नावातच आहे की....
दीपावली...
दिव्यांच्या ओळी.
पणत्या, इलेक्ट्रिक तोरणे लावली जातात.
आता पणत्या... कित्ती प्रकारात मिळतात,
कल्पकतेने लावल्या जातात.
आकाश कंदील... आकाश दीप...
जास्तीतजास्त उंच लावण्याचा प्रयत्न असतो...
पतंग, सुद्धा उडवतात आणि त्याला आकाशकंदील लावून ते उडवतात,
आकाशात सुंदर दिसतात.
दिवाळी रंगांचा सण...
घरासमोर रांगोळी काढली जाते...
अंगण सारवून रांगोळी काढतात,
आणि रंगावली प्रदर्शने सुद्धा भरवली जातात.
साफसफाई...
घर दुकाने संस्था यांची झाडून पुसून सफाई केली जाते
कोणी रंगरंगोटी करतात.
दिवाळी म्हणजे फराळ...
निरनिराळे पदार्थ करून एकत्र जमून फराळ करतात..
भेटी गाठी गप्पाटप्पा.!
दिवाळी म्हणजे खरेदी...
खरेदी... सोने चांदी कपडे घर ,
गाडी खरेदी एसी फ्रिज खरेदी....
थोडक्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू , कपाट.
अशा वस्तूंची खरेदी.
दिवाळी अंक...
साहित्य मेजवानी,
अंक खरेदी किंवा वाचनालय मेंबर होऊन
मस्त वाचनाचा आनंद घ्यायचा.
ग्रीटिंग..
दूर असलेल्यांना ग्रीटिंग देणे, पाठवणे.
दिवाळी म्हणजे अभ्यंग.!
पुढे सुरू होणारा हिवाळा
या दृष्टिने शरीराला तेल उटणे लावून स्नान...
दिवाळी म्हणजे सुगंध...
अत्तरे, मोतीसाबण, उटणे, परफ्यूम्स...
दिवाळी म्हणजे... दिवाळी पहाट...
कार्यक्रम
दिवाळी म्हणजे फटाके
आतषबाजी....
आता आवाज करणारे प्रदूषण होणारे फटाके...
फारच कमी ...
पण मुलांना आवडतात...
आता ज्येष्ठांच्या फटाके आठवणी... आठवणीत गेल्या...
दिवाळी म्हणजे बोनस, बक्षिसी...
दिवाळी ...
घराला आंब्याची पाने आणि झेंडू फुले तोरण लावणे.
कारीटे फोडणे,
देव देवतांचे स्मरण,
बहीण भाऊ प्रेम,
पती पत्नी प्रेम.
नातेवाईक मित्र भेटीगाठी.
मंदिरात जाणे., राम, कृष्ण यांचे स्मरण
वाईट गोष्टींचे निर्दालन करणे,
प्रवास निरनिराळ्या स्थळांना भेट देणे,
गाय वासरू पूजन,
देवांचे वैद्य धन्वंतरी यांचे पूजन,
यमदीप दान.
लक्ष्मी कुबेर पूजन.
आपली संस्कृती...
केरसुणीची पूजा करायला शिकवते..
आपण तिला लक्ष्मी मानतो.
व्यापारी नवं वर्ष सुरू होते नवी चोपडी पूजन.!
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त.!
जावयाचे लाड
दिवाळसण...
नवे लग्न झालेल्या जोडप्याचा खास सण.
बलीराजाचे स्मरण..
बहीण भाऊ प्रेम
भाऊबीज.
औक्षण... औंक्षवंत हो.
दिवाळी येणार
आनंद होणार
अंगण सजणार
घरोघरी....
तुमच्या घरी अन्
आमुच्या घरी.!