Friday, 22 November 2019

कन्याकुमारी....

भारताचे दक्षिणेकडील टोक.... 

कन्याकुमारी म्हटले कि.... 

विवेकानंद स्मारक , 
त्रिवेणी संगम समुद्राचा 
फक्त येथूनच दिसणारा हिंदी महासागर  
 समुद्रातून होणारा सूर्योदय सूर्यास्त.
 

 सूर्योदय

सकाळी लवकर उठून सर्व आवरून त्रिवेणी संगम समुद्रावर आलो.
कट्ट्यावर बसलो. 
    समुद्रातून होणारा सूर्योदय बघायला.
असा ओरिसा... जगन्नाथ पुरी येथून दोन दिवस बघितला होता.
 पण कन्याकुमारी येथे खास.!!!
 असेही माणसाला सूर्योदय सूर्यास्त बघायला आवडते.
कुठल्या ठिकाणी भेट देऊ तेथे
. आता खरा पावसाळा नाही.
पण पाऊस रेंगाळला आहे.
 आणि कुणी म्हणाले की ह्या भागात केव्हाही पाऊस पडतो.
बघू दिसतो का?

.... सगळी अनिश्चितता..
भला थोरला पावसाळी ढग असा काही होता की
 साडेपाच वाजता वाटले समोर डोंगर झाडी आहे...काळोख होता
 पावणेसहाच्या दरम्यान लक्षात आले.. समोर समुद्र आहे तर असे कसे असेल?
 समुद्रातून  होणारा सूर्योदय बघायला आलोय...
 मग तर्क सुरू ..
इकडून होणार आहे बहुतेक तिकडून होणार आहे बहुतेक..
आता एकदम वर आल्यावरच दिसेल..
 त्याच्याकडे बघवणार नाही इतका प्रखर होऊन वर येईल...
 उठी श्रीरामा पहाट झाली.. पूर्व दिशा उजळली म्हणून झाले... 
आणि अचानक एक अगदी इवलासा लाल चेंडू/ गोल समुद्रातून येताना दिसला...
एवढ्या दाट ढगातून मस्त अगदी इवलासा सुर्यागोल दिसला. मस्तच.!!!
आल्यासारखे उगवत्या सूर्य नारायणाचे दर्शन झाले.
*********************************

 सूर्यास्त...

त्रिवेणी संगम बघितला...
गांधी यांचे.... स्मारक.
येथे बहुतेक त्यांच्या अस्थी असाव्यात.
सगळे फोटो आहेत...

पूर्ण शांतता. वर गच्ची
तेथून संपूर्ण समुद्र view दिसतो.
मस्त किनाऱ्यावर बसलो.
विक्रेते खूप त्रास देतात. 
मोती माळा, फोल्डिंग गॉगल, केसाचे रबर, चहा कॉफी...फोटो काढणारे....
असो
इथे अरबी समुद्र हिंदी महासागर, बंगालचा उपसागर असे एकत्र होतात.
पाण्याचे तीन वेगळे रंग दिसतात लाटांची दिशा कळते.


 भारताचे निमुळते टोक.

 येथेच हिंदी महासागर दिसतो.
आता सूर्यास्त....
खूप दाट ढग , सकाळ इतके नाहीत पण चांगले वितभर होते.
 लवकरच होणार सूर्यास्त हे कळत होतेच.
आम्ही ५ वाजता पोहोचलो. छान पाण्यात पाय बुडवले. फोटो काढले
काही लोक पाण्यात डुंबत होते. 
काही वर्षांपूर्वी पाण्यात आम्ही असे डुंबलो होतो त्याची आठवण झाली.
असेही सूर्यास्त आपण बघतो आपल्या चौपाटीवर 
पाण्यात होतो.
सूर्योदय कसे पाण्यातून होणार हे काही आपल्याला बघायला मिळत नाही.

आपण फार कमी वेळा खास सूर्यास्त बघायला चौपाटीवर जातो.
असो. बघितला सूर्यास्त
मावळत्या दिनकरा....

त्याला ही मनोमन नमस्कार केला.
आता परत कधी येणार इकडे????
 माहित नाही.
डावीकडे सूर्योदय आणि
उजवीकडे सूर्यास्त
विवेकानंद स्मारक

No comments:

Post a Comment