Wednesday, 15 March 2017

१५ मार्च २०१७... अध्याय १३


आज अध्याय १३ सुरु झाला.

हा क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग अध्याय आहे.

(प्रकृती, पुरुष आणि चेतना)


मूळ गीता पुस्तकात ३४ श्लोक आहेत. 

आणि सर्व श्लोक भगवंताचे आहेत.


पण... भगवद्गीता जशी आहे तशी..हे कृष्णकृपामूर्ती 
श्री श्रीमद् ए. सी.भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद  यांच्या पुस्तकात 
 अर्जुन उवाच अशी सुरुवात आहे. 
आणि
३५ श्लोक आहेत.

         अर्जुन उवाच
प्रकृतिं पुरुषं चैव
क्षेत्रं क्षेत्रज्ञ मेव च ।
एतद्वेदितुमिच्छामी 
ज्ञानं ज्ञेयं च केशव ।।१।।

अर्जुन म्हणाला, हे कृष्णा! मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे.
शरीराला क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते.
अशी सुरुवात आहे.
या गीता पुस्तकात सुद्धा एकूण श्लोक ७०० च आहेत.

आणि भगवद गीता पुस्तकात मात्र संपुर्ण अध्याय हा भगवंतांनी सांगितलेला आहे...

लोकमान्य टिळक त्यांच्या गीतारहस्य ग्रंथात म्हणतात 

कि हा अर्जुनाचा श्लोक नंतर कोणीतरी लिहिला आहे.


❦❧❦❧❦❧❦❧❦❧❦❧❦❧❦❧❦❧

काही अक्षरे.... 

या अक्षरांचा श्लोकामध्ये प्रत्येकवेळी अर्थ असतोच असे नाही. अर्थ असतो पण काही वेळा नसतो.

पादपूरणार्थ
हि संस्कृत मध्ये घेतली जातात

पादपूरक अक्षरे


' च '  ' वै ' ' हि' ' तु '

च - आणि, सुद्धा

वै - खास अर्थ नाही.


कवीला वाटते कि पंधरा अक्षरे जमली आहेत सोळावं अक्षर हवे तर या अक्षराचा वापर केला जातो..

 ❥♡❥♡❥♡❥♡❥♡❥♡

ऽ हे अवखंड/ अवग्रह चिन्ह आहे


एकार व ओकारानंतर हे चिन्ह येते.

ऽ ऽ याचा अर्थ आहे...
↓↓

एक श्लोक.... अर्थासह दिला आहे.

विसर्गाचा लोप होतो व अ चा अवग्रह होतो


◑◐◑◐◑

पथ्ये सती गदार्तस्य 

किम् औषध निषेवणम् ।

पथ्ये ऽ सति गदार्तस्य

किम् औषध निषेवणम् ।।

अर्थ : 
पथ्ये सति, पथ्य असेल तर औषधाचा काय उपयोग.!

पथ्येऽसति ( पथ्ये असति )
पथ्य नसेल तर औषधाचा काय उपयोग???
★ पथ्य महत्वाचे.!!!


 ❥♡❥♡❥♡❥♡❥♡❥♡

 भगवद गीता....


अध्याय नववा... 

यात ३४ श्लोक आहेत आणि सगळे श्लोक भगवान कृष्णांनी सांगितले आहेत.
हा राजविद्याराजगुह्ययोग आहे.

यावर ज्ञानेश्वरांनी भाष्य करताना ५३५ ओव्या लिहिल्या आहेत.


**********************

 अध्याय ...१३


 हा संपूर्ण अध्याय भगवंतांनीच सांगितला आहे.
 श्लोक सुद्धा ३४ सच आहेत... 

पण हा समजायला कठीण आहे...

यावर भाष्य करताना 

ज्ञानेश्वरांनी ११७० ओव्या लिहिल्या आहेत.

हा क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग नावाचा अध्याय आहे.


••●••●••●••●••●••●••●••●••●••●••

No comments:

Post a Comment