Tuesday, 23 July 2019

गीता कंठस्थ स्पर्धा शृंगेरी


१९ जुलै मत्स्यगंधा टिळक टर्मिनस दुपारी साडेतीनची रेल्वे.!

घरून सव्वा वाजता निघालो सगळ्यांच्या शुभेच्छा, सदिच्छा घेऊन.!

वाडीतील काहीजण बाय करायला आले होते, 
कोणी फोन करून कोणी व्हॉटसअप करून शुभेच्छा देत होते.
साडेतीन वाजता रेल्वे सुटली 
आणि आम्ही जरा गप्पा टप्पा झाल्यावर नेहमी प्रमाण सराव केला 
संपूर्ण गीता मिळून म्हटली. गाडीत सराव छान झाला.
रेल्वे उडुपी येथे २० तारखेला पोहोचली.!
उडुपी ते शृंगेरी अडीच तास बाय रोड प्रवास करून आम्ही पोहोचलो.
सुंदर निसर्ग, 
साथीला खूप पाऊस चढण असलेला घाट,
 बाजूने सुंदर भात शेती नारळ पोफळी ची झाडे 
टुमदार घरे बघत बघत शृंगेरी येथे पोहोचलो
लगेच ऑफिस मध्ये गेलो आम्ही सहा जणी आलो आहोत, हे सांगितले,
 ओळख पत्र आणि बँक डिटेल्स दाखवले त्यांनी ड्रेसकोड सांगितला.
मग रूमस बुक केल्या तिसरा मजला.....
लिफ्टची सोय आहे.
रूम्स छान आहेत.
मग प्रसादाचे जेवण जेवलो.
 साडेचार वाजता ऑफिस मध्ये त्यांनी बोलवल्या प्रमाणे गेलो.

२१ जुलै यादिवशी ची वेळ कळली. सकाळी आठ.!!!!

तेथील मंदिरे बघायला गेलो 
साथीला पाऊस होताच आणि पायात चप्पल नाहीत.
 अनवाणी चालणे.
 रूम वर आल्यावर सगळ्यांनी संपूर्ण गीता म्हटली.
रात्री लवकर जेवण केले.
दहाच्या दरम्यान झोपलो.

No comments:

Post a Comment