१५ डिसेंबर 2017
आज आम्ही कामासाठी एका ऑफिस मध्ये गेलो होतो... भर दुपारची वेळ काम झाल्यावर
टॅक्सीसाठी उभे होतो...
एखादी
रिकामी टॅक्सी दिसली कि ... हात दाखवत नानाचौक भाटिया... असे विचारत
होतो.. काही टॅक्सीवाले दुर्लक्ष करत होते तर काही मानेने नाही म्हणत होते.
इतक्यात
आमच्या घराकडे जाणारी बस येताना दिसली सिग्नल सुद्धा लाल होता, खुशीत...
आता चढूया असे म्हणत बसच्या पुढील दरवाज्यापर्यंत पोहोचलो आणि हिरवा
सिग्नल झाला बस ड्रायव्हरने अगदी वेगात बस समोरून नेली. ( आमची पण चूक आहे,
आम्ही सिग्नल असताना चढण्याचा विचार करायला नको होता ) आणि बेस्ट कर्तव्य
दाखवत निघून गेला, म आता चालत जाऊया असे म्हणत आम्ही चालायला सुरुवात केली,
उन्हाची वेळ आणि एक वेडी आशा... मागे वळून बघत टॅक्सी मिळेल का असे बघत एक
पाचशे पावले चालत गेलो..
अचानक एक रिकामी टॅक्सी
दिसली.. म्हणून हात केला, टॅक्सी थोडी कडेला येत थांबली. वाह..!! नशीबच
काढले असे म्हणत मागचा दरवाजा उघडला तर...
आत एक आधुनिक पेहराव केलेली तरुणी बसली होती.
मी : आपको उतरना है??
तरुणी : नही, लेकिन आप बैठिये,
मी : ???
ड्रायव्हर: आप ये बाजू आके बैठो,
मी : लेकिन में अकेले नही हूं... मेरे साथ ये भी है...
ड्रायव्हर : ये आगे बैठेंगे...
टॉक्सिची गरज होतीच
काही विचार न करता आम्ही बसलो.. टॅक्सी सुरु झाली.
तरुणी : आप कब के खडे थे, और आपको भाटिया, नाना चौक जाना था ये मैंने सून लिया था,
में भी भाटिया जा रही हूं.
तो ड्राईव्हर को टॅक्सी रोकने के लिये कहा...
मी : देव देव म्हणतो आपण.!
या आधुनिक तरुणी मध्ये आम्हाला साक्षात देवाचे दर्शन झाले.
भाटिया
हॉस्पिटल जवळ ती उतरली, उतरताना तिने टॅक्सीचे पैसे दिले,
आम्ही तिला
सांगत होतो आम्ही पुढील स्टॉप वर उतरू तेव्हा पैसे देतो,
तू आम्हाला टॅक्सी
मध्ये घेतले हेच खूप आहे.
पण तिने पैसे दिलेच...
आम्ही पुढील स्टॉप वर टॅक्सी थांबवली...
पैसे एवढेच होते फक्त 22₹
ते पण खरतरं त्या तरुणीने दिले होते.
पण टॅक्सीवाला....
त्याने आमच्याकडून सुद्धा 22 रुपये घेतले आणि ...
आपल्यातील अव्यवहाराचे, अमाणुसकीचे प्रदर्शन केले...
एकाच वेळी आधुनिक तरुणीच्या माणुसकीचे दर्शन आणि लगेच अमाणुसकीचे दर्शन घडले...
असो काही का असेना,
माणुसकी आहे, विश्वास आहे
ज्यावर जग चालते हे दिसून आले, अनुभवले.!
हा माझा अनुभव लिहिला आणि
माझी भाची मीता बरोबर छान संवाद झाला.
♤♤♤♤♤♤♤♤♤♤
मीता.. मस्त एकदम. मस्त लिहिलं आहेस..
मी : तुम्ही आमची मुलं
असे किंवा याहूनही छान वागालच.!!
पण हि इतर भाषिक....
मीता : हो ना
जगात अजून चांगली माणसे आहेत हे नक्की.!!
मी : अगं अशा चांगल्या वागण्यामुळे जग चालते...
मीता : नक्कीच.!
मी : तरी त्या ड्रायव्हर्स नी (बस व टॅक्सी) कलियुग सुरु आहे हे दाखवून दिले.
मीता : हाऽऽहाऽऽहाऽ ऽ हाऽ ऽ खरंय....
पण त्याचे डबल पैसे जातील...
मी: ते तर असतच
श्रमाचा पैसा आणि खोटा कमावलेला पैसा...
( आपले कष्टाचे पैसे... त्याला चांगले काम करण्याची बुद्धी देतील)
आपण
सुद्धा वाटेत पैसे दिसले तर
लक्ष्मी म्हणून अपमान न करता उचलतो
ते
भिकाऱ्याला,
किंवा देवळात किंवा
मी तर उचलून पाय लागणार नाही अशा ठिकाणी
ठेवते.
मीता : पण सगळेच असा विचार करत नाहीत. आणि असा विचार करणारे जगात खूप कमी आहेत.
मी : हो
पण आपले असे विचार
बघतात ऐकतात
आवडतात आणि वागण्याचा प्रयत्न करतात..
मी : मागे एक आलेला विचार जो मला आवडतो तो पाठवते.
*******************
"मदतीसाठी देव जवळच्या व्यक्तीला पाठवतो !!!
अनेकदा आपण केलेल्या छोट्याशा मदतीमुळे कुणाचे तरी आयुष्य बदलून जाते.
आपल्याला हे समजत नाही,
आपण ज्याला मदत करतो तो आयुष्यभर कृतज्ञ राहतो.
खरं
तर देव लोकांना मदत करण्यासाठी
आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवत असतो.
माहीत नाही.
देव आपल्यावर केव्हा आणि कोणती जबाबदारी सोपवेल."
*******************
मी : है ना....
देव नात्यात बांधायला विसरतो अशा व्यक्ती
आपल्या आयुष्यात अशा अचानक काही क्षणासाठी येतात
आणि आपल्याला काही शिकवून जातात...
मीता : हो ते तर आहेच...
असा सुंदर संवाद झाला आमच्यात.!
♤♤♤♤♤♤♤♤♤♤
आणि काही मैत्रिणीनी आपले मत व्यक्त केले.
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
१.) मैत्रीण .. अनूभवा सारखा गुरू नाही.
मी : करावे देशाटन, प्रवास.. अनुभवाचे गाठोडे मोठे होते.
२.) मैत्रीण :
No words to express
मी : हो ग.
काही वेळेला आपण पण असे वागतो.
कोणी हि आसपास असेल तर विचारतो कुठे जात आहात?
आपल्या बाजूला असेल तर या म्हणतो.
पण हि आधुनिक तरुणी...
आणि तिने केलेले सहकार्य वाखाणण्या जोगे
मैत्रीण : होय होय
माणुसकी, चांगुलपणा
Helping nature
अजून काही प्रमाणात जिवंत आहे.
मैत्रीण : हो.
आम्ही पण बस स्टॉपवर
कोणी उभे असेल तर गाडीत घेतो, स्टेशनला जाताना.
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽
३.) मैत्रीण : या वरून कळते देव आपल्या पाठीशी उभा आहे.
मी : हो ग..
खरोखर जर देव समोर उभा राहिला तर..
डोळे दिपतील... काय करावे ते सुचणार नाही.
आपण देवळात जातो आणि
देवाला पाहून आपण प्रथम डोळे मिटतो.
नतमस्तक होतो.
प्रार्थना म्हणतो मग डोळे उघडतो.
हो ना.!
आणि माणसातील देव दिसला कि आनंदित होतो.
~~~~~~~~~~~~
४.) मैत्रीण : २ प्रकारची माणसे एकत्र भेटली.
मी : हो ना...
प्रत्येक व्यक्तिकडून शिकतो.!
कसे वागावे.
कसे वागू नये.
खरंच एकाच वेळी दोन माणसे भेटली.
दोन्ही ड्रायव्हर्स, सुद्धा आपल्या पेशाप्रमाणे वागले...
खरतर आमची पण चूक आहे,
आम्ही सिग्नल ला बस थांबली असताना
ती पकडण्याचा प्रयत्न केला.
कुणी मला म्हणाले
हात दाखवा.
बस थांबवा.
असे ब्रीद आहे.
BEST चे
पण अनुभव वेगळाच येतोय.
~~~~~~~~~~~~
५.) मैत्रीण :
जगात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात
.त्या त्या वेळेनुसार अनुभव येत असतात.
पण
एक सांगू का
आपण जे जपजाप्य, स्तोत्रपठण वगैरे जे करतो
त्यामुळे आपल्या
शरीरात पाॅझिटीव्ह,
(सकारात्मकता) तयार होत असते.
येणारे वाईट अनुभव कमी
असतात व चांगले अनुभव जास्त असतात.
पण हे सुध्दा एखाद्या प्रसंगाचे
गांभिर्य,
परिस्थिती, आणि ठिकाण यावर अवलंबून असते.
मी : वाह, सुंदर लिहिलेस.
****************************** **
No comments:
Post a Comment