Sunday, 31 December 2017

छान सुचलेले ऐकलेले...

संकल्प, विचार,

संपूर्ण डिसेंबर महिना, 

मी आणि सायली...


सायली, आताच एक विचार आला मनात....

आणि तू ऑनलाइन

असं केलं तर...
प्रत्येकाला रोज काही दोन ओळी टाईप करून पाठवा... त्यात चांगला विचार, संकल्प काहीही... टाईप करून पाठवा असे सुचवले तर....
___________________
१डिसेंबर... 
आजचा संकल्प... पाठवा काहीही टाईप करून

फक्त ३१ तारखेपर्यंत
[12/1, 11:42 AM] Rekha Ghanekar:
 रोज करता येईल असे...
*******************
१... करा टाईप आणि पाठवा... काहीही...
विचार, संकल्प
*******************
••••••••••••••••••••••••••
२. फक्त पाच मिनिटे स्वतःसाठी काढून दीर्घ श्वास घ्या...
 
•••••••••••••••••••••••••
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
३.
नकार देता आला पाहिजे
होकार विचार करून दिला पाहिजे
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
"""""""""""""""""""""""""""""""""
 ४.
कोणतेही काम कठीण आहे ते सोपे करावे
सोपे आहे ते सहज करावे
कोणतेही काम आज आत्ता ताबडतोब...
""""""""""""""""""""""""""'""""""""
∞∞∞∞∞∞∞∞∞
 ५. नाण्याला जशा दोन बाजू असतात
 तशाच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात...
आपले मन ठरवते... कोणती बाजू घ्यायची...

होकारार्थी कि नकारार्थी

∞∞∞∞∞∞∞∞∞

मी: दोन बाजू सांगते...

 आज सकाळची गोष्ट...
वॉकला जाताना गोकर्णीची फुले दिसतात... पूर्वी निळी खूप मिळायची,
पांढरे एखादेच मिळे.

आता पांढरी खूपच दिसतात... निळे कुठेतरी एखादे.!

बघ जेव्हा निळी फुले मिळत तेव्हा पांढरे मिळत नाही.. म्हणून हळहळ वाटे....
आता पांढरी मिळतात पण निळी नाहीत म्हणून हळहळ....


तेव्हा प्रत्येक घटनेकडे मी बघू लागले
आणि positive विचार करून सुखी होतो 

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद भरला आहे.

[12/5, 12:13 AM] Rekha Ghanekar:
 बघ ना 
पाऊस अचानक आलाय

मला मातीचा सुगंध आला.

मस्त वाटलं

पण tv लावला तर... 
उद्या वादळ होण्याची शक्यता
शाळांना सुट्टी....

व्हाट्सअप्प ओपन केले तर....

 छान मेसेज

चेहऱ्यावर हसू आणणारे

~~~~~~~~~~~~~

 ६. समविचारी लोक आपोआप जवळ येतात 
त्यांची छान गट्टी जमते

✿✿✿✿✿✿✿✿✿✿


७. आपल्याला जसे दुसऱ्याने आपल्याबरोबर वागावे असे वाटते 
तसे आपण दुसऱ्या बरोबर वागले पाहिजे...

 ☬☬☬☬☬☬☬☬☬


८. समजेल अशातऱ्हेने सत्य सांगत गेले,
 तर कोणालाही त्या विषयी अविश्वास वाटत नाही.

☬☬☬☬☬☬☬☬☬



 ❁❁ ❁❁❁ ❁❁❁ ❁❁


९. कोणाबरोबर बोलताना त्या व्यक्तीला वाटत असणारा 
अप्रिय विषय टाळून बोलले पाहिजे..

❁❁ ❁❁ ❁ ❁❁ ❁❁


 ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ

१०. मिळते जुळते घेण्याची कला आहे 
ती साधली पाहिजे.

ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ ʕʔ

 --☉☉---☉☉---☉☉--


११. प्रत्येकाकडून काहींना काही शिकण्यासारखे असते

कसे वागावे???

कसे वागू नये....

--☉☉---☉☉---☉☉--


.ツ.....ツ.....ツ.... .ツ....


१२. हत्ती होऊन ऊस खाण्यापेक्षा
मुंगी होऊन साखर खावी.
 

.ツ.....ツ.....ツ.... .ツ....


 ♤♤ ♤♤ ♤♤ ♤♤ ♤♤

१३. स्वतःची कामे स्वतः केली कि
 सगळेच आनंदी होतात.

♤♤ ♤♤ ♤♤ ♤♤ ♤♤


 ❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ 


१४. ज्या ऋतूत जी फळे मिळतात ती अवश्य खावीत, 
इतर ऋतूत ती फळे काही प्रक्रिया करून
ती टिकवली जातात तर अपाय होऊ शकतो.

❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀


 ๑๑ ๑๑ ๑๑ ๑๑ ๑๑


१५. गूण अवगुण अमर असतात... लोक मनुष्य गेल्यावर चांगल्या आठवणी काढतात.

๑๑ ๑๑ ๑๑ ๑๑ ๑๑


 ✧✧ ✧✧ ✧✧ ✧✧

१६. कामावे तो सामावे...

✧✧ ✧✧ ✧✧ ✧✧

 ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ 


१७. कोणताही संकल्प करताना 
तो आपले कोणाला तरी सांगून कराव
 म्हणजे तो पूर्णत्वास नेणे सोपे होते.

✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽



 ✿✿✿✿✿✿✿✿✿✿


१८. मुलात मुलं व मोठ्यात मोठे होऊन राहावे.
सर्व वयोगटामध्ये रमता आले पाहिजे, 


✿✿✿✿✿✿✿✿✿✿



 १९.

@¤¤¤¤¤¤¤¤@

(( *  कुणाचा  *  ((
\\ * एखादा शब्द *\\
  \\ * एखादे वाक्य *\\
    \\*पाठीवर मायेचा \\ 
      )) *   हात,       * ))
         आश्वासक नजर
     एखाद्याला प्रोत्साहित
              करते.          

  @¤¤¤¤¤¤¤¤@



ῼ ῼ  ῼ ῼ  ῼ ῼ  ῼ ῼ


२०. सुज्ञांस सांगणे न लगे 
अज्ञास सांगणे न कळे।

ῼ ῼ  ῼ ῼ   ῼ ῼ  ῼ ῼ

------------------------------

 २१. आहे हि परिस्थिती मान्य केली कि
 त्याला तोंड देणे सोपे असते.

------------------------------


 २२. प्रत्येक व्यक्तीकडे कला असतेच..  
अगदी स्वस्थ बसणे.
समोरच्याच बोलणे ऐकून घेणे.
या कालासुद्धा अतिशय महत्वाच्या आहेत.

 ۞ ۞ ↷↷↷↷↷↷↶↶

२३.
समोरच्या व्यक्तीला समजून घ्यायचे असेल तर त्याच्या वयात जाऊन बसावे... म्हणजे ती असे का वागते ते कळेल.

۞ ۞ ↷↷↷↷↷↷↷↶


 :::::::::::::::::::::::::::::::::::

२४. अनपेक्षितपणे यश मिळाले कि
 सुखाची चव वाढते...

::::::::::::::::::::::::::::::::::::


 *******************

२५. चोच देतो तो दाणा सुध्दा देतो... 
आईबाबा उगाच मूलांच्या भविष्याची काळजी करत राहतात...

********************

 卐卐卐卐卐卐卐卐


२६. जेव्हा कोणी सांगते.. हे करू नको तेव्हा करून बघावेसे वाटते, 
आणि तू हे कर, असे सांगितले जाते, तेव्हा 
*मी का करू* ???
म्हणून बंडखोरी निर्माण होते....

卐卐卐卐卐卐卐卐


 
२७. 
काहींना काही स्वहस्ताक्षरात रोज लिहा...
नवे आवडते पेन, नवी वही घेऊन... नेमाने लिहा... आणि घ्या आनंद.!

シ シ シ シ シ シ シ シン ン ン ン


 <><><><><><><><>

२८. आवड असली कि सवड होते..

<><><><><><><><>

 ✺✺✺✺✺✺✺✺✺✺

29. Amount of *MONEY*
thats in your bank at a time of *death* 
is the *extra* work you did
 which was not necessary.

✺✺✺✺✺✺✺✺✺✺


२९. पैसा हा परमेश्वर नाही पण.....
परमेश्वरापेक्षा कमी नाही.

३०.
 
❝ time management ❞
अतिशय महत्वाचे...
वेळेचे नियोजन असेल तर... सर्व छान होते.

 ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ


३१. कोणालाही काही द्यायचे असेल तर 
आपल्या कडील सर्वोत्तम द्यावे...

ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ♤ॐ




आणि एक मैत्रीण

 हिने सलग डिसेंबर महिना आपला विचार पाठवला..

------------------------------

तिचे विचार..

[12/1, 6:35 AM] Sayli Bapat: 
१. Welcome to the last month of 2017
 December....maza awdta month 
२. प्राणायाम करणे गरजेचे आहे
३ आज दत्तजयंती... स्वामी हे दत्त अवतार... स्वामी तुम्ही आहात म्हणून मी आहे...
ह्या वाक्यात सर्वकाही आले... हो ना 

४. आठवड्याची सुरुवात कितीही कंटाळवाणी असली तरी आनंदाने करावी कारण स्वामीकृपेने आपल्या आयुष्यात तो सुंदर दिवस आलेला असतो 
५. माझा संकल्प... जमेल तेवढे मराठीत लिहिणे...

६. निसर्गापुढे माणूस काही करू शकत नाही
 ७. माणसाने स्पष्टवक्ता असावे... त्यामुळे खूप त्रास कमी होतात...
८. हे ही दिवस जातील... हे वाक्य माणसाने सुखापेक्षा दुखात जास्त लक्षात ठेवावे... मार्ग सोपा होइल 
 ९. मेहनतीला पर्याय नाही...
१०. मन प्रसन्न तर सारे काही प्रसन्न 
 ठरवल्याप्रमाणे १० दिवस तरी २ ओळी लिहून पाठवत आहोत

११. लोकांच्या सुखाचा क्षणी एकवेळ नसलात तरी चालेल पण दुखाच्या क्षणी मात्र जरूर उभे रहा 

१२. मन नेहमी तरुण असले पाहिजे 

१३. माणसाने पाण्यासारखे असावे... जिथे जाईल तिथे मिसळून जावे...तेही आपला मार्ग काढत 

१४. दुसऱ्याकडे १ बोट दाखवतात बाकी ४ बोटे आपल्याकडे असतात हे नेहेमी लक्षात ठेवावे.

१५. अन्न हे पुर्णब्रम्ह आहे तेव्हा वाया घालवू नका.

१६. वाचाल तर वाचाल... हे मला आता पटायला लागले आहे...

१७. अपेक्षाभंगाचे दुख करून त्रास करून घेण्यापेक्षा अपेक्षा करु नका... अधिक सुखी रहाल.

१८. निस्वार्थी प्रेम करणारे फक्त आई बाबा असतात... 

१९. माणसाने त्याचा हुशारीचा योग्य वेळी योग्य ठिकाणी वापर करावा.

२०. हरलात म्हणून रडू नका आणि जिंकलात म्हणून माजू नका.

२१. दिवसभराचा ताण घालवायचा असल्यास ५ ते १० मिनिटे लहान मुलांसोबत घालवा... ताजेतवाने व्हाल...

२२. नको त्या गोष्टींवर वेळ घालवण्यापेक्षा स्वामी नामस्मरण करावे...मनशांती मिळेल एवढे नक्कीच 

२३. एखाद्याचा दुुःखाची तीव्रता त्याचा जागी जाऊन विचार केल्याशिवाय कधीही कळू शकत नाही.

२४. माणूस आयुष्यभर शिकतच असतो कारण आयुष्य प्रत्येक वळणावर काही तरी शिकवतच असते... 

२५. आई ही सर्वात जवळची मैत्रीण...

२६. स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासून करण्या आधी आपल्या मनापासून केली पाहिजे... 

२७. माणसाने एखादा तरी छंद जोपासावा... जसे गायन वादन खेळ..

२८. गैरसमज आणि प्रॉब्लेम बोलून कमी होतात... न बोलून ते जास्त वाढतात.

२९. लोक काय म्हणतील ह्या विचारने अनेक गोष्टी मनाविरुद्ध केल्या जातात... पण हेच ते लोक जे काही करा फक्त नावच ठेवतात... त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे वागा जास्त आनंदी राहाल... 

 ३०. बाबांसारखा खरा मित्र सगळ्यांना कळतोच अस नाही... बाबा नेहेमीच माझे special Friend आहेत 

[12/31, 7:35 AM] Sayli Bapat: 
३१. एखादी व्यक्ती तुम्हाला जर दुसऱ्या बद्दल सांगत असेल तर समजून जा की ही व्यक्ती तुमचाबद्दलही दुसऱ्याला सांगत असणारच...


~~~~~~~~~~~~

तिने पाठवलेले विचार म काही जणांना पाठवले

त्यांनी सायलीचे कौतुक केले... 

बघुया

*******************
Are wa mast
*******************
सुंदर मस्त
*******************
तुझ आणि सायली बापटच कौतुक कराव तेव्हढ थोडे. 
आवड असली की सवड होते हे खरच 
.म्हणून कौतुक करायला सवड काढली.
 पण  अजूनही वेळ कसा  काढू
 या वर विचार करतच वेळ जातो........

******************
Wa wa wa mastch
*******************
 सायलीचे कौतुक. नित्य नवे पाठवणे सोपे नाही. मनात असले तरी , माहित असले तरी कंटाळा येतो. सायली असेच विचार करीत जा. आयुष्य सोपे जाईल.
*******************
सायलीचे कौतुक. तिला सांगणे असेच लिहीत रहा.
*******************
 सायली खरच ग्रेट आहेस तू. 
*******************
तिने जो नेम केला तो पाळला, ह्याचे कौतुक वाटते सातत्य असणे हे महत्वाचे , ते साधणे हे फार कठीण आहे ते तिने पार पाडले hats off 
******************
छान
*******************
 मस्त  विचार आहेत
*******************
 सायली ने खूप  छान  लिहिलं  आहे.
*******************
 Masta
*******************
Are wah mast vichar mandlet sayali ne
*******************
 Mast
 Chhan

*******************
छान आहेत
 एखादी व्यक्ती चांगली असो वा वाईट असो (आपण ठरवल्या प्रमाणे) त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी घ्याव्यात / आचरणात आणाव्यात.
 हि शिकवण मला बाबांकडून मिळाली लहानपणी
*******************
सुंदर वचने
*******************

Saturday, 23 December 2017

*फोटोग्राफीची कमाल असते....*

फोटो .....


 फोटो छान आले, कि पहिला प्रश्न..
कोणी काढले ???
आणि जर फोटोग्राफरने काढले तर थोडे वेगळे वाटतात.
नामवंत फोटोग्राफर ने काढले असतील तर...
ते वेगळे दिसतात..

*******************
खरतर आपण असतो तसेच दिसतो... तरी...

*फोटोग्राफीची कमाल असते....*

खास फोटोग्राफीने व्यक्ती वेगळी भासते.

☆ फोटोशॉप करून, 

☆ स्पेशल इफेक्ट देऊन, ☆ एडिट करून वेगळे दिसतात फोटो.!

::::::::::::::::::::::::::::::::::::
आम्ही दोघे
आणि मुलगी आणि जावई
आणि आम्ही चौघे
असे तीन फोटो काढले...
आम्ही ते घेतले.
लगेच मिळाले फोटो
इन्स्टंट
म्हणजे निघेपर्यंत आणून दिले...
सगळ्यांनाच.!


(दुबई येथे क्रूझ डिनर च्या वेळी काढले होते फोटो)
::::::::::::::::::::::::::::::::::::
फोटो काढलेत कि नाही?
किंवा... मला पाठवा हं फोटो...
किंवा फोटो म्हणजे चांगल्या आठवणी असतात.
Sweet memories. 
पुन्हा त्या क्षणात रमायला होते..
फोटो मुळे गत क्षण उजळतात.

पण कोणी अस लागतं सांगणारं, विचारणारं

नाहीतर आपले फोटो नाहीत, 
दुसऱ्यांचेच फोटो आपण सांभाळतो.
कोणी विचारत कि काढला का फोटो ....
 म्हणून आपण फोटो काढतो..
*******************

लोक आपले पटापट उभे राहून फोटो काढून घेतात.

*******************
 फोटो असले की आठवणी ताज्या होतात.

मनाच्या पडद्यावर तर कायमच्या कोरलेल्या असतात.
~~~~~~~~~~~~
फोटो... काही वर्षांपूर्वी आम्ही सिमल्याला गेलो होतो, तिकडे एका जादूगाराने जादूचे सुंदर प्रयोग केले होते, कार्यक्रमानंतर आम्ही त्याचा फोटो काढला.
तो इतका खुश झाला
(Kodak कॅमेरा मधून फोटो काढत होतो त्यावेळी)
○○○○○○○○○○○○○○
हल्ली हल्लीच दुबई येथे गेले होते, तेथे लिमोझिन राईड घेतली होती...
त्याचे वाहनचालक यांना त्यांच्या गाडीसह फोटो काढूया 
म्हटल्यावर ते आश्चर्याने मी??? असे विचारते झाले...
आणि चटकन फोटो साठी उभे राहिले.

................................

असे अनेक वेळा अनुभव घेतो.. आता तर फोटो काढणे सहज शक्य आहे . 
प्रत्येकाच्या हाती मोबाईल असतो, कुठलाही फोटो चटकन काढता येतो.
फोटो शॉप, एडिट करून एक वेगळाच फोटो आपल्यासमोर येतो....
{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

फोटो हि एक सुंदर कला आहे. 
काहीजण प्रत्येक फोटोत दिसतात प
ण स्वतः मात्र कुणाचा फोटो काढत नाहीत...
कुणी आवडीने फोटो काढत असेल तर...
बघत होते/होतो कधी म्हणताय या तुमचा फोटो काढतो... 
पण अशा व्यक्ती आपला फोटो मात्र काढत नाहीत..
{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{

सेल्फी...

 आता प्रत्येक जण सेल्फी काढतो... 
नवशिके असतात त्यांनी सेल्फी काढलाय हे लगेच कळते...
सेल्फी काढण्यासाठी मदत होते ती सेल्फी स्टिकची... 
यामुळे सेल्फी काढणे सोपे होते...
 (  काहींनी आपले प्राण गमावले आहेत या सेल्फी काढण्याच्या वेडामुळे 

नं 1 फोटो..

फोटोग्राफी स्पर्धा होतात...
यात खास वेगळे फोटो बघायला मिळतात.

वर्तमानपत्रात सुद्धा आठवणीतला फोटो पाठवा... असे सदर असते.

एका सदरचे नाव फोटो टॉक्स...

एखादा फोटो आणि त्यामागे काय विचार असेल अशी कल्पना असते...

आता हाच फोटो बघा ना....

 एक डाल से टूटी पत्ती देखो कैसे मुस्कुरा रही है ।
और एक हम इंसान है जो
जरा सी समस्या से ही मुस्कराना भूल जाते हैं।

खाली फोटो
या फोटोमागील विचार 
हा आहे...

कधी बहर कधी शिशिर

आयुष्य कस जगावं ??? याचा अर्थ सांगणारा हा फोटो आहे. निसर्गात चढ उतार असतात, वेगवेगळे ऋतू असतात, तसच आपल्या आयुष्यातही घडत असतं, कोणत्याही परिस्थितीत आपण स्थिरचित्त राहील पाहिजे. 
हसत हसत आपण यावर मात केली पाहिजे. अस या पानांचं सांगणं आहे. 
    झाडावरून बहुतेक
पानगळीमुळे हे पान गळून पडलं, पडताना त्याचा आवाज झाला नाही. 





पण... पानातून निर्माण झालेली हि 
स्मितहास्याची लकेर मात्र आयुष्य भराचा संदेश देणारी आहे. 
आयुष्यात सगळ्या प्रकारच्या अडीअडचणी ऋतुमानासारख्या येतच राहणार. त्यासाठी आपण सिद्ध असलंच पाहिजे.
*हसू कमी होऊ न देता, पुढचा मार्ग शोधणं हेच खरं आयुष्य*
आपण बाहेरच्या गोष्टी बदलू शकत नाही, पण...
अंतर्मनातील बदल शक्य असतात आणि ते केलेही पाहिजेत.
संकलन....
आपल्या पूर्वजांचे फोटो..
त्याकाळी सर्रास फोटो काढले जात नसत.
जे फोटो काढले जात त्यात विशेष असे नसे
ठरलेल्या पद्धतीने फोटो काढले जात.
जसे खुर्चीवर कोणी बसले तर दुसरे उभे राहत आणि बाजूला टेबल आणी त्यावर 
फ्लॉवर पॉट...

पूर्वी काही जणांना फोटोला उभे राहताना हात कसे कुठे ठेवावेत असा प्रश्न पडत असे..
००००००००००००००००

Kodak कंपनीने स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो काढला होता
म्हणून महाराज कसे होते, त्यांचे भक्त कोण हे त्या फोटोमुळे समजते.
०००००००००००००००

आता फोटो काढताना.. 

स्माईल असे म्हणण्याच्या ऐवजी "से चीझ" असे म्हणतात.


विशिष्ट कागद पत्रांसाठी फोटो मागे विशिष्ट रंग लागतो.

आता एक मिनिटात फोटो उपलब्ध होतात.

काही कमी रुपयात खूप फोटो आणि वेगवेगळ्या साईझ मध्ये उपलब्ध
होतात...

फोटोच्या सिडी असतात तरी पटकन बघण्यासाठी काहींना अलबम हवा असतो... 


पूर्वी फोटो कॉर्नर लावून फोटो अलबम मध्ये चिकटवत.
आता अलबम मध्ये प्लास्टिक कव्हर असते..
आता आधुनिक अलबम उपलब्ध आहेत...

या कलेबद्दल लिहू तेवढे थोडे आहे.


~×~×~×~×~×~×~×~×~×~×~
 फोटोग्राफर च्या एका क्लिक मुळे एखाद्याचे आयुष्य बदलून जाते. 
असे कुणी म्हटले आहे.

Tuesday, 19 December 2017

वास्तू, वास्तुपुरुष



रात आपण नेहमी ऐकतो कि 

वास्तू पुरुष तथास्तु, तथास्तु म्हणत असतो.

 
घरात शुभ बोला रे, अपशब्द बोलू नका.

घरातील काने कोपरे स्वच्छ असावेत, 
वास्तू पुरुष कडेकडेने फिरतो,
कचरा काढल्यावर खोलीच्या मध्यभागी कचरा गोळा करू नको.
 वास्तू पुरुष असतो मध्यभागी...

हात फिरे तेथे लक्ष्मी वसे..
असे सुंदर सहज कानावर पडे... 

स्वतःचे घर बांधले कि एक सोहळा... 

वास्तू शांत...

आणि म सगळ्या सगे सोयरे यांना आमंत्रण
घर असा आनंद बघत असे आणि वास्तू आनंदित होत असे,
 असे हसते खेळते घर.. सर्वांना आवडत असे, त्या घरी पुन्हा पुन्हा जावे वाटे...

आणि खरंच आल्या अतिथीचे स्वागत जसे करतो 
तसे अतिथीचे चांगले शब्द/ आशीर्वाद मिळतात, 

सुखाचे तसेच आहे... 
आपण त्याचे जसे स्वागत करतो तसे ते आपल्याकडे राहते...
सुखाचा शोध घेत माणूस बाहेर भटकतो, 
पण सुख आपल्यातच आहे.
जसे भगवंताचा शोध घेण्यास माणूस बाहेर भटकतो.
पण अंतरात असलेल्या , प्
रत्येक व्यक्तीत, 
असलेल्या भगवंताला ओळखत नाही.

 अस्तु, अस्तु, तथास्तु 

असे पण म्हणतो वास्तू पुरुष असे मी ऐकले आहे.

वास्तुपुरुष.. जसा आपल्या राहत्या घरात असतो तसेच 

आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराचा वास्तू पुरुष असतो... 

परिसरात जेवढे सण उत्सव समारंभ होतात तेवढा तो परिसर आनंदी समाधानी असतो..
------------------------------
एक रिप्लाय..
 हो अगदी खर आहे.
 म्हणून असे म्हणतात ही आनंदी वास्तु आहे.
असे म्हटल्याने नकारत्मकता कमी होऊन सकारत्मकता वाढते. 

कालांतराने वास्तुमधे बर्‍याचप्रमाणात +ve energy तयार होते.

मी: मला वाटते घरात प्रवेश करताना...

__,____,
/____,_/ \  .;';';.
 l__[]__l_ l   ,,

 आपले घर ही आनंदी वास्तू आहे असे म्हणून घरात यावे.

 मैत्रीण म्हणते, ते आहेच पण घरात असतांना तसेच इतर कुठल्याही वास्तूत असताना म्हटले तरी चालते.फायदा नक्की होतो.

∞∞∞∞∞∞∞∞

खरतर हा मेसेज आला आणि वर लिहिले वास्तू , वास्तू पुरुष हे सुचले...
खाली मेसेज देते...
कुणी लिहिलय ते सुंदर लिहिलय..
------------------------------

ताम्हण, पंचपात्र, निरांजन घासून लख्ख केलं तिने.....

लहानशी रांगोळी काढली देवघरापुढे.....
साजूक तुपात भिजवलेली फुलवात निरांजनात ठेवताना थोडं अजून तुप घातलं..

नव्या सुगंधाची धुपकाडी लावली..... 
चाफ्याची फुलं दिली शेजारच्या छोकरीने आणून ती पण ठेवली देवासमोर. ....
आणि मनोभावे हात जोडले.....
*श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे*
*हे नाथ नारायण वासूदेव*
पद्यम् दामोदर विश्वनाथ 
भगवान विष्णू नमोस्तुते....
पुटपुटत राहिली. .....
कुणी तरी विचारलं आज काय विशेष. ....????
ती हसली... 
अन् म्हणाली
आईने शिकवलंय सुख दारात आलं ना की त्याचं भरभरून स्वागत
करावं....
त्याला आंजारून गोंजारून सजवावं...
.काजळतीट लावून आनंदाच्या झुल्यात झुलवावं सुखाला.....

""सुखालाही तुमच्याकडे आल्याचं समाधान व्हायला हवं....नि ते त्याला मिळालं , रमलं घरात सुख की मग मुरतं ते अणूरेणूत कणाकणात वास्तुच्या.....
सुख काय दुःख काय शेवटी पाहुणेच जितकं जसं आदरातिथ्य कराल तितकं रमतील परतून येतील ते....""
ती पुन्हा गुणगुणायला लागली आणि 
वास्तु म्हणाली _तथास्तु. ...._
आहे ना सुंदर
------------------------------
तसाच हा अजून एक सुंदर मेसेज..
कोणी लिहिलय माहित नाही

 "झुकल्या पापण्या"


नव्या घराचा पाया भरतांना,
तो दिसला मला माझ्याकडे येतांना..!

येताच म्हणाला,
"मी वास्तुशास्त्र जाणतो..!"
"कुठे बेड, कुठे हाॅल,
कुठे किचन असावं सांगतो..!"

"शास्त्र माझे सर्व काही सांगते,
मी सांगेन तिथेच सुख नांदते..!"

ऐकून त्याचा सारा कित्ता
मी म्हणालो,

"दोस्ता थोडं थांब
अन्...
मला तिथल्या सुखाचं गुपीत सांग..!"
"जिथं दहा बाय दहाच्या खोलीत
मोठा समूह रहातो..!"

"जिथं या कुशीवर वळलं की
 बेड होतो..!"
"त्या कुशीवर वळलं की
हाॅल होतो..!"
"पोटात आग पडली की
 तेच होतं किचन..!"

"कुठल्याच सुखसोई
नसल्या तरीही
मजेत फुलतो  देह,
ना कुणा रक्तदाब
ना कुणा मधुमेह..!"

"काही सूचत नसेल
तर तसं सांग..!"
"न बोलताच
का चाललास लांब..?"

"दोस्ता...
कदाचित इलाजाला पैसा नसेल,
‘विरंगुळ्याचे रोग’ लागत नसतील..!"

"त्यांचं दुःखच देतं त्यांना
जगण्याचं बळ..!"
"त्याचं दुःखच घालतं त्यांना
 जगण्याची गळ..!!"

"नीट उत्तर दे..!"

प्रश्न आणखी विचारतो सोपा,

"कुठल्या शास्त्राला विचारून
सुगरण विणते रे खोपा..?"

"दोस्ता… 
सुख नांदण्यासाठी
"या खोलीचं तोंड 
त्या दिशेला नसावं..?"
अन्
"त्या खोलीचं तोंड 
या दिशेला नसावं..?"

या तकलादू शास्त्रापेक्षा रे,

"माणसाचं तोंड
माणसाकडं असावं..!"
अन्
"माणसाचं मन
माणसाला दिसावं रे..!!!"
☆☆☆☆☆☆☆☆☆
असाच एक आवडता मेसेज...
 एकदा दोन मैत्रिणींची मुलं झाडावर चढली होती.
      मुलं झाडावर उंच पोहचल्यावर अचानक जोराचं वादळ आलं. 
ते झाड वाऱ्यानं गदागदा हालू लागलं.

     पहिल्या मुलाची आई तिच्या मुलाला म्हणाली, "पडशील" 

     तर दुसऱ्या मुलाची आई म्हणाली, "सांभाळ, घट्ट पकडून ठेव"

     खरंतर दोन्ही मैत्रिणींना आपापल्या मुलांना पडण्यापासून वाचवायचं होतं. 
परंतु त्यांच्या मुखातून निघालेल्या संदेशांमध्ये मात्र विरोधाभास होता.
 परिणामी पहिल्या स्त्रीचा मुलगा फांदीवरुन घसरून खाली पडला. 
मात्र दुसऱ्या स्त्रीच्या मुलानं फांदी घट्ट धरून ठेवली 
आणि तो अलगद उतरून खाली आला.
     काय बरं असेल यामागचं कारण ? 

पहिल्या स्त्रीच्या शब्दामध्ये नकारात्मकता होती. 
जी तिच्या मुलानं ग्रहण केली आणि तो पडला.

     या उलट दुसऱ्या स्त्रीनं उच्चारलेल्या शब्दांमध्ये सकारात्मकता असल्याने 
तिच्या मुलानं ती ग्रहण केली आणि तो फांदीवर आपले पाय घट्ट रोवून बसला.

     "वास्तु करी तथास्तु" वास्तुशास्त्र देखील हेच सांगतय की आपल्या वास्तुत नेहमी सकारात्मक भाषा वापरा, 

सकारात्मक कल्पनाचित्रे निर्माण करा,

मग वास्तुच तुम्हाला तथास्तु म्हणुन सकारात्मक बदल देईल ; 

म्हणूनच आपल्या प्रार्थनेवर आणि आदेशांवर नेहमी पूर्ण विश्वास असायला हवा. 

योग्य आदेश देण्याची कला आत्मसात करा. 



आहे ना विचार करायला लावणारा छान मेसेज

Think Positive,

 Be Positive.


☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

Sunday, 17 December 2017

कचरा गोळा करणारे...

१७ डिसेंबर..



एक मेसेज...
कोणीतरी कित्ती छान म्हटलंय..

घाण तर बघणाऱ्याच्या नजरेत असते, 

नाहीतर कचरा वेचणाऱ्याला तर,

 त्यातही त्याच्या पोटासाठी अन्न दिसतं

असाच अनुभव आम्हाला
वॉकला जातो त्यावेळी येतो,
पैसे मिळतील या विचाराने कचरा  गोळा करणाऱ्याच्या  नजरेत
 आता काय गोळा करू कि ज्याचे पैसे मिळतील, 
आजचे पोट भरेल???

 कचरा, म्हणजे कागद, बाटल्या, प्लास्टिक गोळा करणारे लोक दिसतात..


यांचा पेहराव...
 देहबोली अशी असते कि... 
यांच्यावर कुत्रे भुंकत असतात.
हातावर पोट असणारे, कुठे राहतात , 
कोठून येतात??? असे अनेक प्रश्न पडतात..
पण आपले मदतनीस असतात, 
आपला परिसर स्वच्छ करतात, 
त्यातून त्यांना पैसे मिळतात.

बाहेर गावी प्रवास करतो तेव्हा शेवटचे स्टेशन जवळ आले कि 
अशीच रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करणारे दिसतात...
आपल्या मनात प्रश्न असतो पुढे काय करतात अशा बाटल्यांचे???
म कुणी त्या बाटल्या पुन्हा वापरल्या जाऊ नयेत म्हणून पिरगळतात, 
कुणी बूच वेगळीकडे टाकतात...
असाच प्रकार दुधाची पिशवी..
 कुणी ती बंद बाजूने कापतात
जेणेकरून ती पुन्हा वापरली जाऊ नये...

आपल्या घरचा कचरा गोळा करणारे.. आता आपण सुका व ओला कचरा वेगळा करतो, पण पूर्वी हे लोक एका मोकळ्या जागी कचरा वेगळा करत, त्यात सुद्धा ज्यातून पैसे मिळतील असा कचरा आधी वेगळा करत... सकाळचे असे चारपाच तासाचे पगारी काम संपले कि पैसे मिळवून देणारा कचरा भंगारवाल्याला विकायचा आणि रोकड घेऊन जायचे.. ज्या घरातून असा विकण्यासारखा कचरा मिळे तेथे त्यांची कटकट नसे,
हे काम खरंच कष्टाचे, घाणेरडे, आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक, कोणते काम करता?? असे विचारले तर.... काय सांगणार असे आहे
माणुसकीच्या दृष्टीने बघावे या स्वच्छतेच्या मदतनीसांकडे...

काही लोक मात्र यांना आंब्याच्या दिवसात आंबे देतात, घरी शुभ कार्य असेल तर गोडधोड मिठाई देतात काही कचरा जास्त आहे म्हणून वेगळे पैसे देतात. काही वापरते, चांगल्या स्थितीतील कपडे देतात.

असेच आपले मदतनीस.. काही पक्षी आहेत....

कावळा.. मेलेले उंदीर, लोकांनी खाकरलेला खाकरा,( बेडका शेमबुड) 
असे खातो.
चिमण्या.. दाणे टिपले, किडे कीटक खाते. 
घरातील पाल असेच किडे कीटक खाते
गिधाडे... 

जंगलात सुद्धा वाघ स्वतःची शिकार स्वतः करतो आणि खातो पण पोट भरले कि ती तेथेच सोडून जातो आणि मग इतर प्राणी गरजे प्रमाणे ती खातात आणि परिसर स्वच्छ होतो,
असे आहे कालचक्र...

एक कचरा गोळा करणारा बघितला आणि असंख्य विचार मनात आले....
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आजच्या use and throw च्या जमान्यात कचरा हि एक गंभीर समस्या झाली आहे,
प्लास्टिक, E- कचरा....

अरे बापरे...

 काय होणार आपली धरणीमातेचे, सजीव सृष्टीचे???


विनाश तर नाही ना....


:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

Friday, 15 December 2017

माणुसकीचे दर्शन

१५ डिसेंबर 2017



आज आम्ही कामासाठी एका ऑफिस मध्ये  गेलो होतो... भर दुपारची वेळ काम झाल्यावर 
टॅक्सीसाठी उभे होतो... 
एखादी रिकामी टॅक्सी दिसली कि ... हात दाखवत नानाचौक भाटिया... असे विचारत होतो.. काही टॅक्सीवाले दुर्लक्ष करत होते तर काही मानेने नाही म्हणत होते.
इतक्यात आमच्या घराकडे जाणारी  बस येताना दिसली सिग्नल सुद्धा लाल होता, खुशीत...  आता चढूया असे म्हणत बसच्या पुढील दरवाज्यापर्यंत पोहोचलो आणि हिरवा सिग्नल झाला बस ड्रायव्हरने अगदी वेगात बस समोरून नेली. ( आमची पण चूक आहे, आम्ही सिग्नल असताना चढण्याचा विचार करायला नको होता ) आणि बेस्ट कर्तव्य दाखवत निघून गेला, म आता चालत जाऊया असे म्हणत आम्ही चालायला सुरुवात केली, उन्हाची वेळ आणि एक वेडी आशा... मागे वळून बघत टॅक्सी मिळेल का असे बघत एक पाचशे पावले चालत गेलो..
अचानक एक रिकामी टॅक्सी दिसली.. म्हणून हात केला, टॅक्सी थोडी कडेला येत थांबली. वाह..!! नशीबच काढले असे म्हणत मागचा दरवाजा उघडला तर... 

आत एक आधुनिक पेहराव केलेली तरुणी बसली होती. 

मी : आपको उतरना है??


तरुणी : नही, लेकिन आप बैठिये,

मी : ???


ड्रायव्हर: आप ये बाजू आके बैठो,


मी : लेकिन में अकेले नही हूं... मेरे साथ ये भी है... 


ड्रायव्हर : ये आगे बैठेंगे...


टॉक्सिची गरज होतीच
काही विचार न करता आम्ही बसलो.. टॅक्सी सुरु झाली.

तरुणी : आप कब के खडे थे, और आपको भाटिया, नाना चौक जाना था ये मैंने सून लिया था, 
में भी भाटिया जा रही हूं.
तो ड्राईव्हर को टॅक्सी रोकने के लिये कहा...

मी : देव देव म्हणतो आपण.! 

या आधुनिक तरुणी मध्ये आम्हाला साक्षात देवाचे दर्शन झाले.

भाटिया हॉस्पिटल जवळ ती उतरली, उतरताना तिने टॅक्सीचे पैसे दिले, 
आम्ही तिला सांगत होतो आम्ही पुढील स्टॉप वर उतरू तेव्हा पैसे देतो, 
तू आम्हाला टॅक्सी मध्ये घेतले हेच खूप आहे.
पण तिने पैसे दिलेच...
आम्ही पुढील स्टॉप वर टॅक्सी थांबवली... 
पैसे एवढेच होते फक्त 22₹
ते पण खरतरं त्या तरुणीने दिले होते.


 पण टॅक्सीवाला....
 त्याने आमच्याकडून सुद्धा 22 रुपये घेतले आणि ...
आपल्यातील अव्यवहाराचे, अमाणुसकीचे प्रदर्शन केले...

एकाच वेळी आधुनिक तरुणीच्या माणुसकीचे दर्शन आणि लगेच अमाणुसकीचे दर्शन घडले...

असो काही का असेना, 
माणुसकी आहे, विश्वास आहे
 ज्यावर जग चालते हे दिसून आले, अनुभवले.!

हा माझा अनुभव लिहिला आणि
 माझी भाची मीता  बरोबर छान संवाद झाला.
♤♤♤♤♤♤♤♤♤♤
मीता.. मस्त एकदम. मस्त लिहिलं आहेस..

मी : तुम्ही आमची मुलं
असे किंवा याहूनही छान वागालच.!!
पण हि इतर भाषिक....

मीता : हो ना 
जगात अजून चांगली माणसे आहेत हे नक्की.!!

मी : अगं अशा चांगल्या वागण्यामुळे जग चालते...

मीता : नक्कीच.!
मी : तरी त्या ड्रायव्हर्स नी (बस व टॅक्सी) कलियुग सुरु आहे हे दाखवून दिले.
मीता  : हाऽऽहाऽऽहाऽ ऽ हाऽ ऽ  खरंय....
पण त्याचे डबल पैसे जातील...
मी: ते तर असतच
श्रमाचा पैसा आणि खोटा  कमावलेला पैसा...

( आपले कष्टाचे पैसे... त्याला चांगले काम करण्याची बुद्धी देतील)

आपण सुद्धा वाटेत पैसे दिसले तर 
लक्ष्मी म्हणून अपमान न करता उचलतो
 ते भिकाऱ्याला,
 किंवा देवळात किंवा
 मी तर उचलून पाय लागणार नाही अशा ठिकाणी ठेवते.
मीता : पण सगळेच असा विचार करत नाहीत. आणि असा विचार करणारे जगात खूप कमी आहेत.
मी : हो
पण आपले असे विचार
बघतात ऐकतात
आवडतात आणि वागण्याचा प्रयत्न करतात..
मी : मागे एक आलेला विचार जो मला आवडतो तो पाठवते.
*******************
"मदतीसाठी देव जवळच्या व्यक्तीला पाठवतो !!!
     अनेकदा आपण केलेल्या छोट्याशा मदतीमुळे कुणाचे तरी आयुष्य बदलून जाते. 
आपल्याला हे समजत नाही,
 आपण ज्याला मदत करतो तो आयुष्यभर कृतज्ञ राहतो.
 खरं तर देव लोकांना मदत करण्यासाठी 
आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवत असतो.
 माहीत नाही. 
देव आपल्यावर केव्हा आणि कोणती जबाबदारी सोपवेल."
*******************
मी : है ना....
देव नात्यात बांधायला विसरतो अशा व्यक्ती
 आपल्या आयुष्यात अशा अचानक काही क्षणासाठी येतात 
आणि आपल्याला काही शिकवून जातात...
मीता : हो ते तर आहेच...

असा सुंदर संवाद झाला आमच्यात.!
♤♤♤♤♤♤♤♤♤♤

आणि काही मैत्रिणीनी आपले मत व्यक्त केले.
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽


१.) मैत्रीण .. अनूभवा सारखा गुरू नाही.

मी : करावे देशाटन, प्रवास.. अनुभवाचे गाठोडे मोठे होते.
२.) मैत्रीण : 

No words to express

मी : हो ग.
काही वेळेला आपण पण असे वागतो.
कोणी हि आसपास असेल तर विचारतो कुठे जात आहात?
आपल्या बाजूला असेल तर या म्हणतो.

पण हि आधुनिक तरुणी...
आणि तिने केलेले सहकार्य वाखाणण्या जोगे
मैत्रीण : होय होय

माणुसकी, चांगुलपणा

Helping nature

अजून काही प्रमाणात जिवंत आहे.

मैत्रीण :  हो.
आम्ही पण बस स्टॉपवर
कोणी उभे असेल तर गाडीत घेतो, स्टेशनला जाताना.
✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽ ✽

३.) मैत्रीण : या वरून कळते देव आपल्या पाठीशी उभा आहे.

मी :  हो ग..
खरोखर जर देव समोर उभा राहिला तर..
 डोळे दिपतील... काय करावे ते सुचणार नाही.
आपण देवळात जातो आणि
 देवाला पाहून आपण प्रथम डोळे मिटतो.
नतमस्तक होतो. 
प्रार्थना म्हणतो मग डोळे उघडतो.
हो ना.!
आणि माणसातील देव दिसला कि आनंदित होतो.
~~~~~~~~~~~~

४.) मैत्रीण : २ प्रकारची माणसे एकत्र भेटली.

मी : हो ना...
प्रत्येक व्यक्तिकडून शिकतो.!
कसे वागावे.
कसे वागू नये.

खरंच एकाच वेळी दोन माणसे भेटली.

दोन्ही ड्रायव्हर्स, सुद्धा आपल्या पेशाप्रमाणे वागले...

खरतर आमची पण चूक आहे, 

आम्ही सिग्नल ला बस थांबली असताना

 ती पकडण्याचा प्रयत्न केला.


कुणी मला म्हणाले
हात दाखवा.
बस थांबवा.
असे ब्रीद आहे.
BEST चे

पण अनुभव वेगळाच येतोय.

~~~~~~~~~~~~
५.) मैत्रीण :
 जगात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात
.त्या त्या वेळेनुसार अनुभव येत असतात.
पण एक सांगू का
 आपण जे जपजाप्य, स्तोत्रपठण वगैरे जे करतो 
त्यामुळे आपल्या शरीरात पाॅझिटीव्ह, 
(सकारात्मकता) तयार होत असते. 
येणारे वाईट अनुभव कमी असतात व चांगले अनुभव जास्त असतात.
 पण हे सुध्दा एखाद्या प्रसंगाचे गांभिर्य, 
परिस्थिती, आणि ठिकाण यावर अवलंबून असते.
मी : वाह, सुंदर लिहिलेस.

********************************

Tuesday, 5 December 2017

भारतातील ऋतू हिवसाळा



५ डिसेंबर...

काल पाऊस पडला आणि मला निबंध लिहावा वाटला

     आता पावसाळा ऋतू संपला आणि ऑक्टोबर हिट सुरु होईल कि काय??
असे म्हणेपर्यंत पाऊस संपतच नाही
 म मध्येच ऊन इतकं  कि पाऊस पडला तर बरंय.!
असे म्हणेपर्यंत कंदील वर छत्री लावायला लागते कि काय???
 असा प्रश्न पडतो...म लागतात डिसेंबरचे वेध...
आवडता महिना आवडता महिना म्हणत सुरुवात होते डिसेंबर... 
चला आता थंडी पडणार.. 
जाऊ देत छत्र्या जागेवर... म्हणतोय 
तोपर्यंत वादळ येणार अशी बातमी थडकते..

मुंबई हा सुरक्षित किनारा आहे , वादळ गुजरात कडे सरकते असा अनुभव आहे...
पण लगेच शाळा कॉलेज बंद उद्या सुट्टी...
या खुशीत असताना पावसाचे आगमन होते, 
 आणि दिवसभर सूर्यदर्शन नाही 
अवेळी पावसाची रिपरिप सुरूच राहते.
मला कालच्या पावसाने सुचलेले मेसेज..
(अर्थात व्हाट्सअप्प वर मेसेज येत होते ते वाचून सुचले)
××××××××××××××××
 शाळा-कॉलेज काय बंद करता...
सरकारी कार्यालये काय बंद करता
हिम्मत असेल  आमचे स्वयंपाक घर  बंद करून दाखवा.

एक  संतप्त.. गृहिणी

××××××××××××××××
 आता कुणी विचारलं कि कस गेलं वर्ष 

तर



पावसात पावसात...

असे दोन मेसेज सुचले मला
××××××××××××××××

 हार मानेल तो मुंबईकर कसला??? 



लगेच व्हाट्सअप्प वर मेसेजेस ना सुरुवात...
काही मेसेज फॉरवर्ड करते..
:::::::::::::::::::::::::::::::::::
बाहेर पडू नका
मुंबई आंघोळीला 
बसलीय
~~~~~~~~~~~~
मौसम मस्ताना
अजिबात गरज
नसताना
☆☆☆☆☆☆☆☆☆

इकडे स्वेटर ला 
प्लास्टिक मिळेल
अर्थात पुणे येथे
◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇
 च्या मायला पुन्हा पावसाळा आला...
आता दिवाळी येणार.. परत बोनस. 
होय हे माझ सरकार ः आम्ही लाभार्थी.!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

 वोह गणपती मे आता है, 

वोह नवरात्र मे भी आता है,

वोह ईद मे भी आ चुका,

 वोह ख्रिसमस मे भी आयेगा...

बारीश का कोई धर्म नही होता सहाब
*******************
कुणाच्या पावसाच्या कविता 
टाकायच्या राहिल्या असतील 
तर टाकून घ्या पटकन...

तो आलाय परत 

******************
कधी नव्हे ते 
  Ockhi cyclone
मुंबईला येत होते...
ते पण गुजरात वाल्यांनी..
आपल्याकडे नेले...
Partiality ची हद्द झाली राव..! 

::::::::::::::::::::::::::::::::::::

 काही तांत्रिक अडचणींमुळे 
थंडी रद्द करून पुन्हा एकदा 
पावसाळा सुरु करण्यात आला आहे 
...इंद्रदेव
~~~~~~~~~~~~

काय फालतूगिरी आहे ही आत्ता मी नाही नाचणार ...


एक वैतागलेला मोर

~~~~~~~~~~~~~
 हे सगळं अशोक सराफ यांच्या मुळे झालंय...
आता *ओख्खी* आलंय..
अजुन 

*विक्खी वॅख्या*

बाकी आहे..

*ओख्खी विक्खी वॅख्या...*

धुमधडाका

~~~~~~~~~~~~~
 Reason for leave today!

माळ्यावर ठेवलेली छत्री मिळाली नाही .
{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}
आहे कमाल...
मस्त धम्माल मेसेजची...
अजूनही काही असे धम्माल मेसेज आले होते.
°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•°•

Friday, 1 December 2017

आज १ डिसेंबर....


आवडत्या महिन्याची सुरुवात सुट्टीच्या दिवसाने झालीय.


मागोमाग येणाऱ्या रविवारी
 दत्त जयंती....
आणि 25 डिसेंबर.. नाताळ

☆ हा  महिना खास असतो...
☆ वातावरण छान असते... थोडी मुंबईची थंडी...
☆ बाजारात छान थंडी spl. कपडे आलेले असतात..
☆ कुठे असते मुंबईत थंडी?? म्हणत हौशीने कपडे घेतो...
☆ या वर्षाला टाटा करणे...
☆ कधी वर्ष सुरु झाले आणि कधी संपले... कळलेच नाही ना..
असे प्रत्येक जण आवर्जून म्हणतो.

☆ आणि नवीन वर्ष सुरु होण्याची वाट बघणे...

☆ एरवी 31 या तारखेंने कॅलेंडर चे पान उलटतो


पण या 31 तारखेंने कॅलेंडर बदलतो...


★पुढील वर्षाचे कॅलेंडर एव्हापर्यंत घरी आले असते आणि 
कधी कोणते सण, 
कधी सुट्ट्या?? 
कोणत्या सुट्ट्या बुडाल्या?.... हे बघून त्याप्रमाणे थोडी कार्यक्रमांची आखणी करतो....

☆ अरे जून महिना... सुट्टीच नाही... पण जास्त पाऊस झाला तर.. मिळू शकेल सुट्टी असे मनात म्हणतो...

☆ या वर्षी बाप्पाचे आगमन आहे का लवकर??? हे आवर्जून बघतो...

कित्ती आणि काय काय सुरु होते चालू वर्षाच्या शेवटच्या महिन्यात...

आणि उत्साहाने सज्ज होतो नवं वर्षाच्या आगमनासाठी...

☆  हा महिना... कोणते संकल्प करू या नवं वर्षासाठी
हे पण ठरवण्याचा...
हे मी लिहिले आणि कोणाचा तरी अशाच आशयाचा मेसेज आला
तो… देते

कँलेंडरची पाने चाळता-चाळता सहज विचार आला मनात
संपत आले हे ही वर्ष, अगदी महीनाच राहीला शिल्लक...... आयुष्याची एक-एक वर्ष पालटून जातात किती सहज ना...
रोज दिवस उगवतो...
रोज मावळतो...
एक एक दिवस पोटात साठवतो...
मागच्या तारखांवर नजर फिरवता,
काही दिनांकावर रेंगाळत राहते मन बराच वेळ...
त्या सुखद आठवणी होतात ताज्या आणि मनाला जाणवतो एक सुखद गारवा...
काही तारखा उगीच करतात जखमा ताज्या आणि अश्रुंचा बांध जातो फुटून...
सुख-दुःखाच्या तारखा...
हास्य-अश्रुंच्या तारखा...
मान-अपमानाच्या तारखा...
विश्वास- बेईमानीच्या तारखा...
खऱ्या-खोट्याच्या तारखा...
हव्या-नकोशा तारखा...
प्रेम-द्वेषाच्या तारखा...
आपल्या परक्याच्या तारखा...
ऊन-सावलीच्या तारखा...
अशा अगणित तारखा येऊन जातात वर्षभरात...
आणि वर्षाच्या शेवटी मागे वळून बघताना
मनात एक वेगळीच हुरहूर तशीच राहते टिकून...
आणि मनात विचार येतो...
आता येईल नवीन कॅलेंडर आयुष्याच्या वेगवेगळ्या तारखा घेऊन...

हे मी लिहिलं नाही

forwrded...


जिच्यामुळे मी डिसेंबर हे लिहिले त्या मैत्रिणीला विचारले...
 आताच एक विचार आला मनात

आणि ती ऑनलाइन

असं केलं तर...
प्रत्येकाला रोज काही दोन ओळी टाईप करून पाठवा...
 त्यात चांगला विचार, संकल्प काहीही... 
टाईप करून पाठवा असे सुचवले तर....

१डिसेंबर... आजचा संकल्प... 
पाठवा काहीही टाईप करून...
 मनातील विचार कुणाचे कौतुक... काहीही

फक्त ३१ तारखेपर्यंत
 रोज करता येईल असे...

१... करा टाईप आणि पाठवा... काहीही...
विचार, संकल्प

आणि सुरुवात केली बघू...

*******************************