माझा जन्म १५ एप्रिल १९६०
सकाळचा
जन्म दादर येथे झाला.
वाढदिवस साठावा....
१५ एप्रिल २०१९.
खास वाढदिवस... साठ लागले.
रात्रीच सिद्धी ने एक कविता पाठवली.
१४ एप्रिल रात्री साडेदहाच्या दरम्यान कविता पाठवली.
प्रिय काकू...
आज तुमचा वाढदिवस म्हणुन तुमच्यासाठी ही कविता भेट...
मी स्वतः खास तुमच्यासाठी लिहिलेली .!!
कुठलीही नाती काही ठरवून जोडता येत नाहीत
काकू तुमच्यासारखी माणसं पुण्याशिवाय भेटत नाहीत
वर्षामागून वर्ष दिवसामागून दिवस असे निघून जात राहतात
काही ओळखी जुन्या होतात तशा मुरांब्यासारख्या मुरतात
तसे तुमचे माझे मैत्रीचे नाते फुलत गेले
शिक्षिका विद्यार्थिनी पलीकडचे बंध घट्ट झाले
आज तुमच्या वाढदिवशी वाटे देवाकडे तुमच्यासाठी किती अन् काय काय मागू..
म्हटलं जगातली सगळी सूखं तुम्हाला मिळोत इतकच त्याला सांगू
देव हसून मला म्हणतो.. चांगल्या माणसांच्या हृदयात मी नेहमीच वसतो
मी म्हटल म्हणून का काकूंच्या प्रत्येक भेटीत देवा मला तू आणि तूच भासतोस
From :तुमची छोटी what's aap friend.. आणि विद्यार्थिनी सिद्धी...
यावर माझा रिप्लाय
सिद्धी,
कित्ती सुंदर शब्दात तू माझ्याबद्दल काय वाटते ते लिहिले आहेस....
डोळे भरून आले...
कविता लगेच वाचली आणि परत 12.00 वाजता वाचली.
पण रिप्लाय मात्र आत्ता देत आहे
माझी मुले जमली आणि म गप्पा... माझ्या आवडत्या.!!!
पहिला रिप्लाय तिच्या कवितेला
Wah Wah
Khupach Sundar!!!!!!
आणि नंतर काही मैत्रिणीचे रिप्लाय या कवितेला...
* Mast kavita. Yathayogya tuze varnan.
सिद्धि.,
वा सुंदर collage करून mazhi कविता पोस्ट केलीत
खूप खूप धन्यवाद मला छान वाटतय..
(कानातले सिध्दीने दिले आहेत. )
खूप खूप धन्यवाद मला छान वाटतय..
(कानातले सिध्दीने दिले आहेत. )
प्रसन्न सकाळचा प्रसन्न फोटो
आणि
* एका माझी मैत्रीणीचा...
फारच टचिंग.
प्रेमाचा झराच वाहिला.
तिला मुद्दाम सांग जे खर आहे तेच ओघवती भाषेत लिहिले आहेस.
तिच्या कवितेला माझे अनुमोदन आहे.
असे तिच्या कवितेला रिप्लाय आले.
आता काही मैत्रिणींच्या शुभेच्छा
* एक मैत्रीण
Wishing you a
very very very very very very very very very very very very very very very very very very very happy birthday!!!!
With lots of love!
* अजून एक मैत्रीण
रेखा तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .
जिच्या गुड मॉर्निंग मेसेज नि आपली दिवसाची सुरुवात होते...
बोलायला मृदु , अतिशय गुणी अशी तू अनेक कला अवगत असलेली hightech मैत्रीण
का hightech म्हटलं कळलं का?
स्वतःचा ब्लॉग लिहिणारी ( feel proud of you ) ....
sequence म्हणू नका हा एक खेळ आहे
अशा अनेक गुणांनी युक्त .....
अशा या माझ्या मैत्रिणीला
Sequenceपरिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
सगळ्या स्मार्ट मैत्रिणी
* एक मैत्रीण
पाठांतराची , लिखाणाची आवड असणाऱ्या
आणि खूप सारे ब्लॉग लिहिणाऱ्या ,
कुठल्याही वयोगटात मिसळणाऱ्या ,
शांत सुस्वभावी रेखाताई ह्यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आणि खूप सारे ब्लॉग लिहिणाऱ्या ,
कुठल्याही वयोगटात मिसळणाऱ्या ,
शांत सुस्वभावी रेखाताई ह्यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
* एक मैत्रीण
माझ्या गोड काकू ,
मुंबईची माझी आई, माझी मैत्रीण,
विवान ची मुंबईची आजी ला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ,
मुंबईची माझी आई, माझी मैत्रीण,
विवान ची मुंबईची आजी ला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ,
keep smiling always, love you kaku.!
:::::::::::::::::::::::::::::: ::::::::
आजची सकाळ मुलगी आणि जावई....
आज brunch
साठी गेलो... प्रथमच
सर्वच आवडते पदार्थ....
००००००००००००००००
आता अजुन एका ग्रुप वरील कविता.... वैशिष्टयपूर्ण...
नावाचे आद्याक्षर घेऊन केली आहे.
सौ. रेखाताई आज आपला जन्मदिवस...!
जन्मदिनाच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा .!!!
"जीवेत शरदः शतम् ."!!!
रे.ः-- रेषा सौभाग्याच्या लखलख उजळाव्या
निरंतर तव जीवनी !
खा.ः-- खास दिन हा आज भरावा आप्त-
जनांच्या शुभेच्छांनी !
ता.ः-- ताटवा सौख्य फुलांचा नित बहरावा
सुंगध रुपे भरूनी !
ई.ः-- ईच्छित व्हावे सफल मनोरथ सारे
श्री सद्गुरु कृपाशिर्वादांनी!
शतवरूषे आयुष्याला साथ मिळावी
निरोगी निरामय स्वास्थ्याची!
हात जोडूनी हीच मागणी आज असे
श्री सद्गुरु चरणी.....!!
२)
रे.ः-- रेशीम गाठी जुळून यावे बंध अतूट
नात्यांचे .!
खा.ः-- खास भेट हे आयुष्य असावे वरदान
श्री ईशकृपेचे.!
ता.ः-- ता ना पि हि नि पा जा च्या सप्त
किरणांसम इंद्रधनू खुलावे सौख्याचे .!
ई.ः-- ईशकृपेच्या आशिर्वादे उजळून यावे
सुवर्ण क्षण हे सद्भाग्याचे .!
शतवरुषे आयुष्य ठरावे जीवन गीत एक
ते आनंदाचे .!!!!
(नीलिमा ..१५/०४/१९)
आणि दोन कविता
ना मला कधी यांनी बघितले
ना मला ओळखत
फक्त ग्रुप वर कविता पाठवतात
त्याला माझा रिप्लाय असतो
तोच परिचय.!!!!
••••••••••••••••••••••••••••
आजची संध्याकाळ...
मुलगा आणि सून यांच्याबरोबर आम्ही.!
एका वैशिष्ट्य पूर्ण हॉटेल मध्ये.!!!
म्हणजे भारतातील राज्ये आणि
तेथील खाद्यपदार्थ वैशिष्ट्ये असे काहीसे आहे
घराजवळच
इतर हॉटेल पेक्षा वेगळे मसाले होते.
वांगे भरीत मस्तच होते...
मी नुसते खाल्ले.
आणि चांगले भरपूर होते.
मी घरी करते त्यापेक्षा हटके होते...
स्टार्टर पण छान होते.
No comments:
Post a Comment