इंद्रायणीमधे सकाळी बसलो.... चला प्रवासात सुर्योदय पाहू!
पावसाळा होवून पाच महिने झालेत,
पावसाळा होवून पाच महिने झालेत,
थंडीपण संपलीय आणि उन्हाळ्याची चाहूल लागू लागली.
कोकिळेचे कूजन ऐकू येऊ लागलंय...
सव्वासात वाजले तरी सुर्यनारायणाचे दर्शन नाही.
आकाशात तर कुठेही सूर्य दिसेल असं वाटत नाही इतकं आकाश दमटसर, धुकं
युक्त.....
असं दिसत असतांनाच
सुंदर असं सूर्यदेवांचे दर्शन.... जणू सोन्याचे तबकच...
पण आजूबाजू मात्र किंचित केशरी-सोनेरी!
सगळी जमीन मात्र रखरखीत दिसतेय.
जे रान उगवलं होतं ते सगळं वाळलंय ...
अर्थात त्याचं आयुष्यच तेवढं.....
झाडं सुद्धा निस्तेज अशी दिसत आहेत.
कर्जत आलंच की.... चला गरम गरम वडा खात खात खंडाळ्याकडे निघालो.
कर्जत आलंच की.... चला गरम गरम वडा खात खात खंडाळ्याकडे निघालो.
मस्त
डोंगररांगा, दऱ्या, डोंगरमाथ्यावर सूर्य आणि हातात मस्त कॉफीचा कप...
खंडाळा स्टेशनजवळ छान हिरवी झाडी, छोटी सुंदर घरं....
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
खंडाळा स्टेशनजवळ छान हिरवी झाडी, छोटी सुंदर घरं....
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
एवढ्यात... एस.टी...लोकांच्या भाषेत लाल डबा.!
तिचं दर्शन झालं हिचं
महत्त्व आपल्याला वाटत नाही पण....
कानाकोपऱ्यात गावोगावी पोहोचणारी...
हिचं महत्त्व खेडोपाडी आहे.
(रस्ता तेथे एस.टी)
आता फक्त साधी लाल गाडी नाही हं..
बदल झालेत ...
हिरकणी... निमआराम बस.
शिवनेरी... आरामदायी, वातानुकुलीत बस. लवकर पोहोचणारी.
बदल झालेत ...
हिरकणी... निमआराम बस.
शिवनेरी... आरामदायी, वातानुकुलीत बस. लवकर पोहोचणारी.
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
लोणावळा आलंसुद्धा.!
रेल्वेप्रवास मला फारच आवडतो.
रेल्वेप्रवास मला फारच आवडतो.
सारखे येणारे फेरीवाले.., किती विविधता असते....
चहा, ... त्यात सुद्धा मसाला, आलं घातलेला चहा आणि डीपडीप चहा,
चहा, ... त्यात सुद्धा मसाला, आलं घातलेला चहा आणि डीपडीप चहा,
कॉफी,
इडली-मेदूवडा, कटलेट, ऑम्लेट, चिकिवाले, जेलीगोळ्या,
आणि पासकव्हर, पासपोर्ट कव्हर...इत्यादी इत्यादी.
No comments:
Post a Comment