बहावा... बहावा...
या फुलांची / झाडाची अगदी प्रथम ओळख बहावा कवितेने करून दिली..तो पर्यंत काहीच माहिती नव्हती.
प्रवासात जशी पळती झाडे दिसतात तशी झाडे बघत असू...
माहिती नव्हती, पण माहिती झाल्यावर....
झाड शोधू लागले
प्रथम ते बिग बाजारच्या वळणावर दिसले
अगदी हाकेच्या अंतरावर.!!
आणि उन्हाळ्यात कुठे बाहेर निघालो कि शोध घेते कुठे दिसते फुललेले झाड?
आणि अनेक ठिकाणी दिसते हे झाड
याचा शोध घेताना अनेक फुलझाडे आपले स्वागत करत असतात.
हे नजरेस येऊ लागले.
आणि लिहिणे वाढत गेले या फुलांबद्दल
गेल्या आठवड्यात विरार येथे जाताना मस्त दिसले पाच सात ठिकाणी.
फुललेली झाडे , कुठे फिक्कट पिवळा
तर कुठे खरच गर्द पिवळा जणू सोनेरी.!!
फुललेली झाडे , कुठे फिक्कट पिवळा
तर कुठे खरच गर्द पिवळा जणू सोनेरी.!!
मस्त वाटले.
आपण या झाडाला ओळखतो थोडी माहिती आहे आपल्याला.
नजर शोधक असते हे झाड, फुले बघायला.
चारपाच वर्षांपूर्वी नाव सुध्दा माहित नव्हते..
आणि या माध्यमातून सुंदर फोटो आणि कविता आली.
कळल्यावर पहिले दर्शन बिग बाजार रस्त्याच्या वळणावर झाले.
आणि नंतर कुठेही जाताना
उन्हाळ्यात हि फुले दिसतात का हे बघत असते.
लॅबर्नम, पांगारा, गुलमोहोर, बोगनवेल, रेन ट्री, शंकासुर, देवचाफा, लालचाफा,
नागचाफा,/ कैलास्पती, तगर, बिट्टी ची पिवळी फुले हि फुलझाडे वाटोवाट दिसतात.
उन्हाळ्यात हि फुले दिसतात का हे बघत असते.
लॅबर्नम, पांगारा, गुलमोहोर, बोगनवेल, रेन ट्री, शंकासुर, देवचाफा, लालचाफा,
नागचाफा,/ कैलास्पती, तगर, बिट्टी ची पिवळी फुले हि फुलझाडे वाटोवाट दिसतात.
आता खूप ठिकाणी दिसतो तो बहावा... अगदी बांद्रे मालाड इकडे ऐरोली...
आणि दुसरे फुलझाड.. असेच या माध्यमातून ओळख झाली ती पिंक tabebuia...
प्रथम बघायला गेले ती बलार्ड पिअर, तेव्हा वाटले एकच झाड आहे कि काय? मुंबईमध्ये..
.
प्रथम बघायला गेले ती बलार्ड पिअर, तेव्हा वाटले एकच झाड आहे कि काय? मुंबईमध्ये..
.
पण आमच्या आसपास तर खूप आहेत हि झाडे...
आणि अजून एक नाव माहित नाही जांभळी घोसानी येणारे फुलझाड.!
आणि अजून एक नाव माहित नाही जांभळी घोसानी येणारे फुलझाड.!
या माध्यमाला धन्यवाद.!
अजून एक ... कांचन वृक्ष
ऑपेरा हाऊस च्या सिग्नलला आहे...
मस्त फुलतो.
हा अगदी लाल नाही पण त्याच रंगातील आहे.
कुणी म्हणे पिवळा पण असतो.
तो मात्र अजून बघण्यात नाही...
पण हे झाड मात्र बहरलेले बघते....
नजर शोधक असते कोणते झाड,
कोणती फुले... रस्त्याच्या कडेने आहेत?
सर्वच झाडांची नावे माहित नाहीत.
कोणती फुले... रस्त्याच्या कडेने आहेत?
सर्वच झाडांची नावे माहित नाहीत.
असे अबोली रंगाच्या
फुलांचे झाड/झाडे आमच्या आसपास दिसतात,
नाव मात्र माहित नाही.!
फुलांचे झाड/झाडे आमच्या आसपास दिसतात,
नाव मात्र माहित नाही.!
अगदी पाने वाटावीत अशी पोपटी फुले आणि पाने थोडी गडद
अशी झाडे सुध्दा आमच्या आसपास आहेत
चिमण्या सारखे पण थोडे मोठे पक्षी
आपली टोकदार चोच फुलात खुपसून फुलातील रस चोखत असतात.
अशी झाडे सुध्दा आमच्या आसपास आहेत
चिमण्या सारखे पण थोडे मोठे पक्षी
आपली टोकदार चोच फुलात खुपसून फुलातील रस चोखत असतात.
शंकासुर:
साधारण हे झाड पारशी अग्यारी आवारात बघितले आहे.
केशरी पिवळी फुले असतात.
साधारण हे झाड पारशी अग्यारी आवारात बघितले आहे.
केशरी पिवळी फुले असतात.
कण्हेर:
गुलाब वाटावेत असे फूल असते.
गुलाबी पांढरी फुले बघितली आहेत.
खूप असतात हि झाडे,
डीव्हायडर असतात तेथे
आणि आवारात मुद्दाम लावलेली असतात.
गुलाब वाटावेत असे फूल असते.
गुलाबी पांढरी फुले बघितली आहेत.
खूप असतात हि झाडे,
डीव्हायडर असतात तेथे
आणि आवारात मुद्दाम लावलेली असतात.
रुही:
दोन प्रकारात असते रुही ,
पानात फरक दिसतो तसा फुलात सुध्दा फरक दिसतो...
वाटोवाट दिसतात रुही ची झाडे आणि जांभळट फुले,
मनुष्यभर उंचीची असतात झाडे.
दोन प्रकारात असते रुही ,
पानात फरक दिसतो तसा फुलात सुध्दा फरक दिसतो...
वाटोवाट दिसतात रुही ची झाडे आणि जांभळट फुले,
मनुष्यभर उंचीची असतात झाडे.
अनेक शोभेची झाडे आणि त्याला फुले बघते.
उन्हाळी लिली, हाराची लिली
हि मुद्दाम लावलेली झाडे बघायला मिळतात.
हि मुद्दाम लावलेली झाडे बघायला मिळतात.
रेन ट्री
बद्दल परवाच वहीनी सांगत होती...
बद्दल परवाच वहीनी सांगत होती...
पावसाळ्यात याची पाने मिटलेली असतात.
जर सूर्यदर्शन होणार असेल तर याची पाने उघडतात.
शाळेत असताना बाहेर येऊन बघायचो कि पाने कशी आहेत?
मिटलेली म्हणजे अजून पाऊस पडणार....
याचा खूप आनंद व्हायचा....
मिटलेली म्हणजे अजून पाऊस पडणार....
याचा खूप आनंद व्हायचा....
हि झाली फुलझाडे...
******************************
मार्च मध्ये आंब्याचा मोहोर दिसतो
आणि आता कैऱ्या दिसू लागल्या आहेत.
डाळिंब : कुठेतरी दिसते, फुले फार सुंदर दिसतात
आणि छोटी छोटी डाळिंबे बघितली आहेत.
आणि छोटी छोटी डाळिंबे बघितली आहेत.
अंजीर : एकदाच एक झाड नेरळ येथे बघितले होते आणि अंजीर लागलेले होते.
मध्यंतरी कलिंगडाचा वेल बघितला छोटी कलिंगडे लागली होती.
फणस... मस्त सहज हात लावता येतो
असे मुंबईत वरळीला झाड बघितलंय.
केळी: लोंगर बघितला आहे अगदी हाकेच्या अंतरावर.!
असो
पेरू : अगदी कुठेही दिसते झाड.
अगदी छोटे पेरू जे खाता येत नाहीत असे मुलं तोडतात.
बदाम: समुद्र किनारी ओळीने असतात.
फुले नाजूक सुंदर रंगांची सकाळी आपोआप पडतात.
आणि बदाम सुद्धा खाली पडलेले बघतो ते फळ असते
वरील आवरण काढले कि आत ओले बदाम असतात.
पेरू : अगदी कुठेही दिसते झाड.
अगदी छोटे पेरू जे खाता येत नाहीत असे मुलं तोडतात.
बदाम: समुद्र किनारी ओळीने असतात.
फुले नाजूक सुंदर रंगांची सकाळी आपोआप पडतात.
आणि बदाम सुद्धा खाली पडलेले बघतो ते फळ असते
वरील आवरण काढले कि आत ओले बदाम असतात.
मुंबई मध्ये राहून हे सर्व बघता येते अनुभवता येते याचा आनंद होतो.
*****************************
No comments:
Post a Comment