Sunday, 12 January 2020

आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती.

आज रविवार....
 मग वेगळे काही.... रोजचीच १२३ बस ... 
तिकीट मात्र गेटवे ऑफ इंडिया/रीगल असे काढले. 
मस्त वातावरण.. 
हॉटेल ताज परिसर...
 कुणी वॉक
 कुणी सायकल
 कुणी लाँच फेरफटका...
 आणि जास्त फोटो काढणारे....
 कुणी सेल्फी 
कुणी फोटोग्राफर कडून फोटो काढून घेत आहेत.
 तिकडे beauty parlour   मुली रस्त्यावरच मुलींना तयार करत आहेत.... 
काही कळेना....
 मग नंतर लक्षात आले
 की pre wedding shooting साठी खूप लोक आले आहेत.
 फोटोग्राफर आणि त्याचा assistant...मदतनीस.

भरपूर समुद्रपक्षी आहेत.
छोट्या होड्या, लाँच खूपच आहेत.
 सगळीकडे बघत आहे. 
समोरच आकाश हलके तांबडे होऊ लागलाय
कारण थंडी आहे ना...
 तर धुके असल्या सारखे. 
आणि सूर्यदेव दिसू लागले.
 सुखद अनुभव. सहज बघू शकतोय.
 किती सुंदर कोवळे तेज.!
 अगदी दहा मिनिटे सहज बघू शकले.


त्याचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब....??? की छाया??? 
पाण्यातील किरणे सुंदर दिसतायत.

आता वळले दुसऱ्या बाजूला...
 Oh....

आज १२ जानेवारी

स्वामी विवेकानंद जयंती.
येथील त्यांचा statue... छान सजवला आहे. 
अग्निशमन दल जवान आपल्या गाडी सह उभे आहेत
. त्यांच्या शिडीच्या साहाय्याने तो परिसर पुतळा सजवत आहेत.
स्वामीजींना विनम्र अभिवादन केले. 
आताच कन्याकुमारी येथे जाऊन आले ते सगळे आठवले.
 त्यांच्या गोष्टी आठवल्या. आपण योग वर्ग केला
स्वामी विवेकानंद केंद्र दादर येथे ते आठवले.
तेवढ्यात गिरगाव 
स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान चे युवक युवती आले.
त्यांना फुले अर्पण केली. 
ओळींनी उभे राहिले आणि फारच सुंदर प्रार्थना म्हटली.
दुसरी एक प्रार्थना म्हटली
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे.....
 थोडे शब्द येत होते ते म्हटले.
नंतर काही छान घोषणा दिल्या. 
दोनतीन विद्यार्थी भेटले त्यांची ख्यालीखुशाली विचारली. 
मस्त झाली सकाळ.
अचानक स्वामीजींना तिकडे अभिवादन करता आले याचा खूप आनंद झाला.. 
आलेल्या ग्रुप मध्ये नकळत सामील झाले.
 अगदी शेवटी. उभी राहिले... ओळीत

हे सगळे छान बघायला मिळणार त्यात आपल्याला भाग घेता येणार... मनापासून प्रणाम करणार..
असे सगळे छान जुळून आले. 
अगदी लक्षात राहील असा आजचा रविवार....
 १२ जानेवारी २०२०.

आज *राष्ट्रीय युवा दिन*

स्वामी विवेकानंद जयंती.


Young men of Bharath!

 My hope is in you.

 Will you respond to the call of your nation?

 Each one of you has a glorious future if you dare-believe me.

- Swami Vivekananda -

 

 





1 comment:

  1. madam ji. Please contact garimellahari@gmail.com . Super writing

    ReplyDelete