Sunday, 14 August 2016

फुलपाखरू.!


काल रात्री पासून  नेट प्रोब्लेम....
आज रविवार आहे, सकाळी सुप्रभात मेसेज आणि कोणाकोणाबरोबर व्हाट्सअप्प गप्पा...
पण आज उठल्या उठल्या नेट नाही
म्हणून सकाळपासून मस्त काम झाली....
आज झाडाची cutting केली, घरासमोरच छोटीशी बाग????
हो आवड आहे झाडांची, म्हणून कुंडीतली बाग आहे.

झाडं सुद्धा तशी खूप आहेत, 

 ब्रह्म कमळ / पानफुटी 

रात्री उमलणारे पांढरेशुभ्र

तगर -

छोटीशी तगर,

 यालाच चिनी तगर म्हणतात म्हणे, 
पण दिसते मस्त शिवाय देवांना वाहायला मस्त!!!

नेहमीची तगर म्हणजेच चांदणीच फुल,

डबल तगर, 

 

✽  ✽✽ ✽✽  ✽✽ ✽✽  ✽✽  ✽✽  ✽✽  ✽

जास्वंद - 

 

रक्तवर्णी लाल
गुलबक्षी आणि केशरी!

◎o◎◎o◎◎o◎◎o◎◎o◎◎o◎◎o◎
पारिजातक / प्राजक्त 
सुकोमल, नाजूक केशरी देठाचे सुगंधित 
फुलांचा सडा  पडतो 
रात्री झाडावर असतात वाऱ्याच्या झुळकेबरोबर सुगंध पसरतो 
फुले का पडती शेजारी ? 



सदाफुली - 

पांढरी, आणि गुलाबी

लिली - हाराची

आणि

शोभेची... 

जी उन्हाळ्यात फुलते, याचा रंग सुरेख केशरी आहे.

अजून एक लिलीचे झाड आहे ती गुच्छानि येते पांढरी फुलं एकावेळी वीस बावीस येतात.

गुलबक्षी रंगाची लिलीची फुले छोटी असतात पावसात फुलतात.

 

 

 

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

गुलबक्षी...

 हि फिक्की गुलाबी रंगाची
संध्याकाळी फुलते,
हिचेच दुसरे नाव..
सायंकाळी आहे


या फुलांची वेणी फुलांची देठे एकात एक गुंफून करतात,

खूप सुंदर दिसते.
::::::::::::::::::::::::::::::
::::::::::::::::::::::::::::::

गोकर्ण - 

 

 

निळी आणि पांढरी
याचा वेल असतो.
******************************
****

तुळस - 

 

बहू उपयोगी, सदा प्राणवायू देणारी, कृष्णप्रिय, घराची शान शोभा वाढवणारी, दररोज नेमाने हिला पाणी घालावे आणि कृष्णाला वहावे अशी तुळस औषधी, दररोज पाच पाने खावी.
«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»

कोरफड...

काटेरी पण औषधी, कफ झाला कि त्याचा रस घेतात, त्वचेसाठी चांगली!

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

कढीपत्ता 

आरोग्यासाठी साठी उत्तम !
शक्यतो  उठल्यावर पाच पाने खावी . 
किंवा चटणी जेवताना घ्यावी . 
काही पदार्थात कढीपत्ता हवाच !
<><><><><><><><><><><><><><><>

मनी प्लांट..

 भराभर वाढणारा, अगदी लहान पान असतं पण

 भिंतीच्या आधाराने वाढला कि खूप मोठं पान होतं

 इतकं कि दोन हातात मावत नाही.

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

बांबूची झाडे... गडद हिरवा!

हा इतका छान उंच आहे ना
अगदी बघत राहावा असा रंग आणि उंच!

आणि दुसरा आहे तो 

पोपटी पाने आणि त्यात अजून फ़िक्कया पोपटी रेघा.

◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇

आणि काही शोभेची झाड अगदी छोटी.

तर अशा बागेत थोडं काम केलं आणि ...
एक इतकं सुंदर फुलपाखरू
आमच्या बागेत फिरत होतं....!!!.

इतकं सुंदर होतं ना....
पण फोटो मात्र काढता आला नाही
पण त्याला बघून मन मात्र आनंदी झाले...
आणि हि कविता गुणगुणू लागले....


फुलपाखरू! 
छान किती दिसते! फुलपाखरू

 या वेलीवर ! फुलांबरोबर
गोड किती हसते ! फुलपाखरू 

पंख चिमुकले ! निळेजांभळे
 हालवुनी झुलते  ! फुलपाखरू !

डोळे बारीक ! करीती लुकलुक
गोल मणी जणू ते ! फुलपाखरू !

मी धरू  जाता  ! येई न हाता 
दूरच ते उडते ! फुलपाखरू  !


No comments:

Post a Comment