Tuesday, 13 December 2016

भगवद् गीता....१८ वा अध्याय


श्लोक १ ते ४०



आदित्यने सीए परीक्षा दिली त्यावेळी.... 
आई आता तू काय करणार ???
 आपण गीता पाठ करू या असे बोलणे झाले.

आमच्या मावशी या गीता खूप सुंदर म्हणतात.

म त्यांना दोन अध्याय पाठवा असे सांगितले
त्यांनी लगेच १२ वा १५वा असे साधारण सगळ्यांना येतात असे आणि  १ला असे तीन अध्याय निरूपणासह पाठवले. पुस्तक पाठवले...

पण.... 

पहिलाच अध्याय वाचायला घेतला आणि....
पहिले दोन शब्द 

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे....

बघूनच कोणाच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय गीता म्हणता येणार नाही हे समजले...

आणि लवकरच तो योग आला.

आपल्या दादर चे 
श्री. श्रीकृष्ण जोशी यांचे मार्गदर्शन मिळू लागले.
फार सुंदर संथा देतात.
म पहिला अध्याय सुरु झाला.

वर्गाची गोडी लागली आणि बघता बघता पहिला अध्याय संथा देऊन झाला.

आणि मी तो पाठ केला.

म सहावा अध्याय ..... 

कारण तो दादर विठ्ठल मंदिरात स्पर्धा होणार म भाग घेता यायला हवा म्हणून संथा द्यायला सुरुवात झाली
हा आत्मसंयम योगावर आहे.. तो पण पाठ करत होते, पण मधेच कुठेतरी गेले आणि पाठ करण्याचे राहिले

पुढे १८ वा अध्याय डिसेंबर मध्ये स्पर्धेसाठी असणार म्हणून त्याची संथा.!

ते पण पाठ करू लागले रोज १, ६, १८ असे म्हणू लागले.

२० श्लोक पाठ झाले.
तो पर्यंत २, ३, ४, ५, ७ असे अध्याय संथा देऊन झाले.
जमतील तसे श्लोक पाठ करत होते.
उच्चाराकडे लक्ष देत होते.

एक दिवस मार्गदर्शन करणाऱ्या ताई म्हणाल्या

तुम्ही योगा शिक्षक आहात,

तर तुम्ही सहावा अध्याय पाठ केला पाहिजे.

म सहावा अध्याय पाठ केला.

म १८ वा अध्याय थोडे श्लोक पाठ होते आणि रोज म्हणत होते त्यामुळे शब्द तोंडी बसले होते.

म वर्गात सूचना आली कि जे भाग घेणार आहेत

 त्यांनी सरांसमोर म्हणावे म्हणजे

 जे योग्य नसेल त्याचे मार्गदर्शन मिळेल आणि स्पर्धेची तयारी होईल....

सर खूपच सुंदर मार्गदर्शन करतात.!

आणि स्पर्धेचा दिवस आला.
१० डिसेंबर... २०१६

गीता जयंती

मी ब्राह्मण सभा गिरगाव येथे  गेले.! 
(आधीच म्हणजे मी पाठ केले तेव्हा  माझ्या voice  मध्ये कोणाला पाठवले होते त्यापैकी अजून दोनचार जणांनी सुंदर मार्गदर्शन केले होतेच.)

ते लक्षात ठेवले. आणि माईक समोर उभी राहिले.

* हे भगवंताचे शब्द आहेत.

* हे शांतपणे, म्हणायचे.!

* गोड आवाजात म्हणायचे.

त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण करून, 
सरांना मनोमन नमस्कार करून अध्याय म्हणायला सुरुवात केली
अध्याय म्हटला....
समोर बसलेले स्पर्धक, आमचे मार्गदर्शक यांनी टाळ्या वाजवल्या आणि खूप छान म्हटल्याचे सांगितले....
मला तर खूपच आनंद झाला होता....
 आयुष्यात प्रथमच मी माईक समोर उभे राहून स्पर्धेत भाग घेऊन छान म्हटले.!
बघायला गेले तर सगळेच छान म्हणत होते.
पण काल result लागला तो आज मी बघितला


आणि मला तृतीय पारितोषिक मिळाले.

आज गीता वर्ग होता.... जरा उशिराच गेले वर्गात.... (बाहेर गेले होते)
सगळ्यांनी कौतुक केले.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आज दत्तजयंती.
आजचा दिवस खूप आनंदाचा आहे.

घरच्यांचे पाठबळ,

तुम्ही माझे सगळे... तुमच्या सदिच्छा.! 

सरांचे सुंदर संथा देणे, आमच्या मार्गदर्शक ताई.! 
यामुळेच मला धीटपणा आला, पाठ करावे वाटले आणि तेथे जाऊन म्हटले.....

मी म्हटलं ना मला दोनचार जणांनी छान मार्गदर्शन केले ते.....

आता पहिला मार्गदर्शन

कॉन्शसली उच्चार करू नकोस, सहजता आपोआप रोज म्हणून येईलच.
ब्राह्मणी अतिस्पष्ट उच्चार असावेतच पण थोडा गोडवा तुझ्या नेहमीच्या आवाजा सारखा आला तर .....
ऐकणारा खूष होईल आणि पठण संपूच नये असे वाटेल. 
तेव्हा रोज मुलांना गोड आवाजात म्हणून voice मधून पाठवतेस तसं म्हणायचा सराव कर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आता दुसरा......

हिम्मत म्हणजे मन आणि डोके शांत
 ठेऊन स्टेजवर उभे राहायचे,
आणि आपण स्टेजवर कशासाठी उभे आहोत त्याकडेच एकाग्र व्हायचे.
आणि शांतपणे श्लोक म्हणायचे.!
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अजूनही काही... म्हणत होते तुम्ही छान म्हणाल बक्षीस मिळेल.
मला फक्त स्टेजवर उभे राहून छान म्हणायचे होते.

आपली चांगली इच्छा नेहमी पूर्ण होते. हेच देवाचे आशीर्वाद.!!!!!



°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
ब्राह्मण सभा
भगवद्गीता १८ वा अध्याय 
१ते ४० श्लोक स्पर्धा

मला तृतीय बक्षीस मिळाले.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

No comments:

Post a Comment