Wednesday, 27 January 2016

'चार'ची गाथा …


-थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही "चौपदरी" कथा आहे !

चारची खरी बाजू 'चार' दिशेत आहे.
'चार' खांबांशिवाय घर बांधता येत नाही,
'चार' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.
'चार' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर 'चार' बोटे उमटल्याशिवाय राहत नाहीत,
'चार' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली 'चार' आवाज काढण्या सारखेच असते.
चौघे म्हणजे जणू 'चार' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात,
चारचा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.
चारच्या 'वर्गा'स पुन्हा 'चार'ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसस्ष्ट घरांचे 'बळ' मिळते !
'चार' वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत,
'चार' पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !
ज्या घरात आपण राहतो ते देखील 'चौसोपी' असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !
'चार'चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसत.
'चार' लोकांपासून 'चार' हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !
स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना 'सारेगम' कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !

आपल्या जीवनाचे आधार देखील 'चार'च आहेत - दोन हात अन दोन पाय !

'चार' कडवी वाचली की कवितेची गोडी लागते,
'चार' संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात,'

चार' घास खाल्ले की पोट भरल्या सारखे वाटते

'चार' पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही,
मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर 'चौ'घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही

आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा 'चार' फुट खोल खांदावेच लागते

त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही !

सरते शेवटी असं म्हणेन की

 जीवनात जीवाला जीव लावणारे 'चार' माणसं असल्याशिवाय 
जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमगणार नाही !!

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

४४४४

हे आताच आलं.... आणि असं वाटलं....
अजुनही काही चार विषयी लिहिता येईल...

••००••००••००••००••००••००••००••००••००••००••००••००••००••००••००••

अजून काही चार विषयी.....

चार बाजुला चार पायीला केळीचे खांब......
चौरंगावरी मधे बैसले..... सत्यनारायण
काही धार्मिक कार्य म्हणजे ''चौरंग'' हवाच .

★ अंतिम यात्रा "चौघांच्या" खांद्यावरूनच होते.

चार आश्रम - ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास.
चातुर्वर्ण - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र

चातुर्मास....

आषाढ शु. एकादशी ते कार्तिक शु. एकादशी

★ ब्रह्मदेवाला चारमुखं  आपल्याला तीन दिसतात.
चतुरंग सेना.... हत्ती,  रथ,  घोडे,  पायदळ
चार उपाय..... साम,  दाम,  दंड,  भेद.
चार पुरुषार्थ.... धर्म,  अर्थ,  काम,  मोक्ष.
चार युगे.....कृत,  त्रेता,  द्वापार,  कली.

(सध्याचं युग हे कलियुग)

★ अशोकस्तंभ.... चार सिंहाची तोंडं असतात ना....

★ सुप्रसिद्ध कार्यक्रम.... चतुरंग

★ नजर कशी  "चौफेर"  हवी....
★ चार रस्ते एकत्र मिळतात तो चौक....
चौकात भेटू म्हणतो ना....

★ थंडी म्हटलं, आई आजीची मायेची उब म्हणजे "चौघडी"

★ विचारपूस करतो, चौकशी करणे म्हणतात.
(चांभार चौकशी) असाही एक वाक्प्रचार आहे..


चार चौघात हस होऊ नये याची काळजी घेतली जाते . 

चार लोकात नाव व्हावे म्हणून सगळे प्रयत्न करतात 


* लग्नाळूना … काय दोनाचे चार कधी ?

* चार दिवस सासूचे … चार दिवस सुनेचे 

चौरस आहार घेतला की रोगप्रतिकारक शक्ती वाढते

( कर्बोदके ,  प्रथिने , जीवनसत्वे , आणि क्षार ज्या आहारात असतात )

भारतीय आहार चौरस आहे.

★ आता वाहने खूप झाली तर traffic जाम होतो. म्हणून झाले "चौपदरी" रस्ते.!

★ आणि दागिन्यात असतो तो
" चौपदरी " हार.... चांगला घसघशीत...

★ इतिहासातील " चतुःसुत्री " कार्यक्रम.

तर....
★ चित्रकलेत अगदी लहान असतांना
४४४४ असं लिहून कावळा काढतो ना....

भूमितीत.....

चौकोन म्हणजे... चार कोन असलेली आकृती.
तर.....
चौरस म्हणजे.... चार बाजू आणि चार कोन समान असलेली आकृती.
★ पत्ते खेळतो त्यातील एका लाल रंगाला आपण "चौकट" असं म्हणतो.

 चांडाळ चौकडी (वाईट अर्थाने )?????

चौकडी design असते
★ एक शब्द " चौथरा "
★ श्रीपाद श्रीवल्लभ भिक्षा मागतांना असे म्हणत.....
दो "चौपाती" देव लक्ष्मीगण .... असे म्हणत.
(संख्या बोधीत श्रीचरणा.....)

चार, चौ, चतुः, चतुर्थी, चोक, या शब्दांनी या अंकाचा बोध होतो.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एक आलेला रीप्लाय....

चारपाय असलेले  " चतुष्पाद " प्राणी.

क्रिकेट :- चार रन्स एकदम तर " चौकार "

पोळीचा चौथा भाग चतकोर.

पिकाचा चौथाभाग ती  " चौथाई " वसूली.

शिवकालीन काळात प्रजेकडून गोळा केली जाई.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

तसंच काही सुचवलेले शब्द.
चौरस आहार
 चार दिवस सासूचे … 
दारं खिडक्यांची चौकट
 चार चौघात बरं दिसत नाही , चार चौघीं सारखं दिसणे ,
चार चौघात उठून दिसणे 
 चारी मुंड्या चीत करणे 
 आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे " चो"हीकडे 
" चा "रोळी : चार ओळीची कविता . 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Thursday, 21 January 2016

कानगोष्टी.!

खरतंर कान ऐकण्याचं काम करणारं इंद्रिय....

पण... कानाची पाळी.....

आठवतं का????
★ कान पकडून उठाबशा काढाव्या लागत,
कान पिरगळला जायचा.
का माहिती आहे???
स्मरणशक्ती , अर्थातच लक्षात रहाते
प्रेशर पॉइंटस् आहेत.

म्हणून मग कानाला खडा लावला जाऊ लागला.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संगीत क्षेत्रामधे....

 गुरूंबद्दल बोलतांना कानाला हात लावतांना मी बघितलंय.
मला वाटतं गुरुंबद्दल बोलतांना चुक होऊ नये,
किंवा .....
त्यांचं स्मरण म्हणून असेल कदाचित.!
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

★ भिंतीला कान असतात...

म्हणजे आपण जे बोलतोय ते कुणी ऐकत आहे या अर्थाने म्हटलं जातं.
----------------------------------------------------------------------------------------------------
तसं कुणी काहीही बोलत असेल तर आपण म्हणतो की ....

★ या कानाने ऐकावं आणि त्या कानाने सोडून द्यावं..

त्यावर माझी मैत्रिण म्हणते... ऐकुन दुसऱ्या कानाने सोडतांना थोडं तरी डोक्यात राहतच.... (ऐकूच नये)
त्यावर दुसरी मैत्रिण म्हणते, ऐकल्याशिवाय कसं कळणार की काय सोडायचं ते....
****************************************************************

★ एखादी गोष्ट कर्णोपकर्णी कशी होते कुणास ठाऊक??

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
★ एक मस्त खेळ खेळलोय
आठवतंय....
कानात एक वाक्य सांगायचं आणि ते वाक्य दुसऱ्याच्या
 मग तिसऱ्याच्या असं क्रमाने सांगायचं आणि शेवटी 
ते पहिल्याच्या कानात सांगायचं..... वाक्यात बदल होतोच.
(खरंतर हा स्मरणशक्ती खेळ आहे, पण कानात सांगतो ना.!)

अजून एक मैदानी खेळ....

गोट्या किंवा पांढरे ढप्पर....

खेळाचे नाव.••••• बेंदा बेंदा

 यात हरल्यानंतर तो ढप्पर हात कानाला लावुन कोपराने घसटत न्यावा लागे,

किंवा दोन्ही कान पकडून दोन्ही कोपरात तो ढप्पर पकडून चौकोन आखलेल्या जागेपर्यंत न्यावा लागे.

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

कपाला सुद्धा कान असतो ना......

मैत्रिणीला कधीही विचारलं की चहा घेणार का????
तर ती म्हणते कानाखाली....


{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}
कढईला पण दोन कान असतात.
बिन कानाच्या पण कढया मिळतात.(कढलं म्हणतात)
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
जसं अभ्यास केला नाही की
★ कान पकडला जातो....
तसं....
कोणी जर
★ मनाविरुद्ध वागलं तर कानाखाली आवाज काढू का???
असं विचारलं जातं
★ किंवा कानफटात मारली जाते.
यालाच

★कानाखाली जाळ काढणे असंही म्हणतात.

|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|•|

★ आपल्या जवळच्या व्यक्तीचे कौतुक ऐकले की .....
कान तृप्त झाले असं म्हणतो.

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

★ जन्म झाला की अगदी बाराव्या दिवशी कान टोचले जातात.
(तो एक प्रेशर पॉइंट आहे)

∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞

एखादी गोष्ट समजावून सांगतो...

 पण तीच गोष्ट योग्य व्यक्तीने सांगितली की
★ सोनारानेच कान टोचले की बरं असतं.! असं म्हटलं जातं.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ 


बाळाचे नामकरण : कानात कुर्र  करून मग कानात नाव सांगतात

०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०•०

★ लहानपणी आपण मित्र मैत्रिणीच्या कानात गोष्टी करायचो. (कानगोष्टी)

==================================================

तर बघूया कानासंबंधी वाक्प्रचार आणि म्हणी....

१. कानाला खडा लावणे.

२. कान फुंकणे.

३. कान टवकारणे.

४. कानीकपाळी ओरडणे.

५. कान उघाडणी करणे.

६. कानावर हात ठेवणे.

७. एका कानाचे दुसऱ्या कानाला कळू न देणे.

८. कानामागून आली आणि तिखट झाली.

९. भिंतीला कान असतात.

१०. कानफटात मारणे /  कानशीलात मारणे.

११. कान तृप्त होणे.

१२. कानगोष्टी करणे.

१३. कान किटणे.

१४. सोनारानं टोचले कान...
१५ . डोळ्यात केर कानात फुंकर
==================================================
एखादी अगदी मनातली गोष्ट कोणाला कळू नये फक्त
 जीवाभावाच्याच व्यक्तीला सांगितली जाते.
(काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात..)
00000000000000000000000000000000000000000000000000
★ कान आणि डोळे यामध्ये फक्त  चार बोटांचे अंतर असते.
तरीही कानाने ऐकलेल्या गोष्टीपेक्षा
 डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवावा असं म्हणतात.
∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆

कान टोचतांना माझ्या माहितीप्रमाणे चार ठिकाणी टोचले जातात ..
.हौशीने. स्त्रिया
कानात घालण्याचे दागिने..
कर्णफुले, कुडी, झुंबरे, बूगडी, आणि खुप सारे...
पुरुषांसाठी - बाळी.!

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

 लग्नात मुलीचा भाऊ नवरदेवाचा कान पिळतो 
( माझ्या बहिणीला नीट सांभाळा )


प्रत्येकाच्या कानाच्या पाळीचा आकार वेगळा असतो,
त्यावरुन भविष्य सांगतात असं म्हणतात.

((((()))))(((()))))((((()))))((((()))))((((()))))(((()))))((((()))))((((())))

कानामुळे चेहऱ्याला शोभा येते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Monday, 18 January 2016

मुंबई मॅरेथॉन...



वर्ष १३ वे....

मुंबईत जानेवारी तिसऱ्या रविवारी ही स्पर्धा होते.

ड्रिम रन -   ७ किमी.
अपंगासाठी   ३ किमी.
आणि अजून ४ किमी.
अशा स्पर्धा असतात.

नोंदणी  जुलै ३१  पुर्वी  करावी  लागते.

या  स्पर्धेत  भाग  घेण्यासाठी  क्वालिफाइंग  वेळ  लागते.
नविन भाग घेणारे...
जे प्रथमच भाग घेतात ते
NGO , किंवा जुलै पुर्वी होणाऱ्या मॅरॅथॉन मधे भाग घेऊन
 क्वालिफाईंग वेळ नोंदवावी लागते मग या मॅरेथॉन मधे भाग घेता येतो.

 २१. किमी स्पर्धा कोठून सुरू होते. 

मागीलवर्षी-

बांदरा ... सी लिंक पुर्वी सुरू होत असे. VT -station समोर संपत असे.

पण...... यावर्षी  वरळी  दुग्ध  डेअरी  येथून  सी  लिंक  मग 

सीलिंकला वळसा घेऊन हाजी अली - पेडर रोड - बाबबुलनाथ - चर्चगेट - VT असे स्पर्धक धावले.

 


४२ किमी - VT to bandra to VT.

यावर्षी...२१  किमी  स्पर्धा  ११८०५  स्पर्धकांनी   पूर्ण  केली. यामध्ये

स्त्रिया २०२३

बाकीचे  पुरूष  होते.


४२  किमी साठी.... ३६५७

पुरूष  ३३६६  पुरूष

स्त्रिया २९१.

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

एक  व्यक्ती  एखादी  थीम  घेते

वेषभुषा..सुपर मॅन

यावर्षी  पाणी  वाचवा  हा  विषय  होता.

हातात  बादली  घेऊन  ते  धावत  होते.

गेल्या वर्षी त्यांची ...

स्वच्छ  भारत  अभियान  ही थीम  होती

हातात  झाडू  ..घेऊन  ते  धावत  होते. 

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

स्टँडर्ड चार्टर्ड बँक स्पॉन्सर आहेत.

×××××××××××××××××××××××××××××××××××××××××××××

या  मॅरॅथॉन  मधे

देश-परदेशातून  स्पर्धक  भाग  घेतात. सर्व  क्षेत्रातील  लोक  भाग  घेतात.
दोन  आठवड्यापुर्वी  सर्व  साहित्य  किट  मिळते
गुडी बॅग  (goods bag)
बाहेरून  येणाऱ्या  स्पर्धकांसाठी  हे  साहित्य 
आदल्या दिवशी मिळते.

या गुडीबॅग मध्ये....

★ बीब नं जो टीशर्ट वर लावायचा असतो.
(स्पर्धक नंबर)
★ टायमिंग चीप मिळते.
स्टारटींग लाईन क्रॉस केली चीपवर वेळ सुरू होते.
Ending line पार केली की चीप वर वेळ नोंदवणे बंद होते.
यामुळे आपण नोंदवलेली वेळ कळते.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

मिलिंद सोमण.... या स्पर्धेत धावले.
असे अनेक नामवंत स्पर्धेत धावतात.
सर्व थरातून स्पर्धक असतात.

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

मॅरॅथॉन कशी सुरू झाली??

फिडिपिड्स हा ग्रीक मेसेंजर होता.
मॅरॅथॉन युद्धभूमीपासून त्याला अथेन्स पर्यंत संदेश घेऊन पाठवले....
संदेश होता....

आपण युद्ध जिंकले. हा संदेश घेऊन तो धावत अथेन्स पर्यंत धावला

तर हे अंतर ४२ किमी होते.

संदेश त्याने दिला आणि त्याचा मृत्यू झाला.

साल होतं ४९० बीसी.

(Before Christ.)



ΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠ

मॅरेथॉन सुरू झाली....१८९६ मध्ये.

तेव्हा हा ऑलिंपिक event होता.

१९२१ साली मॅरॅथॉन स्पर्धेसाठी अंतर पक्कं केलं  ते ४२.१९५ किमी. होतं.

 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

वय १०४ फक्त....
फौजासिंग मूळ भारतीय पण नंतर लंडन स्थायिक हे या स्पर्धेत हौशी म्हणून धावले
 स्पर्धकांना सपोर्ट म्हणून धावले.
त्यांच्या वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी प्रथम मॅरॅथॉन मध्ये भाग घेतला. 
त्यांच्या नावावर अनेक records आहेत.

∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞


Jio हे कँपेन  एक्स मिलिटरी जवानांना सपोर्ट करत होते एक्स मिलिटरी जवान -

 १०२ जण धावले.


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

स्पर्धकांना प्रोत्साहन म्हणून लोक .....

continue....

Four  (km) more...

Nothing....

Young man (अंगठा उंचावून)हे खास वयानी बुजुर्ग असणाऱ्यासाठी...

Run guys, run

Last four (km)

buck up

Well done....

Come on.... हे थोडं कोणी दमलं असेल तर..

Go जिs..ओS जिs..ओ

Go Mumbai go

Run Mumbai run....

अशा शब्दांनी प्रोत्साहित करत होते.


तर कोणी पायासाठी स्पे मारत होते.

खाण्यासाठी सोललेले संत्र, पिण्यासाठी झाकण उघडून पाणी, एनर्जी ड्रिंक,
खाण्यासाठी.... केक, बिस्कीट, चॉकलेटस् असे नानाविध पदार्थ देत होते.
असे जागोजागी स्टॉल्स होते.

लोक टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहित करत होते.

तर स्पर्धक.... खुप आनंदाने त्याला प्रतिसाद देत होते. 


°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°


मी जेथे उभी होते तेथून ६ किमी अंतर अजून धावायचे होते.

 

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

पाणी हवं असेल तर कोणाकडेही.... Water water... पाणी पाणी मागत होते.
पाय दुखत असेल तर ... ज्याकडे स्पे असेल .... त्याच्याकडून स्पे मारून घेत होते. 

{•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•}

मी मात्र मॅरॅथॉन enjoy केली
सकाळी साडेपाच पासून चौपाटीवर उभी होते. लोक कसे प्रोत्साहन देतात,
 त्यांना चॉकलेट कागद काढून देतात... 
पाण्याच्या बाटल्यांची झाकणं कशी उघडून देतात ते बघत होते.
 कसं सुचलं असेल यांना... असं करावं याचा मनात विचार येत होता.
एकंदरीत तेथील वातावरण आनंददायी, उत्साहित करणारं होतं.

00000000000000000000000000000000000000000000000000


७.०० च्या दरम्यान मस्त सूर्यदर्शन झाले झाडातून तेजस्वी सोनेरी-केशरी-लाल सूर्यदेवांचे दर्शन.!
पण मागे वळून बघितल्यावर होत होते. कारण आमचे सर्व लक्ष स्पर्धकांकडे होते.

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈


आता थोडं ज्यांनी भाग घेतला नव्हता त्यांच्याविषयी...

★ काही लोक पोलीस सांगत असुनसुध्दा रस्ता पार करत होते.
 (यावेळी स्पर्धकांमधुन कोणी जाऊ नये एवढीच अपेक्षा असते.)

★ लोक फुटपाथवरून स्पर्धकांना प्रोत्साहित करू शकतात
 तरीही ते धावतात त्याच्या मार्गावर उभे राहतात.
(खरंतर अति उत्साहाच्या भरात असं होत असेल) पण स्पर्धकांच्या मधे आपण येतो.

וווווווווווווווווווווווווווווווו

आता अशा ठिकाणी कसं बोललं जातं????

★अरे गरीबांच्या स्पर्धा बंद करतात... जसं
कोंबड्यांची झुंज,
बैलांच्या शर्यती,
रेड्यांच्या झुंजी,
बोकडांच्या झुंजी...

म घोड्यांची रेस का नाही बंद करत.... 

ते पण प्राणीच ना.... पण हा श्रीमंतांचा खेळ आहे ना....

★ अरे.... ते पहिले आले ना.. ते कधीच पोहोचले आहेत VT ला.. ते आता आराम करत आहेत,
हे उगाचच चमकोगिरी करतायत....
(स्पर्धक वेगवेगळे पेहराव करतात)

★ पैशांचे खेळ आहेत दुसरं काही नाही.

:-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-)

बोलणाऱ्यांचं तोंड धरता येत नाही हेच खरं.!

;-(  ;-(  ;-(  ;-( 

 

 

 

 

 

 

 

 

 

Friday, 15 January 2016

मकर संक्रांत...


तिळगूळ घ्या,

तिळागणिक या

आणि गोड गोड बोला.....
आमचा तीळ सांडू नका
आमच्याशी कधी भांडू नका..


असं म्हणायचो आम्ही.....
यामध्ये प्रेमाचा ओलावा
तिळाची स्निग्धता (स्नेहरुपाने वाटतो.)
गुळाचा गोडवा....
सगळंच आहे ना.....

कोणीही आपल्याकडे खुप यावं ही इच्छा आहे.!

असा नविन वर्षाचा पहिला मराठी सण ठरलेल्या तारखेला १४ जानेवारीला येतो. 
पण..... कधीतरी तो १५ जानेवारीला येतो.!
जसा तो यावर्षी आलाय.

तीळ स्निग्ध आणि गुळ उष्ण
यापासून बनणारे पदार्थ करतो
जसं की तिळगुळ लाडू, तिळाची वडी, गुळाची पोळी
पोळीवर तुप हवंच बरं का!
तसंच या दिवसात भाज्या खुप सुंदर मिळतात, म मिश्र भाजी करतात.

सुगड (सुघट) पूजन...

फळं सुंदर मिळतात स्त्रिया सुगडाची पुजा करतात.
 यात बोरं, उसाचे कर्वे, ओले हरभरे, गाजर जे बाळगोपाळ मंडळींना प्रिय असतं.....
तर याची पूजा करुन ते वाण घरोघरी जाऊन देतात.

संक्रांत सण..... तिळवण.!

नवविहातांचा तर हा एक मस्त सण असतो.

 सर्व दागिने .....

 हो पण ते हलव्याचेच असतात ते घालायचे छान फोटो काढायचे.....

हे दागिने बनवतांना झिग वापरावा लागतो.
 तसंच हलवा सुद्धा खास बनवावा लागतो. रंगीत पण बनवतात.
 म्हणजे दागिने सुंदर दिसतात.
जसं की मंगळसुत्रासाठी मिरीवर हलवा, काहींसाठी भोपळ्याच्या बियांवर हलवा करतात.
तिळावर केलेला हलवा फार नाजुक आणि सुरेख दिसतो.
अगदी आपण सोन्यामोत्याचे दागिने बनवतो 
तसेच हलव्याचे सर्व दागिने बनवले जातात.



जावयासाठी थोडा मोठा लाडू करायचा. 

त्यात रुपया, अंगठी पुर्वी लपवत असत.

गुच्छ, मोबाईल, हार, अंगठी असे दागिने केले जातात.

हळदीकुंकू

काहीतरी वस्तू लुटतात.
पण नवविवाहिता हळदीकुंकु, हिरव्या बांगड्या,आरसा, फणी,
अशा पाच वर्ष पाच वस्तू लुटतात.
आता लुटणे म्हणजे काय????
 तर जे आपल्याकडे जास्त आहे ते वाटणे.


बोरन्हाण....

छोटी साधारण वर्षासव्वावर्षाच्या मुलांचा हा सण करतात.

 या छोट्यांना पण हलव्याचे दागिने करायचे, आणि

 बोरं, चॉकलेटस् हलवा, उसाचे कर्वे गाजराचे तुकडे, द्राक्ष, असं डोक्यावरुन घालायचं ,

जी छोटी मुलं आपण बोलावलेली असतात ......ती मग छोटी मंडळी हे छान वेचून खातात.




पतंग उडवणे.....

आकाश अगदी रंगीबेरंगी पतंगांनी भरलेलं दिसतं,
बडोदा येथे स्पर्धा होते, खुप मोठी. मी कधी ही स्पर्धा बघितली नाही.
पण ऐकलं मात्र भरपूर आहे.
गुजराथमधे यादिवशी उंधियो, जिलबी, फाफडा असं गच्चीवर नेतात,
 दिवसभर पतंग उडवायचे आणि हे मस्त खायचं.


卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐 卐

मकर संक्रांत....

सुर्याचा मकर राशीत प्रवेश होणार म्हणजे दिवस हळूहळू मोठा होणार.

(आता दिवस तिळातिळाने मोठा होणार)

संक्रांत म्हणजे संक्रमण,स्थित्यंतर.! सुर्य उत्तरेकडे वळणार.
म्हणजेच हा आहे उत्तरायणाचा काळ...!!!
भूगोल दिन असंही म्हणतात.
कारण हा भौगोलिक दृष्ट्या साजरा होणारा सण आहे.
(भारत हा उत्तर गोलार्धात आहे.)
सुर्य हा उत्तरेकडे सरकणार.!

काळा रंग..... संक्रांतीचे विशेष.....

ऋतुमानाप्रमाणे हिवाळा...  म्हणजे थंडी असते तर 

थंडी रोखण्याचे काम काळा रंग करतो.

 किंवा गडद रंग थंडीपासून संरक्षण करतो म्हणून काळा रंग.

एरव्ही कोणत्याही सणाला काळा रंग शक्यतो वापरत नाही पण

 या सणाला आवर्जुन काळे कपडे परीधान करतात.

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

तिळासारखी हृदयी शुभ्रता।

अंतर्यामी शरीरी शुचिता ।

गुळासारखी मुखी मधुरता ।

वाणीमध्ये येवो मृदुता ।।

                         संकलन

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

 

 


                                       गूळाचीपोळी 


 

Sunday, 10 January 2016

करंगळी.....


आताच एकदा एक गुरूजी भेटले
ते प्रत्येक बोटाचे महत्त्व सांगत होते.
त्यावेळी करंगळीचे महत्त्व त्यांनी सांगितलं नाही पण मला सुचलेलं.....
आपण जेव्हा 
नमस्कार  करतो  तेव्हा.....  करंगळी  ही प्रथम  समोर  असते.
नमस्कार  करणाऱ्याच्या....
म्हणजे  प्रथम  मान  करंगळीला....

नेहमी  लहान  होवून  मोठ्यांना  मान द्यावा असं  तर  नसेल  ना.!

हाताची पाचही बोटं महत्त्वाची.....

पाचामुखी परमेश्वर.....

एखाद्या बोटाला लागलं की कळतं त्या बोटाचे महत्त्व.!
आता....

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

गुरूजींनी सांगितलेलं बघू...

अंगठा - पुरुषांना गंध लावतांना.

तर्जनी - पितरांना गंध लावतांना

मधलं बोट.. स्वतःला गंध लावतांना

चौथे बोट - देवांना गंध लावतांना...

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

आणि

 करंगळी.....


सर्वात लहान अगदी शेवटी उल्लेख होणारी....
पण दोन्ही हात जोडले की..... प्रथम दिसणारी...

सुंदर, मस्त, छान म्हणतांना समोर असते ती करंगळीच!


पण हाताची मूठ वळली की सगळी बोटं सारखी वाटतात का....

तर्जनी समोर आणि बाकी बोटे मिटलेली - अशी बोटाची स्थिती म्हणजे?????

एक बोट दुसऱ्यावर रोखतांना बाकी बोटं आपल्याकडे रोखली जातात ना....

तर्जनी व मध्यमा एकत्र - V= विजय..... Victory

अंगठा व तर्जनी -  याने होते ती चिमटी -चिमटीने सुरेख रांगोळीची रेघ होते.
आणि गालगुच्चा पण घेतला जातो.
अंगठा - ठेंगा,
तसंच व्वा मस्त.!
अडाणी, सही करता येत नाही,

ALL THE BEST......

यासाठी पण वापरतो.....

पाचही बोटे पेराने जुळवली तरी पप्पी असं दर्शवतात.

पाचही बोटे, हाताच्या पंजाने दिला जातो तो आशीर्वाद...

बघूया संस्कृत, इंग्रजी नावं

अंगष्ठ - fire - अग्नि

तर्जनी - air - वायू

मध्यमा - ether - अंतरीक्ष

अनामीका - earth -पृथ्वी

कनिष्ठा - water - आप

इंग्रजी मध्ये किती सुंदर नाव आहे कनिष्ठेला.... पिंकी.!


आपण लहान मुलांना खेळ गाण्याच्या रुपात कशी शिकवतो नावं.....
करंगळी मरंगळी मधलं बोट चाफेकळी....

तसंच लहानपणी कट्टी साठी पण करंगळी दाखवली जात असे.

व आता बोलूया....
बट्टी साठी तर्जनी व मध्यमा जुळवली की बोलावयाला सुरुवात.
<><><><><><><><><><><><><><><><><><>
आता एक आलेला मस्त रिप्लाय......

हं मस्त!!!!!
पंचमहाभूतांची पाच बोटे मानली जातात त्यात करंगळी  = आप.
म्हणजे जल तत्वाची आहे.

म्हणून आपण शू करायला जायला परवानगी मागताना कगंगळी दाखवायचो.

००००००००००००००००००००००००००००००००००

Wednesday, 6 January 2016

नवं वर्षाचं वेगळेपण...



आज मॉर्निंग वॉक..च्या ऐवजी नाईट ड्राइव्ह...

नवं वर्षाचं वेगळेपण...
काल जावयाने गाडी घेतली, म आता राऊंड मारायला गेलो.
(रात्री दहाच्या दरम्यान)
मस्त दृश्य....
आकाशात मोठे मोठे कंदिल सोडत होते.
  हे दिसायला वेगळे दिसत होते,
म्हणजे हल्ली असेच असतात, आता जवळुन बघायचे आहेत.

लहान असतांना मोठा भाऊ पतंग उंच गेला की त्या दोऱ्याला कंदील सोडत असे ती आठवण झाली.
मस्त आहे हे! छोटे कंदील!
सोडायला हवेत.!
आता कधीतरी जाईन रात्री,
कंदील बघायला.
आणि फोटो काढेन.

जत्रा....

मुलं लहान असतांना जत्रेला घेऊन जात होतो.....
तर तशी जत्रा... बालभवनच्या छोट्या मैदानात भरली आहे.
म्हटलं सांगू तुम्हाला.!
आणि दादरच्या गार्डन मधे जत्रा असली की तू बोलावत असे आणि
 मुलं ,आपण पण ती जत्रा enjoy करायचो
है ना.....

संक्रात आली जवळ.....

मोठा भाऊ पतंग उडवायचा,
 पतंगाला   लांबचलांब शेपटी असायची...
तर आकाशात उंच गेलेला पतंग आणि त्याची छान दिसणारी शेपटी.....!!!!

अगं काही वर्षापुर्वी दोन व्यक्ती प्रत्येकी १११, १०० पतंग उडवत होते

त्याची clip घेतली आणि माझी रनिंग कॉमेंट्री
तो अेक वेगळा अनुभव.!
त्याचवेळी रात्री आकाशात असे कंदील गिरगावातून उडत येतांना बघितले होते.
आज मात्र नरीमन पॉइंटला बघितले सोडतांना.!

<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

Saturday, 2 January 2016

नववर्ष दिन.!


१ जानेवारी २०१६
आंग्ल नववर्ष दिन....
सर्वांना या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा.!

सकाळी जाग आली तीच कोंबड्याच्या बांगेने.!

मी दादरला गेले होते. तेथे अजुनही कोंबडा आरवतो.
चार वाजता.!
मग तो थोड्या थोड्या वेळाने ओरडतो.
मस्त ना.....

अजुनही भर मुंबईत कोंबडा आरवतो...!

असं ह्या वेगळेपणाने नववर्षाची सुरुवात सुंदर झाली