Thursday, 27 July 2017

पंचमीचा सण आला..


असे सण आले कि...

मी माझ्या बालपणात डोकावते...

        मिश्र वस्तीत गेले बालपण...
 छान दोनतीन मैदाने होती आणि सतत मुले खेळत असत...
 काम करत असत.
दोन मैदानाच्या मध्ये मोठे वडाचे झाड होते... 
म्हणजे यामुळेच दोन मैदाने होती... 
एका बाजूला छान मैदान करून रात्री झिम्मा फुगड्या खेळत असू..
अगदी अनंत चतुर्दशी पर्यंत.

मेंदी काढायची...

 ती आतल्या वाडीत मेंदीचे झाड होते...
 त्यांना विचारून पाने तोडत असू... 
आणि दगडावर वाटून हाताला गोल किंवा पूर्ण हाताला मेंदी.
 रात्री हात बांधून झोपायचे... 
आतल्या वाडीत छोटी मोकळी जागा होती.


अगदी अलीकडे झाडाला झोके बांधून झोके घेताना बघितले मज्जा वाटली.!


यादिवशी तळणे भाजणे वर्ज्य !! 
म आदल्या दिवशी पोळी करणे, 

करंज्या करणे,

 खांडवी करून ठेवणे
 भाजी चिरून ठेवणे. 
हि कामे केल्यामुळे बहुतेक स्त्रियांना वेळ मिळत असेल 
झोके, झिम्मा फुगड्या... आनंद व्यक्त करायला.!

नागविषयी कृतज्ञता... 

म्हणून पूजा.. 

नंतर कथा वाचन... 

नेवैद्य म्हणून दूध आणि भाताच्या लाह्या .!!

     नाग प्रत्यक्ष पकडून पूजा हे मात्र बालपणी माहित नव्हते... 
माझे बालपण सुद्धा शहरातच गेले.!

" बत्तीस शिराळे " यागावी 

शेतात जाऊन नाग पकडून पूजा करतात 

असे दूरदर्शन वर दाखवत असत.

   सुंदर असे  " चंदनाचे नाग नागीण "  आणि 
त्यांची पिल्ले पाटावर काढून त्यांची पूजा... 
घरोघरी होत असे... 
      गारुडी बंदिस्त टोपलीतून नाग घेऊन येत.
त्यांची पूजा केली जात असे.
गारुडी पुंगी वाजवू लागला कि नाग डोलत असे.! 

साप आणि नाग यात फरक आहे हे नंतर नंतर कळू लागले,

   शेषशायी भगवान असे चित्र बघतो.

   आता गीता शिकताना 

सर्पाणामस्मि वासुकीः

अनंतश्चास्मि नागानां

असे पाठ केले आहे.!


श्रावणातील पहिला सण...

असा मजेत आनंदात.. साजरा केला जात असे..
या कथा, सण उत्सव त्यासाठी केले जाणारे नेवैद्य...
 या मागे शास्त्र आहे हे मात्र कोणी सांगितले नव्हते.
   आजी करते म्हणून आई ... 
आई करते म्हणून मुलगी.. 
असे परंपरेने हे सण आले... 

आपले ऋतुमान... 

यानुसार सगळे  सणवार नेवैद्य आहे असे आता आता लक्षात येऊ लागले.
फक्त त्या त्या सणाला तो पदार्थ घरी केला जायचा.... जो त्या ऋतूनुसार.!
✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺

ll नवनाग स्तोत्र ll


अनन्तं वासुकिं शेषं 
पद्मनाभं च कम्बलं
शन्खपालं धृतराष्ट्रं च 
तक्षकं कालियं तथा
एतानि नव नामानि
 नागानाम च महात्मनः
सायंकाले पठेन्नीत्यं 
प्रातःकाले विशेषतः
तस्य विषभयं नास्ती 
सर्वत्र विजयी भवेत|
इती श्री नवनाग स्तोत्रं संपुर्णं
श्री नवनागार्पणमस्तू ||
शुभं भवतू शुभं भवतू शुभं भवतू
✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺

No comments:

Post a Comment