घरात आपण नेहमी ऐकतो कि
वास्तू पुरुष तथास्तु, तथास्तु म्हणत असतो.
घरात शुभ बोला रे, अपशब्द बोलू नका.
घरातील काने कोपरे स्वच्छ असावेत,
वास्तू पुरुष कडेकडेने फिरतो,
कचरा काढल्यावर खोलीच्या मध्यभागी कचरा गोळा करू नको.
वास्तू पुरुष असतो मध्यभागी...
हात फिरे तेथे लक्ष्मी वसे..
असे सुंदर सहज कानावर पडे...
स्वतःचे घर बांधले कि एक सोहळा...
वास्तू शांत...
आणि म सगळ्या सगे सोयरे यांना आमंत्रण
घर असा आनंद बघत असे आणि वास्तू आनंदित होत असे,
असे हसते खेळते घर.. सर्वांना आवडत असे, त्या घरी पुन्हा पुन्हा जावे वाटे...
आणि खरंच आल्या अतिथीचे स्वागत जसे करतो
तसे अतिथीचे चांगले शब्द/ आशीर्वाद मिळतात,
सुखाचे तसेच आहे...
आपण त्याचे जसे स्वागत करतो तसे ते आपल्याकडे राहते...
सुखाचा शोध घेत माणूस बाहेर भटकतो,
पण सुख आपल्यातच आहे.
जसे भगवंताचा शोध घेण्यास माणूस बाहेर भटकतो.
पण अंतरात असलेल्या , प्
रत्येक व्यक्तीत,
असलेल्या भगवंताला ओळखत नाही.
अस्तु, अस्तु, तथास्तु
असे पण म्हणतो वास्तू पुरुष असे मी ऐकले आहे.
वास्तुपुरुष..
जसा आपल्या राहत्या घरात असतो तसेच
आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराचा वास्तू पुरुष असतो...
परिसरात जेवढे सण उत्सव समारंभ होतात तेवढा तो परिसर
आनंदी समाधानी असतो..
------------------------------
एक रिप्लाय..
हो
अगदी खर आहे.
म्हणून असे म्हणतात ही आनंदी वास्तु आहे.
असे म्हटल्याने
नकारत्मकता कमी होऊन सकारत्मकता वाढते.
कालांतराने वास्तुमधे बर्याचप्रमाणात +ve energy तयार होते.
मी: मला वाटते घरात प्रवेश करताना...
__,____,
/____,_/ \ .;';';.
l__[]__l_ l ,,
आपले घर ही आनंदी वास्तू आहे असे म्हणून घरात यावे.
मैत्रीण म्हणते, ते आहेच पण घरात असतांना तसेच इतर कुठल्याही वास्तूत असताना म्हटले तरी चालते.फायदा नक्की होतो.
∞∞∞∞∞∞∞∞
खरतर हा मेसेज आला आणि वर लिहिले वास्तू , वास्तू पुरुष हे सुचले...
खाली मेसेज देते...
कुणी लिहिलय ते सुंदर लिहिलय..
------------------------------
ताम्हण, पंचपात्र, निरांजन घासून लख्ख केलं तिने.....
लहानशी रांगोळी काढली देवघरापुढे.....
साजूक तुपात भिजवलेली फुलवात निरांजनात ठेवताना थोडं अजून तुप घातलं..
नव्या सुगंधाची धुपकाडी लावली.....
चाफ्याची फुलं दिली शेजारच्या छोकरीने आणून ती पण ठेवली देवासमोर. ....
आणि मनोभावे हात जोडले.....
*श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे*
*हे नाथ नारायण वासूदेव*
पद्यम् दामोदर विश्वनाथ
भगवान विष्णू नमोस्तुते....
पुटपुटत राहिली. .....
कुणी तरी विचारलं आज काय विशेष. ....????
ती हसली...
अन् म्हणाली
आईने शिकवलंय सुख दारात आलं ना की त्याचं भरभरून स्वागत
करावं....
त्याला आंजारून गोंजारून सजवावं...
.काजळतीट लावून आनंदाच्या झुल्यात झुलवावं सुखाला.....
""सुखालाही
तुमच्याकडे आल्याचं समाधान व्हायला हवं....नि ते त्याला मिळालं , रमलं
घरात सुख की मग मुरतं ते अणूरेणूत कणाकणात वास्तुच्या.....
सुख काय दुःख काय शेवटी पाहुणेच जितकं जसं आदरातिथ्य कराल तितकं रमतील परतून येतील ते....""
ती पुन्हा गुणगुणायला लागली आणि
वास्तु म्हणाली _तथास्तु. ...._
आहे ना सुंदर
------------------------------
तसाच हा अजून एक सुंदर मेसेज..
कोणी लिहिलय माहित नाही
"झुकल्या पापण्या"
नव्या घराचा पाया भरतांना,
तो दिसला मला माझ्याकडे येतांना..!
येताच म्हणाला,
"मी वास्तुशास्त्र जाणतो..!"
"कुठे बेड, कुठे हाॅल,
कुठे किचन असावं सांगतो..!"
"शास्त्र माझे सर्व काही सांगते,
मी सांगेन तिथेच सुख नांदते..!"
ऐकून त्याचा सारा कित्ता
मी म्हणालो,
"दोस्ता थोडं थांब
अन्...
मला तिथल्या सुखाचं गुपीत सांग..!"
"जिथं दहा बाय दहाच्या खोलीत
मोठा समूह रहातो..!"
"जिथं या कुशीवर वळलं की
बेड होतो..!"
"त्या कुशीवर वळलं की
हाॅल होतो..!"
"पोटात आग पडली की
तेच होतं किचन..!"
"कुठल्याच सुखसोई
नसल्या तरीही
मजेत फुलतो देह,
ना कुणा रक्तदाब
ना कुणा मधुमेह..!"
"काही सूचत नसेल
तर तसं सांग..!"
"न बोलताच
का चाललास लांब..?"
"दोस्ता...
कदाचित इलाजाला पैसा नसेल,
‘विरंगुळ्याचे रोग’ लागत नसतील..!"
"त्यांचं दुःखच देतं त्यांना
जगण्याचं बळ..!"
"त्याचं दुःखच घालतं त्यांना
जगण्याची गळ..!!"
"नीट उत्तर दे..!"
प्रश्न आणखी विचारतो सोपा,
"कुठल्या शास्त्राला विचारून
सुगरण विणते रे खोपा..?"
"दोस्ता…
सुख नांदण्यासाठी
"या खोलीचं तोंड
त्या दिशेला नसावं..?"
अन्
"त्या खोलीचं तोंड
या दिशेला नसावं..?"
या तकलादू शास्त्रापेक्षा रे,
"माणसाचं तोंड
माणसाकडं असावं..!"
अन्
"माणसाचं मन
माणसाला दिसावं रे..!!!"
☆☆☆☆☆☆☆☆☆
असाच एक आवडता मेसेज...
एकदा दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढली होती.
मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं.
ते झाड वाऱ्यानं गदागदा हालू लागलं.
पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, "पडशील"
तर दुसऱ्या मुलाची आई म्हणाली, "सांभाळ, घट्ट पकडून ठेव"
खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं.
परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र विरोधाभास होता.
परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा फांदीवरुन घसरून खाली पडला.
मात्र दुसऱ्या
स्त्रीच्या मुलानं फांदी घट्ट धरून ठेवली
आणि तो अलगद उतरून खाली आला.
काय बरं असेल यामागचं कारण ?
पहिल्या स्त्रीच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती.
जी तिच्या मुलानं ग्रहण केली आणि तो पडला.
या उलट दुसऱ्या स्त्रीनं उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता
असल्याने
तिच्या मुलानं ती ग्रहण केली आणि तो फांदीवर आपले पाय घट्ट रोवून
बसला.
"वास्तु करी तथास्तु" वास्तुशास्त्र देखील हेच सांगतय की आपल्या वास्तुत नेहमी सकारात्मक भाषा वापरा,
सकारात्मक कल्पनाचित्रे निर्माण करा,
मग वास्तुच तुम्हाला तथास्तु म्हणुन सकारात्मक बदल देईल ;
म्हणूनच आपल्या प्रार्थनेवर आणि आदेशांवर नेहमी पूर्ण विश्वास असायला हवा.
योग्य आदेश देण्याची कला आत्मसात करा.
आहे ना विचार करायला लावणारा छान मेसेज
Think Positive,
Be Positive.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
No comments:
Post a Comment