशा सहजणी शृंगेरी येथे जाऊन आलो.
माझा गीता पाठांतर प्रवास सगळ्यांना माहीत आहेच.

असेच आशीर्वाद, 

सदिच्छा पाठीशी असूदे.! 

कृष्ण पाठीशी आहेच. 

त्याशिवाय हे शक्य झाले नसते.


No comments:

Post a Comment