Sunday, 29 December 2019

या वर्षीचा शेवटचा रविवार.

२९/१२/२०१९

या वर्षीचा शेवटचा रविवार.

चला आज मनाप्रमाणे करू.
आरामात... म्हणजे साडेसहाच्या दरम्यान निघालो.....
आज मॉर्निंग वॉक
अगदी रमत गमत.
थोडे उशिरा
 आटपून निघाले.
मस्त कट्ट्यावर बसलो कैवल्याधाम समोर.

समुद्र पक्षी बघितले.

हेच तर बघायला गेलो होतो.

बहुतेक पाण्यावरच होते.
मधूनच एकदा कट्ट्यावर येऊन जात.
 त्यांचे उडणे अगदी बघण्यासारखे... 
एक खट्याळ पक्षी कावळ्या बरोबर उडत होता. 
तो जाईल तिकडे, जसा उडत होता तसा त्या प्रमाणे उडत होता. 
तिकडे एक बगळा होता.... 
मधूनच मासे मटकावत होता.
 त्यालासुद्धा एका पक्ष्याने .... शर्यत लावल्या प्रमाणे दोघे उडाले...
 बगळा शेवटी जवळच उभ्या असलेल्या छोट्या होडीवर बसला. 
एक बगळ्याचे पिलू.. त्याचा पाय दुखावला होता...

शांत निळाशार समुद्र बघितला शांतपणे. 

उगवत्या सूर्याला नमस्कार केला... 


चर्नी रोड येथे.... 
फारच सुंदर दिसत होता..
तरी आकाश.. 
अगदी निळसर नव्हते. 
थोडे बाष्प मिश्रित असावे 
धुके, धुरके असे होते आकाश. 
 
मरीनलाइन्स येथे येईपर्यंत सूर्य थोडा प्रखर झाला अगदी बघणे अशक्य. 
तेव्हा त्याच्याकडे पाठ करून समुद्र पक्षी निरीक्षण...
अगदी लहान लाटा किनारी आल्या त्यांचा आवाज.... 
ऐकत आकाशाचे निरीक्षण केले.
शांत प्रसन्न रविवार सकाळ मनाप्रमाणे.... 
 
आज मॅरेथॉन धावणारे...
 बहुसंख्येने धावण्याची प्रॅक्टीस करताना दिसत होते.
 
तर रेस ची बाईक चालवणारे बऱ्या संख्येने दिसत होते.. 
दूर गेले तरी त्यांच्या बाईक चा आवाज येत होता.
 मरीन लाइन्स येथील सगळी मैदाने क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी भरली होती.
येताना मरिनलाइन्स येथून रेल्वेने घरी.
आल्या आल्या व्हॉटसअप तुमच्याशी गप्पा.
 
समुद्र पक्षी  आता आताच आले आहेत. 
 
असतात बहुतेक  फेब्रुवारी  पर्यंत. 
अजून कोणी यांना खाण्यास किही देत नाही. 
मग त्यांचे थोडे कर्कश्श ओरडणे ऐकू येते. 
मासे खातात खरतर. 
पण कट्ट्यावर लोक भावनगरी घालतात. 
 
छान वातावरण आहे. थोडी थंडी आहे. 
आंग्ल वर्ष  २०१९ चा शेवटचा रविवार 
छान झाला.