Wednesday, 20 September 2017

पोहे....


परवा आमची भिशी झाली तर 

भात प्रकार ऐवजी दहीपोहे केले होते.

त्यावेळी मैत्रीण म्हणाली....
एकदा प्रत्येकीने फक्त पोहे प्रकार आणायचा असे ठरले... 
पंधरा प्रकारचे पोहे केले गेले.
म विचार चक्र सुरु झाले.

     भूक लागली पटकन दही पोहे,
रात्री जेवण नको पण थोडीशी भूक आहे करा दही पोहे.!

     दहीकाला..

 हंडी फोडली कि मुले मस्त हातावर घेऊन दही पोहे खातात
हे मात्र अगदी साग्रसंगीत असतात..
त्यात केळी, खोबऱ्याचे तुकडे, दाणे, कोथिंबीर आणि मस्त दही ताक.

लहानपणी आम्ही  भावंडं तिघेही
 गूळ नारळ पोहे एका ताटात एकत्र तीन भाग करून खात असू.
तेल तिखट मीठ पोहे तर.... पटवर्धन मंडळींना प्रिय.!!!
 आणि बरोबर पोह्यांचा पापड... दोन तरी हवेतच... एक पोह्यांवर कुस्करून आणि एक तोंडी लावणे...
काही वेळा यात लोणच्याचा खार, तर कधी फोडणीची मिरची , तर कधी थोडा गोडा मसाला... आणि जर यावर नारळ असेल तर.... वाह व्वा.!!
कांदे पोहे पण लसूण आलं आणि लाल तिखट घालून केलेले लाला पोहे दिवसात, थंडीत छान लागतात.

आणि हात फोडणीचे पोहे, यालाच काहीजण कोशिंबिरीचे पोहे असही म्हणतात.
दडपे पोहे.... भरपूर नारळ कांदा,मिरची कोथिंबीर साखर मीठ लाऊन ठेवायचे त्याला पाणी सुटले कि त्यात पोहे घालायचे... आणि ते दडपून ठेवायचे...
मस्तच लागतात... आणि जेवण म्हणून पण चालतात..
आणि फोडणीचे पोहे अनेक व्यंजन घालून केले जातात.

वांगे, मटार, फ्लॉवर,  दाणे असे कोणतेही व्यंजन छान लागते.

या पोह्यांबरोबर पोह्यांचा पापड किंवा मिरगुंडे असतील तर लै भारी.!!!
कांदे पोहे.... वाह.!

पूर्वी तर मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम आणि कांदे पोहे हे समीकरण होते...

एका सिनेमात तर यावर चक्क गाणेच आहे.. "कढईतले कांदे पोहे"...
कोळाचे पोहे...आंबट गोड सुंदर लागतात.

इंदोर येथे वाटेवाटेवर पोहे मिळतात
हे पोहे मंद आचेवर वाफत असतात.
त्यावर डाळिंब दाणे घालून देतात.
मागे असे वाचनात आले होते कि येथे शेकडो किलो पोहे रोज केले व खाल्ले जातात.

लाल पोहे...

असे गिरणीतील पोहे... 

अलिबाग एस टी स्टँड जवळून घेतलेले आहेत.
असे लाल पोहे नुसतेच चावून चावून छान गोड लागतात..

अहो भगवान श्रीकृष्णांना भेटायला मित्र सुदामा भेटायला आला तर

त्याने हे पोहेच भेट म्हणून आणले होते.

म्हणजे हा पदार्थ किती जुना आहे...
पेण, पनवेल, महाड, अलिबाग... अशा ठिकाणी पोहे गिरण्या आहेत.

पापडासाठी बुटक्याचे पोहे असतील तर... पापड छान होत असत.

दूध पोहे हे तर मधल्या वेळेचे खाणे....

पातळ पोहे चिवडा तर... असायचा घरी
तो सुद्धा ताजा असेल तर नुसता नाहीतर... कांदा नारळ कोथिंबीर घालून खाल्ला जायचा.

कधी कुरमुरे घालून केला जायचा...

हल्ली रंगीत पातळ पोहे मिळतात.

इडली करताना त्यात भिजवलेले पोहे वाटून घालतात... इडल्या छान हलक्या होतात.
डोसे करताना पोहे घातले तर डोसे कुरकुरीत होतात..

पोह्यांचे डांगर... असा खास पदार्थ .!

छान लाट्या आयत्या मिळाल्या तर.... 
आणि त्याही पेणच्या... 
येथील वैशिष्ट्य म्हणजे छोट्याशा उखळीत कुटून कुटून लाट्या केल्या जात.
 (आता आपण घरी केले तर कोमट पाणी घेऊन मळून मळून घेतो.)
मग काय... व्वा वाह व्वा.!
हवे तर नुसते पोहा पीठ दुधातून खाल्ले जाते.

असे सांगावे तेवढे कौतुक कमीच या पोह्यांचे!
इति पोहे महिमा नमः

ज्याने पोह्यांचा शोध लावला त्याला शतशः धन्यवाद.!!!


✽ ✽✽ ✽✽  ✽✽  ✽✽ ✽✽  ✽✽  ✽

No comments:

Post a Comment