Sunday, 12 January 2020

आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती.

आज रविवार....
 मग वेगळे काही.... रोजचीच १२३ बस ... 
तिकीट मात्र गेटवे ऑफ इंडिया/रीगल असे काढले. 
मस्त वातावरण.. 
हॉटेल ताज परिसर...
 कुणी वॉक
 कुणी सायकल
 कुणी लाँच फेरफटका...
 आणि जास्त फोटो काढणारे....
 कुणी सेल्फी 
कुणी फोटोग्राफर कडून फोटो काढून घेत आहेत.
 तिकडे beauty parlour   मुली रस्त्यावरच मुलींना तयार करत आहेत.... 
काही कळेना....
 मग नंतर लक्षात आले
 की pre wedding shooting साठी खूप लोक आले आहेत.
 फोटोग्राफर आणि त्याचा assistant...मदतनीस.

भरपूर समुद्रपक्षी आहेत.
छोट्या होड्या, लाँच खूपच आहेत.
 सगळीकडे बघत आहे. 
समोरच आकाश हलके तांबडे होऊ लागलाय
कारण थंडी आहे ना...
 तर धुके असल्या सारखे. 
आणि सूर्यदेव दिसू लागले.
 सुखद अनुभव. सहज बघू शकतोय.
 किती सुंदर कोवळे तेज.!
 अगदी दहा मिनिटे सहज बघू शकले.


त्याचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब....??? की छाया??? 
पाण्यातील किरणे सुंदर दिसतायत.

आता वळले दुसऱ्या बाजूला...
 Oh....

आज १२ जानेवारी

स्वामी विवेकानंद जयंती.
येथील त्यांचा statue... छान सजवला आहे. 
अग्निशमन दल जवान आपल्या गाडी सह उभे आहेत
. त्यांच्या शिडीच्या साहाय्याने तो परिसर पुतळा सजवत आहेत.
स्वामीजींना विनम्र अभिवादन केले. 
आताच कन्याकुमारी येथे जाऊन आले ते सगळे आठवले.
 त्यांच्या गोष्टी आठवल्या. आपण योग वर्ग केला
स्वामी विवेकानंद केंद्र दादर येथे ते आठवले.
तेवढ्यात गिरगाव 
स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान चे युवक युवती आले.
त्यांना फुले अर्पण केली. 
ओळींनी उभे राहिले आणि फारच सुंदर प्रार्थना म्हटली.
दुसरी एक प्रार्थना म्हटली
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे.....
 थोडे शब्द येत होते ते म्हटले.
नंतर काही छान घोषणा दिल्या. 
दोनतीन विद्यार्थी भेटले त्यांची ख्यालीखुशाली विचारली. 
मस्त झाली सकाळ.
अचानक स्वामीजींना तिकडे अभिवादन करता आले याचा खूप आनंद झाला.. 
आलेल्या ग्रुप मध्ये नकळत सामील झाले.
 अगदी शेवटी. उभी राहिले... ओळीत

हे सगळे छान बघायला मिळणार त्यात आपल्याला भाग घेता येणार... मनापासून प्रणाम करणार..
असे सगळे छान जुळून आले. 
अगदी लक्षात राहील असा आजचा रविवार....
 १२ जानेवारी २०२०.

आज *राष्ट्रीय युवा दिन*

स्वामी विवेकानंद जयंती.


Young men of Bharath!

 My hope is in you.

 Will you respond to the call of your nation?

 Each one of you has a glorious future if you dare-believe me.

- Swami Vivekananda -

 

 





Sunday, 29 December 2019

या वर्षीचा शेवटचा रविवार.

२९/१२/२०१९

या वर्षीचा शेवटचा रविवार.

चला आज मनाप्रमाणे करू.
आरामात... म्हणजे साडेसहाच्या दरम्यान निघालो.....
आज मॉर्निंग वॉक
अगदी रमत गमत.
थोडे उशिरा
 आटपून निघाले.
मस्त कट्ट्यावर बसलो कैवल्याधाम समोर.

समुद्र पक्षी बघितले.

हेच तर बघायला गेलो होतो.

बहुतेक पाण्यावरच होते.
मधूनच एकदा कट्ट्यावर येऊन जात.
 त्यांचे उडणे अगदी बघण्यासारखे... 
एक खट्याळ पक्षी कावळ्या बरोबर उडत होता. 
तो जाईल तिकडे, जसा उडत होता तसा त्या प्रमाणे उडत होता. 
तिकडे एक बगळा होता.... 
मधूनच मासे मटकावत होता.
 त्यालासुद्धा एका पक्ष्याने .... शर्यत लावल्या प्रमाणे दोघे उडाले...
 बगळा शेवटी जवळच उभ्या असलेल्या छोट्या होडीवर बसला. 
एक बगळ्याचे पिलू.. त्याचा पाय दुखावला होता...

शांत निळाशार समुद्र बघितला शांतपणे. 

उगवत्या सूर्याला नमस्कार केला... 


चर्नी रोड येथे.... 
फारच सुंदर दिसत होता..
तरी आकाश.. 
अगदी निळसर नव्हते. 
थोडे बाष्प मिश्रित असावे 
धुके, धुरके असे होते आकाश. 
 
मरीनलाइन्स येथे येईपर्यंत सूर्य थोडा प्रखर झाला अगदी बघणे अशक्य. 
तेव्हा त्याच्याकडे पाठ करून समुद्र पक्षी निरीक्षण...
अगदी लहान लाटा किनारी आल्या त्यांचा आवाज.... 
ऐकत आकाशाचे निरीक्षण केले.
शांत प्रसन्न रविवार सकाळ मनाप्रमाणे.... 
 
आज मॅरेथॉन धावणारे...
 बहुसंख्येने धावण्याची प्रॅक्टीस करताना दिसत होते.
 
तर रेस ची बाईक चालवणारे बऱ्या संख्येने दिसत होते.. 
दूर गेले तरी त्यांच्या बाईक चा आवाज येत होता.
 मरीन लाइन्स येथील सगळी मैदाने क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी भरली होती.
येताना मरिनलाइन्स येथून रेल्वेने घरी.
आल्या आल्या व्हॉटसअप तुमच्याशी गप्पा.
 
समुद्र पक्षी  आता आताच आले आहेत. 
 
असतात बहुतेक  फेब्रुवारी  पर्यंत. 
अजून कोणी यांना खाण्यास किही देत नाही. 
मग त्यांचे थोडे कर्कश्श ओरडणे ऐकू येते. 
मासे खातात खरतर. 
पण कट्ट्यावर लोक भावनगरी घालतात. 
 
छान वातावरण आहे. थोडी थंडी आहे. 
आंग्ल वर्ष  २०१९ चा शेवटचा रविवार 
छान झाला.

Saturday, 23 November 2019

केरळ कन्याकुमारी येथील काही फोटो

केरळ कन्याकुमारी येथील काही फोटो
केरळ विमानतळावर
राहिलो तेथे असे सुंदर स्वागत
आपल्या शेवया.

जटायू शिल्प बघायला गेलो तेथे हातात असा पट्टा बांधला


केरळ स्पेशिअल जेवण sadya
कन्याकुमारी समुद्र किनारी नारळ पाणी
समुद्र किनारी नारळ पाणी पिणे
मजा काही वेगळीच
life jacket घालून बोटीने.
विवेकानंद स्मारक बघायला







पद्मनाभ स्वामी.!!!

▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬



पद्मनाभ स्वामी.!!!

गोविंदा गोविंदा गोविंदा

व्यंकटेशाय नमः

श्रीविष्णू परमात्मा नमः

ॐ नमो भगवते वासुदेवाय


आज  भागवत एकादशी

योग सुंदर.

ब्रह्म मुहूर्त...

 पद्मनाभ स्वामी दर्शन 
लॉर्ड कृष्ण दर्शन.
आणि संपूर्ण गीता वाचन योग... 
येथे रूम वर गीता वाचली.
विष्णु सहस्र नाम ऐकले, येते तेवढे म्हणत होते. 
विष्णुची अनेक रूपे... यांचे दर्शन घेत होते.  

सकाळी आम्ही मंदिरात दर्शन घेण्यास गेलो. 
स्त्रियांची रांग अगदीच कमी.
आत जाताना प्रथम गरुड दर्शन, 
हसरा मारुती यांची दर्शने घेतली. 
मंदिरात जाताना नरसिंह
दर्शन घेतले.
आणि

 नंतर पद्मनाभस्वामी दर्शन.. 

शेषशायी  आहेत भगवंत.
चेहरा  आणि  हात  एका  खिडकीतून.!
 हाताखाली  शंकर पिंडी  आहे.
 मधल्या  खिडकीतून...
 नाभीतून  कमळ  आणि  तेथे  ब्रह्मा
आणि  देवदर्शन. आणि तिसऱ्या खिडकीतून 
पाददर्शन. 
तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात दर्शन, 
सुंदर फुले मांडणी.
आणि बाहेर आलो की पाठीमागे जाऊन तेथील दरवाजाचे दर्शन घेतात
तेथून कृष्ण दर्शन. 
 संध्याकाळी गेलो तेव्हा दाराच्या फटीतून दर्शन होते. 
 पण सकाळी मंदिर उघडे असते. 
पण असेच दिव्याच्या प्रकाशात दर्शन.


मंदिराचे गोपूर....

 द्रविड शैलीत आहे.
पद्मनाभ स्वामी मंदिर दक्षिण भारतीय वास्तू कलेचा उत्तम नमुना आहे.
मंदिर परिसर खूप मोठा असून गोपुर उंची खूपच आहे.... 
 जवळपास सात मजले असेल.
यावर सुंदर कलाकृती चितारल्या आहेत.
मंदिराजवळ एक सरोवर आहे. 

याला  "पद्मतीर्थ कुलम्"  असे म्हणतात.

 


पद्मनाभ मंदिराची निर्मिती
राजा मार्तंड याने केली.
 हे मंदिर भव्य आहे. 
द्रविड आणि केरळ शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे.
अनेक मुर्ती त्यांचे कोरीव काम बघण्यासारखे आहे.
प्रत्येक खांबावर स्त्री आणि तिच्या हातात दिवा/पणती
पूर्वी किंवा आता सणाला उत्सवाला तेल वात करत असतील.
आणि त्या प्रकाशात  सगळे वावरत असतील.

योग सुंदर....

 आलो त्या दिवशी संध्याकाळी दर्शन
पण खूप रेटारेटी. गर्दी.

२० तारखेला ब्रह्म मुहूर्तावर शांतपणे दर्शन. 

आणि येण्याच्या दिवशी 

पुन्हा सगळ्यांनी ब्रह्म मुहूर्तावर सुंदर दर्शन.!!!



▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬

Friday, 22 November 2019

जटायु शिल्प



Jatayu... Sculpture 

Rajiv Anchal

Dedicated to Women's Safety and Honour

 जटायू पक्षी रामायण कालीन... याचे शिल्प.
एका खडकात जटायू शिल्प केले आहे.
रामायणातील कथा सर्वांना माहीत आहे. 

एक जटायू  पक्षी 

रावणाबरोबर लढला होता.
आणि राम येईपर्यंत तो तिथे प्राण रोखून राहिला होता
जेव्हा रामाला त्याने सांगितले की या दिशेने रावण सीतेला घेऊन गेला.
त्यानंतर त्याने प्राण सोडले.


अप्रतिम असे हे ठिकाण.

 अतिशय उंचावर असल्याने‌ (७०० पायऱ्या) 
 केबल कारने आपण वर जातो.
 वाऱ्याचा आवाज ऐकू येतो या कारमध्ये.!
एका कार मध्ये सहा जण बसतात.
ओळीने एका वेळी चार कार
आहेत.
सुंदर निसर्ग दर्शन होते.
केबल कारमध्ये बसण्याचा आनंद काही वेगळाच.!!!
आणि वर आल्यावर हे सुंदर शिल्प.!!!!
रामाचे मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे.
रामाचे पाऊल मात्र बघायला मिळाले.
आता आता झाले आहे हे शिल्प
 आणि लगेच जायला बघायला मिळाले.
(अजूनही काही बघायला मिळेल...)
अतिशय स्वच्छता आहे.
सगळे कसे स्वच्छ चकचकीत. नवे कोरे.
वर चहा कॉफी snacks milate.
आपण कुठेही बसू उभे राहू शकतो.
फक्त असे सुंदर ठिकाण प्रत्येकाला बघायला मिळावे 
याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.

या ट्रिप मधील आजचे हे आगळे वेगळे

 एका रामायण कालीन
 मोठी कामगिरी केलेल्या

 पक्ष्याचे शिल्प पाहून खूप आनंद झाला.

 शिल्प बघून कॉफी पिण्यास बसलो आणि

 धुंवाधार पाऊस....!!!

पावसाचा अनुभव घेत गरम गरम कॉफी घेण्याची मजा काही वेगळीच
आता प्रतीक्षा..... कधी नंबर लागेल केबल कारसाठी.... 
अरे हो.... हेलिकॉप्टरची सोय होत आहे.
हेलिपॅड बांधून तयार आहे.
पायऱ्या पण बांधत आहेत.
शाळेच्या सहली येत आहेत. मुले एन्जॉय करत आहेत. 
चला बहुतेक केबल कार आली पाऊस...मस्त अनुभव
पाऊस थांबला...
सुंदर अनुभव. प्रत्येकानी या ठिकाणी भेट दिली पाहिजे.

कन्याकुमारी....

भारताचे दक्षिणेकडील टोक.... 

कन्याकुमारी म्हटले कि.... 

विवेकानंद स्मारक , 
त्रिवेणी संगम समुद्राचा 
फक्त येथूनच दिसणारा हिंदी महासागर  
 समुद्रातून होणारा सूर्योदय सूर्यास्त.
 

 सूर्योदय

सकाळी लवकर उठून सर्व आवरून त्रिवेणी संगम समुद्रावर आलो.
कट्ट्यावर बसलो. 
    समुद्रातून होणारा सूर्योदय बघायला.
असा ओरिसा... जगन्नाथ पुरी येथून दोन दिवस बघितला होता.
 पण कन्याकुमारी येथे खास.!!!
 असेही माणसाला सूर्योदय सूर्यास्त बघायला आवडते.
कुठल्या ठिकाणी भेट देऊ तेथे
. आता खरा पावसाळा नाही.
पण पाऊस रेंगाळला आहे.
 आणि कुणी म्हणाले की ह्या भागात केव्हाही पाऊस पडतो.
बघू दिसतो का?

.... सगळी अनिश्चितता..
भला थोरला पावसाळी ढग असा काही होता की
 साडेपाच वाजता वाटले समोर डोंगर झाडी आहे...काळोख होता
 पावणेसहाच्या दरम्यान लक्षात आले.. समोर समुद्र आहे तर असे कसे असेल?
 समुद्रातून  होणारा सूर्योदय बघायला आलोय...
 मग तर्क सुरू ..
इकडून होणार आहे बहुतेक तिकडून होणार आहे बहुतेक..
आता एकदम वर आल्यावरच दिसेल..
 त्याच्याकडे बघवणार नाही इतका प्रखर होऊन वर येईल...
 उठी श्रीरामा पहाट झाली.. पूर्व दिशा उजळली म्हणून झाले... 
आणि अचानक एक अगदी इवलासा लाल चेंडू/ गोल समुद्रातून येताना दिसला...
एवढ्या दाट ढगातून मस्त अगदी इवलासा सुर्यागोल दिसला. मस्तच.!!!
आल्यासारखे उगवत्या सूर्य नारायणाचे दर्शन झाले.
*********************************

 सूर्यास्त...

त्रिवेणी संगम बघितला...
गांधी यांचे.... स्मारक.
येथे बहुतेक त्यांच्या अस्थी असाव्यात.
सगळे फोटो आहेत...

पूर्ण शांतता. वर गच्ची
तेथून संपूर्ण समुद्र view दिसतो.
मस्त किनाऱ्यावर बसलो.
विक्रेते खूप त्रास देतात. 
मोती माळा, फोल्डिंग गॉगल, केसाचे रबर, चहा कॉफी...फोटो काढणारे....
असो
इथे अरबी समुद्र हिंदी महासागर, बंगालचा उपसागर असे एकत्र होतात.
पाण्याचे तीन वेगळे रंग दिसतात लाटांची दिशा कळते.


 भारताचे निमुळते टोक.

 येथेच हिंदी महासागर दिसतो.
आता सूर्यास्त....
खूप दाट ढग , सकाळ इतके नाहीत पण चांगले वितभर होते.
 लवकरच होणार सूर्यास्त हे कळत होतेच.
आम्ही ५ वाजता पोहोचलो. छान पाण्यात पाय बुडवले. फोटो काढले
काही लोक पाण्यात डुंबत होते. 
काही वर्षांपूर्वी पाण्यात आम्ही असे डुंबलो होतो त्याची आठवण झाली.
असेही सूर्यास्त आपण बघतो आपल्या चौपाटीवर 
पाण्यात होतो.
सूर्योदय कसे पाण्यातून होणार हे काही आपल्याला बघायला मिळत नाही.

आपण फार कमी वेळा खास सूर्यास्त बघायला चौपाटीवर जातो.
असो. बघितला सूर्यास्त
मावळत्या दिनकरा....

त्याला ही मनोमन नमस्कार केला.
आता परत कधी येणार इकडे????
 माहित नाही.
डावीकडे सूर्योदय आणि
उजवीकडे सूर्यास्त
विवेकानंद स्मारक

*Musical pillar.*

कन्याकुमारी येथून spl. गाडी करून निघालो 
साडेसहा वाजता...
वाटेत काही ठिकाणे बघायची होती.

*शुचींदरम् मंदिर*

छानच मोठे मंदिर 
एकाच आवरात ५० मंदिरे आहेत. येथील वैशिष्ट्य म्हणजे 

Musical pillar.

येथे काही पिलर चा समूह आहे.
 दोन ठिकाणी नक्की आहे. 
प्रत्येक पिलर मधून 
 वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज येतात. 
हे पिलर शिव  मंदिरात आहेत. 
 अगदी घटम् पासून अनेक वाद्ये आवाज येतात.
या शिवापुढे मोठा पांढरा नंदी आहे.
एकदा येथे जाऊन आले आहे.

ब्रह्मा विष्णु महेश मंदिर आहे. 

फारच सुरेख.
येथे बकुळीची फुले वेचली
( बकुळी ची फुले बघायला मिळाली आणि वेचायला सुद्धा..! )
या एकाच मंदिरात ५० मंदिर आहेत. 
सुरुवातीला नकाशा आहे मंदिराचे नाव आहे

हा संपूर्ण परिसर अनेक मंदिरांचा आहे.

मध्यभागी सुंदर तळे आहे.
सकाळची प्रसन्न वेळ आणि असे सुंदर मंदिर...
नेहमी प्रमाणे दिव्यांच्या प्रकाशात दर्शन. सुंदर कोरीव काम
या आवारात छोटी छोटी शिव मंदिरे आहेत.
हि देवभूमी आहे बहुतेक 
खूप मोठी मंदिरे, कलाकुसर केलेली

या नंतर आम्ही एक चर्च बघायला गेलो.
 चर्च नेहमी प्रमाणे... 
अगदी शांतता..
येथे राहण्याची सोय आहे.

काय वैशिष्टय???

Kovalam... बीच वर जिझस हात पसरून आहे.
खूप. मोठा statue ahe
पांढरा शुभ्र.
समुद्रात अनेक होड्या???
( मी पाठमोरा statue bghitla... )
आणि आताकाढलेला फोटो बघितला.