Sunday, 17 December 2017

कचरा गोळा करणारे...

१७ डिसेंबर..



एक मेसेज...
कोणीतरी कित्ती छान म्हटलंय..

घाण तर बघणाऱ्याच्या नजरेत असते, 

नाहीतर कचरा वेचणाऱ्याला तर,

 त्यातही त्याच्या पोटासाठी अन्न दिसतं

असाच अनुभव आम्हाला
वॉकला जातो त्यावेळी येतो,
पैसे मिळतील या विचाराने कचरा  गोळा करणाऱ्याच्या  नजरेत
 आता काय गोळा करू कि ज्याचे पैसे मिळतील, 
आजचे पोट भरेल???

 कचरा, म्हणजे कागद, बाटल्या, प्लास्टिक गोळा करणारे लोक दिसतात..


यांचा पेहराव...
 देहबोली अशी असते कि... 
यांच्यावर कुत्रे भुंकत असतात.
हातावर पोट असणारे, कुठे राहतात , 
कोठून येतात??? असे अनेक प्रश्न पडतात..
पण आपले मदतनीस असतात, 
आपला परिसर स्वच्छ करतात, 
त्यातून त्यांना पैसे मिळतात.

बाहेर गावी प्रवास करतो तेव्हा शेवटचे स्टेशन जवळ आले कि 
अशीच रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करणारे दिसतात...
आपल्या मनात प्रश्न असतो पुढे काय करतात अशा बाटल्यांचे???
म कुणी त्या बाटल्या पुन्हा वापरल्या जाऊ नयेत म्हणून पिरगळतात, 
कुणी बूच वेगळीकडे टाकतात...
असाच प्रकार दुधाची पिशवी..
 कुणी ती बंद बाजूने कापतात
जेणेकरून ती पुन्हा वापरली जाऊ नये...

आपल्या घरचा कचरा गोळा करणारे.. आता आपण सुका व ओला कचरा वेगळा करतो, पण पूर्वी हे लोक एका मोकळ्या जागी कचरा वेगळा करत, त्यात सुद्धा ज्यातून पैसे मिळतील असा कचरा आधी वेगळा करत... सकाळचे असे चारपाच तासाचे पगारी काम संपले कि पैसे मिळवून देणारा कचरा भंगारवाल्याला विकायचा आणि रोकड घेऊन जायचे.. ज्या घरातून असा विकण्यासारखा कचरा मिळे तेथे त्यांची कटकट नसे,
हे काम खरंच कष्टाचे, घाणेरडे, आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक, कोणते काम करता?? असे विचारले तर.... काय सांगणार असे आहे
माणुसकीच्या दृष्टीने बघावे या स्वच्छतेच्या मदतनीसांकडे...

काही लोक मात्र यांना आंब्याच्या दिवसात आंबे देतात, घरी शुभ कार्य असेल तर गोडधोड मिठाई देतात काही कचरा जास्त आहे म्हणून वेगळे पैसे देतात. काही वापरते, चांगल्या स्थितीतील कपडे देतात.

असेच आपले मदतनीस.. काही पक्षी आहेत....

कावळा.. मेलेले उंदीर, लोकांनी खाकरलेला खाकरा,( बेडका शेमबुड) 
असे खातो.
चिमण्या.. दाणे टिपले, किडे कीटक खाते. 
घरातील पाल असेच किडे कीटक खाते
गिधाडे... 

जंगलात सुद्धा वाघ स्वतःची शिकार स्वतः करतो आणि खातो पण पोट भरले कि ती तेथेच सोडून जातो आणि मग इतर प्राणी गरजे प्रमाणे ती खातात आणि परिसर स्वच्छ होतो,
असे आहे कालचक्र...

एक कचरा गोळा करणारा बघितला आणि असंख्य विचार मनात आले....
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आजच्या use and throw च्या जमान्यात कचरा हि एक गंभीर समस्या झाली आहे,
प्लास्टिक, E- कचरा....

अरे बापरे...

 काय होणार आपली धरणीमातेचे, सजीव सृष्टीचे???


विनाश तर नाही ना....


:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

No comments:

Post a Comment