भगवद्गीता....
यतन्तश्च दृढव्रताः
९ | १४
सततं(ङ) किर्तयन्तो मां(य्)
यतन्तश्च दृढव्रताः|
नमस्यन्तश्च मां(म्)भक्त्या
नित्ययुक्ता उपासते ||
हे महात्मेजन, सतत माझे कीर्तन करीत,
दृढनिश्चयाने प्रयत्न करीत आणि
मला वंदन करीत भक्तीभावाने
नित्य माझी उपासना करतात.
काल भगवद्गीता संथा देणारे गुरु श्री जोशी सर यांच्या घरी प्रथमच गेलो.
घरात शिरताच लक्ष गेले ते मोठ्या अक्षरात लिहिलेल्या गीतेतील ...
यतन्तश्च दृढव्रताः
याकडे...
दृढनिश्चयाने पूर्णपणे प्रयत्न करीन.
आणि खरंच...
जर कोणतेही काम करायचे असेल,
साध्य गाठायचे असेल तर
यतन्तश्च दृढव्रताः
★ हे नक्कीच लक्षात ठेवायला हवे...
आता
गीता म्हणण्यासाठी शृंगेरीला जायचे म्हणजे
खूप खूप प्रयत्न करावे
लागणार...
सतत मुखात श्लोक असावा लागणार,
काही गोष्टी...
ज्या सरांनी
वेळोवेळी सांगितल्या आहेत
त्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे
श्लोक तोंडपाठ, मुखोद्गत असावे लागणार...
कुठलाही श्लोक चटकन म्हणता यायला हवा,
○ समजा ११ व्या
अध्यायातील ३६ वा श्लोक...
स्थाने ऋषीकेश... हि सुरुवात दिली तर...
हे अर्जुन उवाच
अशी सुरुवात करून श्लोक म्हणायचा आहे.
○○ जे आपल्याबरोबर आहेत त्यांच्या म्हणण्याच्या पद्धती प्रमाणे जुळवून घ्यावे लागते.
त्यांच्याबरोबरीने श्लोक म्हणावे...
○○○ आपले लक्ष समोर जे आपल्याकडून श्लोक म्हणुन घेणार त्यांच्याकडे असले पाहिजे...
ते फक्त हाताने खूण करतात किंवा मानेने खूण करतात...
☆ यासाठीच सरांनी वर्गात सूचना केली होती
कि डोळे मिटून श्लोक म्हणू नये,
आपण सगळीकडे बघत श्लोक म्हणावा..
आपल्याला जे प्रशस्तिपत्रक मिळते त्यात
आपल्या वडिलांचे नाव असते,
कि यांची मुलगी, मुलगा...
किती छान.!
आपल्या वडिलांचे नाव प्रशस्तीपत्रकावर.!
सर बोलता बोलता..
पटकन एका श्लोकाची सुरुवात करून आपल्याकडे निर्देश करीत..
कि आपण तेथून सुरुवात करायची.
☆☆ तिकडे कसे विचारले जाणार याची झलक मिळाली.
आणि तेव्हाच कळले कि
गीता नुसतीच पाठ असून चालणार नाही तर..
. कुठलाही श्लोक पटकन म्हणता येणे गरजेचे आहे.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
बघू, सर्वांच्या सहकार्याने तो टप्पा गाठता येईलच...
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
No comments:
Post a Comment