Jatayu... Sculpture
Rajiv Anchal
Dedicated to Women's Safety and Honour
जटायू पक्षी रामायण कालीन... याचे शिल्प.
एका खडकात जटायू शिल्प केले आहे.
रामायणातील कथा सर्वांना माहीत आहे.
एक जटायू पक्षी
रावणाबरोबर लढला होता.
आणि राम येईपर्यंत तो तिथे प्राण रोखून राहिला होता
जेव्हा रामाला त्याने सांगितले की या दिशेने रावण सीतेला घेऊन गेला.
त्यानंतर त्याने प्राण सोडले.
अप्रतिम असे हे ठिकाण.
अतिशय उंचावर असल्याने (७०० पायऱ्या)
केबल कारने आपण वर जातो.
वाऱ्याचा आवाज ऐकू येतो या कारमध्ये.!
एका कार मध्ये सहा जण बसतात.
ओळीने एका वेळी चार कार
आहेत.
सुंदर निसर्ग दर्शन होते.
केबल कारमध्ये बसण्याचा आनंद काही वेगळाच.!!!
आणि वर आल्यावर हे सुंदर शिल्प.!!!!
रामाचे मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे.
रामाचे पाऊल मात्र बघायला मिळाले.
आता आता झाले आहे हे शिल्प
आणि लगेच जायला बघायला मिळाले.
(अजूनही काही बघायला मिळेल...)
अतिशय स्वच्छता आहे.
सगळे कसे स्वच्छ चकचकीत. नवे कोरे.
वर चहा कॉफी snacks milate.
आपण कुठेही बसू उभे राहू शकतो.
फक्त असे सुंदर ठिकाण प्रत्येकाला बघायला मिळावे
याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.
या ट्रिप मधील आजचे हे आगळे वेगळे
एका रामायण कालीन
मोठी कामगिरी केलेल्या
पक्ष्याचे शिल्प पाहून खूप आनंद झाला.
शिल्प बघून कॉफी पिण्यास बसलो आणि
धुंवाधार पाऊस....!!!
पावसाचा अनुभव घेत गरम गरम कॉफी घेण्याची मजा काही वेगळीच
आता प्रतीक्षा..... कधी नंबर लागेल केबल कारसाठी....
अरे हो.... हेलिकॉप्टरची सोय होत आहे.
हेलिपॅड बांधून तयार आहे.
पायऱ्या पण बांधत आहेत.
शाळेच्या सहली येत आहेत. मुले एन्जॉय करत आहेत.
चला बहुतेक केबल कार आली पाऊस...मस्त अनुभव
पाऊस थांबला...
सुंदर अनुभव. प्रत्येकानी या ठिकाणी भेट दिली पाहिजे.
No comments:
Post a Comment